Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Khadakwasla Dam: ‘या’ महत्वाच्या प्रोजेक्टमुळे होणार खडकवासला धरणाच्या २.१८ टीएमसी पाण्याची बचत

नवीन मुठा उजवा कालव्याच्या किलोमीटर १ ते ३४ मधील लांबीसाठी पर्यायी खडकवासला ते फुरसुंगीपर्यंत बोगदा प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jan 13, 2025 | 12:22 PM
Khadakwasla Dam: 'या' महत्वाच्या प्रोजेक्टमुळे होणार खडकवासला धरणाच्या २.१८ टीएमसी पाण्याची बचत

Khadakwasla Dam: 'या' महत्वाच्या प्रोजेक्टमुळे होणार खडकवासला धरणाच्या २.१८ टीएमसी पाण्याची बचत

Follow Us
Close
Follow Us:

पुणे: खडकवासला प्रकल्पातील खडकवासला धरणापासून फुरसुंगीपर्यंत करण्यात येणार्‍या बोगद्याचे काम एप्रिल महिन्यापासून सुरू होणार आहे. सध्या या बोगद्याचे काम सुरू करण्यासाठी आवश्यक असलेली पर्यावरण मान्यता घेण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्याचबरोबर बांधकाम आराखडा स्थाननिश्चितीकरण करण्यासाठी आवश्यक असलेली यंत्रणा याचे कामकाज सुरू असून, ही सर्व कामे खासगी ठेकेदारांच्या माध्यमातून करण्यात येणार आहेत.

खडकवासला प्रकल्पाच्या नवीन मुठा उजवा कालव्याच्या फुरसुंगी बोगदा प्रकल्पाला या वर्षीच्या ऑगस्ट महिन्यात पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत प्रशासकीय मान्यता देण्यात आली. या प्रकल्पासाठी दोन हजार १९० कोटी ४७ लाख रुपयांची तरतूद केली आहे. या बोगद्यामुळे पुणे परिसरास सिंचन आणि पिण्यासाठी अधिकचे पाणी उपलब्ध होणार आहे. खडकवासला प्रकल्पाच्या नवीन मुठा उजवा कालव्याचा किलोमीटर १ ते ३४ लांबीचा भाग पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतून जातो.

पुणे शहराची होणारी वाढ, झोपडपट्टी, अतिक्रमणे व पर्यायाने होणारे जलप्रदूषण, जलनाश यामुळे कालव्याची हानी झाली आहे. त्यामुळे कालव्याच्या वाहनक्षमतेत झालेली घट टाळण्यासाठी नवीन मुठा उजवा कालव्याच्या किलोमीटर १ ते ३४ मधील लांबीसाठी पर्यायी खडकवासला ते फुरसुंगीपर्यंत बोगदा प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे २.१८ टीएमसी पाण्याची बचत होणार आहे.

सिंचनासाठी, तसेच बिगर सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार आहे. यामुळे सिंचनापासून वंचित राहणारे तीन हजार ४७१ हेक्टर इतके क्षेत्र पुनर्स्थापित होणार आहे.
सुमारे ३४ किलोमीटरचा हा भूमिगत बोगदा आहे.पर्यावरण मान्यतेसाठी हा प्रस्ताव रवाना झाला आहे. यासाठी काही भागांत भूसंपादनाचे काम अजूनही सुरू आहे. यासाठी बांधकाम आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. बोगद्यासाठी सुमारे दोन हजार कोटींचा खर्च येणार आहे.

प्रकल्पासाठी तरतूद –
२ हजार १९० कोटी
पाण्याची बचत होणार – २.१८ टीएमसी
क्षेत्र सिंचनाखाली येणार – ३४७१ हेक्टर

पुणे पालिकेचे ‘पीएमआरडीए’ला पत्र

शहराला खडकवासला धरणसाखळी आणि भामा आसखेड प्रकल्पातून महापालिकेला २०३२ पर्यंत १६.३६ टीएमसी पाणीसाठा मंजूर आहे.शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी सद्य:स्थितीत २१ टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे पालिकेच्या सुधारित हद्दीजवळील ५ कि.मी.च्या अंतरातील ५१ गावांना पालिकेस पाणी देणे शक्य नसल्याचे पत्र महापालिका प्रशासनाकडून पीएमआरडीएला देण्यात आले आहे.

हेही वाचा: राज्यात थंडीचा जोर कायम; मध्य महाराष्ट्रसह ‘या’ भागांत पावसाचा अंदाज

पुणे महापालिकेत २०१७ मध्ये समाविष्ट झालेली ११ गावे आणि २०२१ मध्ये समाविष्ट झालेल्या २३ गावांना अद्यापही पालिकेला पाणी देता आलेले नाही. त्यात पालिकेच्या सुधारित हद्दीजवळील पाच कि.मी. हद्दीच्या ५१ गावांना पालिकेने पाणीपुरवठा करावा, असे राज्य सरकारच्या जुन्या परिपत्रकाचा आधार घेत ‘पीएमआरडीए’ने सांगितले होते. महापालिकेसाठी पाटबंधारे विभागाने २०३२ पर्यंतच्या लोकसंख्येसाठी १६.३६ टीएमसी साठा राखीव केला आहे. महापालिकेची जुनी हद्द आणि नवीन समाविष्ट गावे पाहता महापालिकेस प्रत्यक्षात २४ टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे.

 

Web Title: Khadakwasla dam to fursungi water tunnel project started april 2025 save 2 18 tmc water pune city news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 27, 2024 | 03:07 PM

Topics:  

  • Khadakwasla Dam
  • Pune

संबंधित बातम्या

Pune News: मोठी बातमी! पुण्यातील गणेश मंडळांचा ‘हा’ वाद अखेर मिटला; मंत्री मोहोळांच्या पुढाकराने सुटला प्रश्न
1

Pune News: मोठी बातमी! पुण्यातील गणेश मंडळांचा ‘हा’ वाद अखेर मिटला; मंत्री मोहोळांच्या पुढाकराने सुटला प्रश्न

पुण्यातील बेशिस्त वाहतुकीवर, अपघातांवर नियंत्रण कसे मिळवणार? पहा काय म्हणाले RTO अधिकारी? वाचा सविस्तर मुलाखत
2

पुण्यातील बेशिस्त वाहतुकीवर, अपघातांवर नियंत्रण कसे मिळवणार? पहा काय म्हणाले RTO अधिकारी? वाचा सविस्तर मुलाखत

Pune Velhe Taluka News: आता वेल्हे नाही, ‘राजगड’ म्हणा! महसूल मंत्र्यांचा ऐतिहासिक निर्णय
3

Pune Velhe Taluka News: आता वेल्हे नाही, ‘राजगड’ म्हणा! महसूल मंत्र्यांचा ऐतिहासिक निर्णय

Pune Rain: मुठेचे रौद्रस्वरूप! खडकवासल्यातून ३९ हजार क्यूसेकने विसर्ग; नदीपात्र बंद, पुण्यात प्रचंड वाहतूक कोंडी
4

Pune Rain: मुठेचे रौद्रस्वरूप! खडकवासल्यातून ३९ हजार क्यूसेकने विसर्ग; नदीपात्र बंद, पुण्यात प्रचंड वाहतूक कोंडी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.