
महाराष्ट्रात पावसासाठी पोषक हवामान
अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याचे समोर येत आहे. त्यामुळे राज्यात काही ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे. तर कोकण किनारपट्टीवर याचे प्रमाण जास्त राहू शकते. सिंधुदुर्ग जिल्ह्यात वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकणात सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि चिपळूणसह काही तालुक्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावल्याचे दिसून आले. उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना यामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे.
Maharashtra Weather Update: महाराष्ट्रात हवामानाचा मूड बदलणार! ‘या’ 7 जिल्ह्यांत पावसाचा इशारा
रत्नागिरी जिल्ह्यात देवरूख, संगमेश्वर आणि अन्य तालुक्यात देखील पावसाने हजेरी लावली. काही जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देखील देण्यात आला असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे गेले अनेक दिवस पावसाने विश्रांती घेतली होती. त्यामुळे अचानक आलेल्या पावसाने काहीसा दिलासा मिळाला आहे. तर अवकाळी पावसाने लोकांची तारांबळ उडाली आहे.
पुणे शहरात सोमवारी किमान तापमान २२.१ अंश सेल्सिअस, तर कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. दिवसभर वाढलेला उकाडा आणि कडक उन्हामुळे नागरिक हैराण झाले होते. सायंकाळी झालेल्या पावसामुळे वातावरणात काहीसा गारवा निर्माण झाला. दरम्यान, मंगळवारी (ता. २०) शहराच्या कमाल तापमानात फारसा बदल होण्याची शक्यता नसून, किमान तापमानात किंचित घट होऊन ते सुमारे २२ अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. ते आकाश मुख्यतः निरभ्र राहून दुपारी किंवा संध्याकाळी अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे.
Weather Update : सातारा, सांगली, कोल्हापूरसह अनेक भागांत मुसळधार पाऊस; शेतकऱ्यांना अखेर दिलासा
Ans: राज्यात सिंधुदुर्ग, पुणे, रत्नागिरीच्या काही भागात पावसाने हजेरी लावली
Ans: राज्यात पुढील काही दिवसांत पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.