Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 18 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Breaking: पुण्यात कोसळधार; खडकवासल्यातून पाण्याचा विसर्ग वाढवला, सध्याची स्थिती काय?

खडकवासला धरणसाखळी क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला भागात मुसळधार पाऊस सुरू असल्याने, धरणातून पाणी सोडण्यात आले आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 24, 2025 | 03:39 PM
Pune Breaking: पुण्यात कोसळधार; खडकवासल्यातून पाण्याचा विसर्ग वाढवला, सध्याची स्थिती काय?
Follow Us
Follow Us:

पुणे: पुणे शहरात आज पहाटेपासून पावसाने हजेरी लावली आहे. गेले काही दिवस पुणे शहर आणि उपनगर परिसरात पावसाने काहीशी उसंत घेतल्याचे चित्र होते. मात्र आज पावसाने पुन्हा जोरदार बॅटिंग सुरू केली आहे. मुसळधार पावसामुळे खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. खडकवासला धरणातून सध्या 7,700 क्युसेक  वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.

खडकवासला धरणसाखळी क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला भागात मुसळधार पाऊस सुरू असल्याने, धरणातून पाणी सोडण्यात आले आहे. सकाळी 11 पर्यंत 3,883 क्युसेक वेगाने पाण्याच्या विसर्ग सुरू होता. मात्र आता हा विसर्ग वाढवण्यात आला आहे. खडकवासला धरणातून आता 7,700 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये सुरू असणारा 3883 क्युसेक्स विसर्ग वाढवुन सकाळी 11:00 वा. 7700 क्यूसेक्स करण्यात येत आहे. आवश्यकतेनुसार बदल संभवू शकतो. कृपया नोंद घ्यावी. तसेच पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानूसार विसर्ग पुन्हा कमी/जास्त करण्याची शक्यता आहे याची नोंद घेण्यात यावी.

– मोहन शां.भदाणे,
उपविभागीयअभियंता
मुठा कालवे पाटबंधारे उपविभाग, पुणे

खडकवासला धरण किती टक्के भरले? 

पानशेत, टेमघर, वरसगाव या भागात मुसळधार पाऊस सुरू असल्याने खडकवासला  धरणात पाणीसाठा वाढत आहे. सध्या खडकवासला धरण 64 टक्के भरले असल्याचे समजते आहे. सध्या धरण साखळी क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. पुणे आणि उपनगरात देखील पावसाची संततधार पाहायला मिळत आहे. त्यामुळे येत्या काळात पावसाचा जोर वाढल्यास खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला जाऊ शकतो.

कोकणात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज

पुढील दोन ते तीन दिवसात कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट भागात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भातील काही भागातही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर उर्वरित ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

राज्याच्या अनेक भागात हलका-मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबई आणि ठाण्यामध्ये मध्यम सरी कोसळण्याची शक्यता आहे. तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे घाट, सातारा घाट येथे ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकण किनारपट्टीला पुढील दोन दिवसात उंच लाटांचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे लहान होड्यांना समुद्रात न जाण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

Web Title: Khadakwasla dam water release in 7700 cusec mutha river alert to pune people weather and rain update

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 24, 2025 | 03:18 PM

Topics:  

  • Heavy Rain
  • Khadakwasla Dam
  • Maharashtra Weather
  • Pune Rain

संबंधित बातम्या

Maharashtra Weather Alert: राज्यात ऊन-पावसाचा खेळ; ५ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा यलो अलर्ट
1

Maharashtra Weather Alert: राज्यात ऊन-पावसाचा खेळ; ५ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा यलो अलर्ट

Rain Update : महाराष्ट्रात मान्सूनचे ‘कमबॅक’; पुढील पाच दिवसांत 27 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस
2

Rain Update : महाराष्ट्रात मान्सूनचे ‘कमबॅक’; पुढील पाच दिवसांत 27 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस

Maharashtra Weather Forecast Today: कोकण आणि घाटमाथ्यावर मुसळधार!; विदर्भाला विजांच्या कडकडाटासह यलो अलर्ट
3

Maharashtra Weather Forecast Today: कोकण आणि घाटमाथ्यावर मुसळधार!; विदर्भाला विजांच्या कडकडाटासह यलो अलर्ट

Rain Update : पावसाबाबत महत्त्वपूर्ण अपडेट; 18 ऑगस्टपर्यंत राहणार मुसळधार पाऊस, हवामान विभागाकडून अलर्ट जारी
4

Rain Update : पावसाबाबत महत्त्वपूर्ण अपडेट; 18 ऑगस्टपर्यंत राहणार मुसळधार पाऊस, हवामान विभागाकडून अलर्ट जारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.