Mahabharata will be recited at Pune's 30th anniversary celebration of written astrology
पुणे : सुप्रसिद्ध ‘विधिलिखित ज्योतिष’ कार्यालयाचे संचालक आदिनाथ मच्छिंद्र साळवी आणि ॲडव्होकेट वैशाली आदिनाथ साळवी यांच्या वतीने ‘विधिलिखित ज्योतिष त्रिदशकोत्तर सोहळा २०२५’ चे आयोजन करण्यात आले आहे. हा भव्य सोहळा २२ ते २४ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत डी. पी. रोड, म्हात्रे पूलाजवळील गोल्डन लिफ बँक्वेट्स लॉन्स येथे मोठ्या उत्साहात पार पडणार असल्याची माहिती या सोहळ्याचे कार्याध्यक्ष डॉ. दत्तप्रसाद चव्हाण यांनी दिली.
भीष्म, अर्जुन आणि कृष्णाची उपस्थिती सोहळ्याचे वैशिष्ट्य
या विशेष सोहळ्याचे उद्घाटन महाभारतात भीष्माचार्यांची भूमिका साकारणारे प्रख्यात अभिनेते मुकेश खन्ना यांच्या हस्ते होणार आहे. हा आगळा-वेगळा सोहळा अनेक ज्योतिष अभ्यासक, तज्ज्ञ आणि रसिकांसाठी एक सुवर्णसंधी ठरणार आहे.
सोहळ्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे २३ फेब्रुवारीला, महाभारतात अर्जुनाची भूमिका गाजवलेले लोकप्रिय अभिनेते फिरोज खान प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तर २४ फेब्रुवारी रोजी समारोपाच्या दिवशी, आपल्या श्रीकृष्णाच्या भूमिकेमुळे घराघरांत पोहोचलेले सुप्रसिद्ध अभिनेते नितीश भारद्वाज हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणार आहेत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘त्यांना गुन्हेगाराप्रमाणे बेड्या ठोकण्यात आल्या…’ व्हाईट हाऊसने शेअर केला ‘हा’ हृदयद्रावक व्हिडिओ
३३ नामवंत वक्त्यांचे मार्गदर्शन
या तीन दिवसीय भव्य सोहळ्यात संपूर्ण भारतभरातील ३३ ज्योतिष तज्ज्ञ आणि नामवंत वक्ते उपस्थित राहणार असून, ते ज्योतिष शास्त्राचे विविध पैलू उलगडून दाखवणार आहेत. पारंपरिक ज्योतिषशास्त्रापासून ते आधुनिक काळातील त्याच्या उपयोगापर्यंत अनेक विषयांवर या तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळणार आहे.
गौरव सोहळा आणि निबंध स्पर्धा
या सोहळ्याचा आणखी एक प्रमुख आकर्षण ‘मरणोत्तर विधिलिखित ज्योतिष महर्षी पुरस्कार’ आणि ‘विधिलिखित ज्योतिष महर्षी पुरस्कार’ वितरण समारंभ असणार आहे. या प्रतिष्ठित पुरस्कारांचे वितरण उपस्थित सन्माननीय मान्यवरांच्या हस्ते होईल.
याशिवाय, कै. मच्छिंद्र नामदेव साळवी स्मृती निबंध स्पर्धेचे बक्षीस वितरण श्रीमती रंगुबाई मच्छिंद्र साळवी यांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे. ही स्पर्धा ज्योतिष शास्त्राच्या गूढतेवर आणि त्याच्या वैज्ञानिक बाजूंवर विचारमंथन करणाऱ्या अभ्यासकांसाठी एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ ठरेल.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : हेच जगाच्या विनाशाचे संकेत? समुद्रातून वेदनेने तडफडत बाहेर आली दुर्मिळ डूम्सडे फिश, व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल
ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासकांसाठी सुवर्णसंधी
‘विधिलिखित ज्योतिष त्रिदशकोत्तर सोहळा २०२५’ हा कार्यक्रम ज्योतिष शास्त्राचे अभ्यासक, जाणकार तसेच ज्योतिषशास्त्रावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकासाठी प्रेरणादायी ठरेल. या कार्यक्रमाच्या निमित्ताने देशभरातील ज्योतिष तज्ज्ञ एकत्र येऊन त्यांच्या ज्ञानाची देवाणघेवाण करतील.
या सोहळ्यात विविध प्रकारचे सत्रे, चर्चासत्रे आणि प्रदर्शने आयोजित केली जाणार आहेत, ज्यामुळे उपस्थितांना ज्योतिषशास्त्राची अधिकाधिक सखोल माहिती मिळेल. यामुळे हा सोहळा केवळ एक सणसुद्धा नसून, शास्त्रीय, सांस्कृतिक आणि अध्यात्मिक दृष्टिकोनातूनही महत्त्वाचा उपक्रम ठरणार आहे. पुणे हे आधीच शास्त्र, संस्कृती आणि अध्यात्म यांचे केंद्र मानले जाते. अशा ठिकाणी होत असलेला हा सोहळा निश्चितच एक अनोखा आणि अद्वितीय अनुभव देणारा असेल. महाभारताच्या प्रख्यात कलाकारांची उपस्थिती, देशभरातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि मान्यवरांचा सन्मान यामुळे हा सोहळा सर्व ज्योतिषप्रेमींसाठी पर्वणी ठरणार आहे.