‘एआय विरुद्ध एआय’चा संघर्ष (फोटो- )
एकात्मिक संरक्षण कर्मचारी मुख्यालय, लष्कर, नौदल, हवाई दल, संरक्षण आस्थापना, शैक्षणिक संस्था आणि उद्योग क्षेत्रातील वरिष्ठ अधिकारी यामध्ये सहभागी झाले होते. आधुनिक युद्धात एआयचा वाढता वापर, स्वयंचलित यंत्रणा, त्यांना निष्प्रभ करणारे तंत्रज्ञान, एआय आधारित शस्त्रप्रणाली आणि मानव-यंत्र समन्वय अशा विविध विषयांवर यावेळी चर्चा झाली. युद्धभूमीवर अचूक निर्णय घेण्याची क्षमता वाढविण्यासह संरक्षण दलांची कार्यक्षमता आणि सज्जता बळकट करण्यासाठी एआयचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
संरक्षण क्षेत्रातील तांत्रिक स्वावलंबनासाठी स्वदेशी एआय तंत्रज्ञान विकसित करण्याची गरजही व्यक्त करण्यात आली. यासाठी शैक्षणिक संस्था, संशोधन क्षेत्र आणि उद्योगांमधील सहकार्य वाढविण्यावर भर देण्यात आला.
चर्चासत्रात ‘नवोन्मेष’ या विशेष प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विविध शैक्षणिक संस्था आणि उद्योगांनी विकसित केलेले एआय तंत्रज्ञान, नावीन्यपूर्ण संकल्पना आणि त्यांचे संभाव्य लष्करी उपयोग प्रदर्शित करण्यात आले. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे छात्र, संरक्षण आस्थापनांतील अधिकारी आणि विद्यार्थ्यांना या तंत्रज्ञानाची प्रत्यक्ष माहिती घेण्याची संधी मिळाली. भविष्यातील तंत्रज्ञानाधारित युद्धातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी संरक्षण दलांची क्षमता विकसित करणे आणि तिन्ही दलांमधील समन्वय वाढविणे, हा या चर्चासत्राचा उद्देश होता.
पाकिस्तानची फाटणार! शत्रूला मारण्यासाठी भारताचे ‘Pralay’ सज्ज; ओडिशाच्या किनारपट्टीवर…
या परिसंवादाने तांत्रिक जागरूकता वाढवणे, तिन्ही दलांमधील समन्वय अधिक दृढ करणे आणि कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित व तंत्रज्ञानाने व्यापलेल्या आधुनिक युद्धभूमीवरील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सशस्त्र दलांना सज्ज करण्याप्रती असलेल्या ‘मिलिट’च्या कटिबद्धतेला अधिक बळकटी दिली. जागतिक क्षेत्रात एआयचे महत्व वाढताना दिसून येत आहे. त्यामुळे आजचा परिसंवाद हा सुरक्षा दलांसाठी फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे.
Ans: पुण्यातील मिलिटरी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (मिलिट) येथे ‘एआय विरुद्ध एआय : युद्धतंत्रातील नवी क्षितिजे’ या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते.
Ans: आधुनिक युद्धामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर युद्धातील निर्णयप्रक्रिया, एआय आधारित शस्त्रप्रणाली, स्वयंचलित यंत्रणा आणि लष्करी कारवायांमध्ये होणार आहे.






