Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अजित पवारांसाठी पुणं थांबलं! ‘दादां’च्या जाण्याने सांस्कृतिक कार्यक्रमांना तात्पुरता विराम

काही दिवसांपासून महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांस्कृतिक क्षेत्रात चर्चा रंगल्या होत्या. विविध पॅनल्सकडून आपापली उद्दिष्टे, वचननामा आणि भावी दिशा मांडण्याची तयारी सुरू होती.

  • By तेजस भागवत
Updated On: Jan 29, 2026 | 08:21 PM
अजित पवारांसाठी पुणं थांबलं! ‘दादां’च्या जाण्याने सांस्कृतिक कार्यक्रमांना तात्पुरता विराम
Follow Us
Follow Us:

पुणे शहरातील सांस्कृतिक कार्यक्रम रद्द 
अजित पवार यांच्या आकस्मिक निधनामुळे तीव्र शोककळा 
अजित पवारांचे होते सांस्कृतिक क्षेत्राशी अतूट नाते

पुणे: राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या आकस्मिक निधनाच्या वृत्ताने संपूर्ण राज्यासह पुणे शहरातही तीव्र शोककळा पसरली आहे. जनसामान्यांशी तसेच सांस्कृतिक क्षेत्राशी अतूट नाते असलेल्या या नेत्याच्या जाण्याने शहरातील सांस्कृतिक, शैक्षणिक आणि सामाजिक जीवनावर मोठा परिणाम झाला असून येत्या काही दिवसांसाठी नियोजित असलेले बहुतांश कार्यक्रम रद्द किंवा स्थगित करण्यात आले आहेत.

शुक्रवार आणि शनिवारी शहरात विविध सांस्कृतिक कार्यक्रम, नाट्यप्रयोग, संगीत मैफिली तसेच सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मात्र या दुःखद घटनेनंतर आयोजकांनी कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला. सध्या माघी गणपतीचे वातावरण असून त्यानिमित्ताने शहरातील अनेक भागांत भंडारे व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन झाले होते. मात्र, पुढील दोन दिवसांतील महत्त्वाचे कार्यक्रम रद्द झाल्याने उत्सवी वातावरणावर शोकाची छाया पसरली आहे.

Ajit Pawar Last Rites : दादा परत या ना हो..! कार्यकर्त्याचा बारामतीत आक्रोश!

मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांस्कृतिक क्षेत्रात चर्चा रंगल्या होत्या. विविध पॅनल्सकडून आपापली उद्दिष्टे, वचननामा आणि भावी दिशा मांडण्याची तयारी सुरू होती. मात्र दादांच्या निधनानंतर हे सर्व उपक्रम स्थगित करण्यात आले असून, काही दिवसांपासून तापलेले वातावरण अचानक शांत झाले आहे.

प्रजासत्ताक दिनानिमित्त मागील सोमवारी शहरात उत्साहाचे वातावरण होते. त्यानंतर पुढील पाच ते सहा दिवस विविध ठिकाणी आयोजित करण्यात आलेले कार्यक्रमही रद्द करण्यात आले. या अनिश्चिततेमुळे गुरुवारी शाळा व महाविद्यालये सुरू राहणार की नाही, याबाबत पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. परिणामी अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती कमी दिसून आली.

Ajit Pawar Plane Crash : ‘अजितदादांच्या अपघाती निधनाची चौकशी व्हावी’, अजित पवारांच्या निधनाने कार्यकर्ते शोकाकुल

अजितदादा पवार यांचा जनमाणसाशी असलेला थेट संवाद, विकासकामांबरोबरच कला-संस्कृतीला दिलेले प्रोत्साहन यामुळे सांस्कृतिक क्षेत्रात त्यांच्याविषयी विशेष आपुलकी होती. अनेक कार्यक्रमांना त्यांनी दिलेली उपस्थिती, कलाकारांशी साधलेला संवाद आणि सांस्कृतिक संस्थांना दिलेले पाठबळ आज अनेकांच्या आठवणींमध्ये जागे झाले आहे. त्यामुळेच अनेक आयोजकांनी कार्यक्रम रद्द केल्याचा निर्णय घेतला आहे.

Web Title: Cultural events cancelled in pune city due to dcm ajit pawar death in plane crash baramati

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 29, 2026 | 08:21 PM

Topics:  

  • ajit pawar
  • Cultural Event
  • pune news

संबंधित बातम्या

Pune Graduate Constituency:जागावाटपावर महायुतीत अद्याप चर्चा नाही; राजेश पांडेंचा मोठा दावा
1

Pune Graduate Constituency:जागावाटपावर महायुतीत अद्याप चर्चा नाही; राजेश पांडेंचा मोठा दावा

Sports News: बापरे! हा कसला रेसिंगचा धुमाकूळ; ‘महा डर्ट ट्रॅक चॅलेंज’मध्ये सार्थक चव्हाणचे वर्चस्व
2

Sports News: बापरे! हा कसला रेसिंगचा धुमाकूळ; ‘महा डर्ट ट्रॅक चॅलेंज’मध्ये सार्थक चव्हाणचे वर्चस्व

Cricket: ‘स्पोर्ट्सफिल्ड मान्सून लीग’मध्ये युवा क्रिकेटपटूंचा जलवा; पुण्याला चढला क्रिकेटचा ‘ज्वर’
3

Cricket: ‘स्पोर्ट्सफिल्ड मान्सून लीग’मध्ये युवा क्रिकेटपटूंचा जलवा; पुण्याला चढला क्रिकेटचा ‘ज्वर’

Pune Ganeshotsav 2026: गणेशोत्सवाच्या देखाव्यांना ‘AI’ची साथ; तंत्रज्ञानाने बदलले जिवंत देखाव्यांचे रूप
4

Pune Ganeshotsav 2026: गणेशोत्सवाच्या देखाव्यांना ‘AI’ची साथ; तंत्रज्ञानाने बदलले जिवंत देखाव्यांचे रूप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.