फोटो सौजन्य AI
यावर मात करत चीन सुद्धा स्वतःला स्वावलंबी बनवत तर आहेच पण अजूनही चीनकडे काही गोष्टींची कमतरता आहे . जसे कि चिपनिर्मिती , अजूनही काही चिपसाठी चीनला अमेरिकेवर अवलंबून राहावे लागत आहे . अशातच जगातल्या सर्वात मोठ्या आणि आघाडीवर असणाऱ्या एनव्हीडीया या कंपनीच्या CEO पदावर असणाऱ्या जेन्सन हुआंग यांनी अचानक एक दिवस आपल्या ऑफिसमधील सर्व कर्मचाऱ्यांना एक मेल केला आणि सांगितले कि त्यांनी त्यांच्या बायकोला फसवलं आहे . त्यांचे इतर दोन महिलेंसोबत अनैतिक संबंध आहेत .
त्यांनी त्यांच्या पत्नीवर हा अन्याय केला आहे . या मेल नंतर अमेरिकेत एकच खळबळ उडाली आणि समोर एक आणखीच धक्कादायक माहिती समोर आली कि त्या दोन महिलांमधील एक महिला ही चिनी गुप्तहेर असून एनव्हीडीया कंपनीचे चिप चीनला विकता याव्यात यासाठी ती काम करत असल्याचा संशय निर्माण झाला .
पुढे एनव्हीडीया कंपनीने जेन्सन यांच्यावर चौकशी करण्याची घोषणा केली . जेन्सन हे या कंपनीचे सहसंस्थापक सुद्धा आहेत . AI क्षेत्रातील सर्वात प्रभावशाली व्यक्तींपैकी एक असलेल्या जेन्सन हुआंग यांच्या अचानक बाहेर पडण्याच्या निर्णयामुळे गुंतवणूकदारांमध्ये गोंधळ निर्माण झाला आणि अमेरिकेत बाजार सुरु होताच प्रमुख शेअर्स जोरात घसरले आहेत .
जेन्सन हुआंग यांनी १९९३ मध्ये या कंपनीची स्थापना केली होती . त्यांच्या नेतृत्वाखाली कंपनीने ग्राफिक्स कार्ड बनवण्यापासून ते AI चिप्स आणि डेटा सेंटर तंत्रज्ञानापर्यंत मोठी झेप घेतली होती . गेल्या काही वर्षात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वाढत्या मागणीमुळे एनव्हीडीया जगातील सर्वात महत्वाच्या तंत्रज्ञान कंपन्यांपैकी एक बनली .
त्यामुळे हुआंग यांचा राजीनामा हा केवळ कंपनीपुरता मर्यादित न राहता संपूर्ण AI उद्योगासाठी ,महत्वाचा बदल मानला जात आहे . कंपनीने त्यांच्या जागी मुख्य वित्तीय अधिकारी कोलेट क्रेस यांची अंतरिम CEO म्हणून नियुक्ती केली आहे . कायमस्वरूपी उत्तराधिकारी निवडण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे .
Breaking News : चीनमध्ये वजन कमी करण्याच्या गोळीला मंजुरी; ‘एली लिली’ ठरली पहिली कंपनी
हुआंग यांच्या राजीनामच्या बातमीने अमेरिकन शेअर बाजारात मोठी उलथापालथ सुरु झाली आहे . व्यवहार सुरु होताच डाऊ जोन्स , S & P ५०० आणि नॅस्डॅक या प्रमुख निर्देशांकामध्ये घसरण नोंदवण्यात आली आहे . सगळ्यात जास्त परिणाम हा नॅस्डॅक मध्ये दिसून आला आहे . आता एनव्हीडीयाच्या नेतृत्व बदलांमुळे कंपनीच्या भविष्यावर अंडी AI क्षेत्रातील गुंतवणुकीवर काय परिणाम होईल , याबाबत मोठी चिंता निर्माण झाली आहे . तसेच याच्या परिणाम या कंपनीशी संबंधित कंपन्यांवरही याचा परिणाम होण्याची शक्यता आहे .
यातले पहिले कारण असे आहे कि अनैतिक संबंध ज्यामध्ये हुआंग यांच्यावर दोन महिलांशी विवाहबाह्य संबंध असल्याचे आरोप झाले . त्यापैकी एक महिला चीनशी संबंधित गुप्तचर कारवायांच्या संशयाच्या कक्षेत असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे . तर दुसरा राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा , संबंधित महिलेच्या माध्यमातून एनव्हीडीयाची संवेदनशील माहिती चीनपर्यंत पोहोचली का ? याबाबत अमेरिकेत चिंता व्यक्त झाली .
कंपनीच्या संचालक मंडळाने ८ नोव्हेंबर रोजी स्वतंत्र चौकशी सुरु केली होती . मात्र कंपनीची गुपिते किंवा राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित माहिती लीक झाल्याचा पुरावा असल्याचे जाहीर झालेले नाही . तर तिसरे कारण असे आहे कि कंपनीवर वाढत चाललेला दबाव कारण या प्रकारामुळे जेन्सन हुआंग यांच्या नेतृत्वावर प्रश्न निर्माण केले गेले आहेत . संचालक मंडळ त्यांच्या भवितव्याबाबत चर्चा करत असल्याचे समजते आहे . यासर्वानंतर अखेर त्यांनी १२ नोव्हेंबला तात्काळ राजीनामा दिला आहे .






