Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 11 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Metro: स्वारगेट-कात्रज मार्गावर चार मेट्रो स्थानकं होणार; महामेट्रो स्वखर्चाने उभारणार, महापालिकेचा प्रस्ताव

मेट्रोच्या दोन स्थानकामधील अंतर हे एक ते दीड किलो मीटर पेक्षा अधिक नसावे, असा नियम आहे. मात्र या विस्तारित मेट्रो मार्गाच्या पद्मावती ते कात्रज या स्थानकातील अंतर १.९०० मीटर इतके आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Dec 05, 2024 | 02:35 AM
Pune Metro: स्वारगेट-कात्रज मार्गावर चार मेट्रो स्थानकं होणार; महामेट्रो स्वखर्चाने उभारणार, महापालिकेचा प्रस्ताव

Pune Metro: स्वारगेट-कात्रज मार्गावर चार मेट्रो स्थानकं होणार; महामेट्रो स्वखर्चाने उभारणार, महापालिकेचा प्रस्ताव

Follow Us
Follow Us:

पुणे: स्वारगेट-कात्रज भूमिगत मेट्रो मार्गावर बालाजीनगर येथे नवीन मेट्रो स्थानक उभारण्याचा प्रस्ताव महापालिकेने स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी ठेवला आहे. त्यामुळे स्वारगेट ते कात्रज या प्रस्तावित भुयारी मेट्रो मार्गावर तीन ऐवजी आता चार मेट्रो स्थानके असणार आहेत. या स्थानकाचा खर्च महामेट्रो करणार असल्याचे पालिका प्रशासनाने सांगितले. पुण्यात आता मेट्रो सुरू झाली असून अनेक ठिकाणी स्टेशनचे बांधकाम सुरू आहे तर काही स्टेशनचे बांधकाम पूर्ण झालेले आहे.पण   स्वारगेट मेट्रो स्टेशनचे काम पुर्ण होऊन अखेर ते आता पुणेकरांच्या सेवेसाठी सज्ज आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या भव्य स्टेशनचे उद्घाटन करण्यात आले.

नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट भूमिगत मार्गाचे उद्घाटन आणि त्याच वेळी स्वारगेट- कात्रज भूमिगत मार्गाचे भूमिपूजन करण्यात आले आहे. भूमिपूजन कार्यक्रमानंतर या मार्गाचे प्रत्यक्ष काम सुरू करण्यासाठी मेट्रोकडून युद्धपातळीवर तयारी सुरू आहे. 100 फूट जमिनीखालून खोदकाम करावे लागणार आहे. त्याकरिता आवश्यक असलेला जिऑलॉजिकल सव्र्व्हेही मेट्रोकडून करण्यात आला आहे.

स्वारगेट ते कात्रज या सुमारे ५.४०० किलो मीटर लांबीच्या मेट्रो मार्गाच्या सविस्तर प्रकल्प अहवालामध्ये मार्केटयार्ड, पद्मावती, कात्रज अशी तीन स्थानके प्रस्तावित करण्यात आली आहेत. या मार्गासाठी सुमारे २ हजार ९५४ कोटी रूपयांचा खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पात पुणे महापालिकेचा आर्थिक सहभाग १५ टक्के (४८५ कोटी) असेल. या प्रकल्पासाठी लागणारी जागा महापालिका‌ देणार असून तिची किंमत (२४८ कोटी) असेल.

हेही वाचा: पुणे जिल्हा न्यायालय ते स्वारगेट मेट्रो मार्ग आजपासून सुरू; तिकीट किती असणार?

दोन स्थानकांमधील अंतर जास्त

मेट्रोच्या दोन स्थानकामधील अंतर हे एक ते दीड किलो मीटर पेक्षा अधिक नसावे, असा नियम आहे. मात्र या विस्तारित मेट्रो मार्गाच्या पद्मावती ते कात्रज या स्थानकातील अंतर १.९०० मीटर इतके आहे. त्यामुळे धनकवडी, बालाजीनगर येथील नागरिकांना मेट्रोचा फायदा होणार नसल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे बालाजीनगर येथे मेट्रो स्थानक व्हावे, अशी मागणी राजकीय मंडळी व नागरिकांकडून केली जात होती. या भागातून स्वारगेटकडे ये-जा करणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी असून बालाजीनगर येथील मेट्रो स्थानकाचा मोठा फायदा या भागातील नागरिकांना होईल. तसेच मेट्रोला देखील प्रवाशी उपलब्ध होऊन उत्पन्न वाढेल. त्यामुळे वेगवेगळ्या माध्यमातून पाठपुरावा केला होता. त्यानंतर प्रशासनाने बालाजीनगर येथे नवीन मेट्रो स्थानक उभारण्यास मान्यता देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे ठेवला आहे.

या मार्गावरचा तिकीट दर किती?

जिल्हा न्यायालय ते कसबा पेठ: 10 रुपये

जिल्हा न्यायालय ते मंडई: 15 रुपये

जिल्हा न्यायालय ते स्वारगेट: 15 रुपये

स्वारगेट ते मंडई: 10 रुपये

स्वारगेट ते कसबा पेठ: 15 रुपये

स्वारगेट ते जिल्हा न्यायालय: 15 रुपये

Web Title: Mahametro build four stations at swargate to katraj metro royute pmc proposalfront of standing committee

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 05, 2024 | 02:35 AM

Topics:  

  • Pune
  • Pune Metro

संबंधित बातम्या

Hinjawadi-Shivajinagar Metro: हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोबाबत मोठी अपडेट;   १७ स्थानकांवर सेवा सुरू होणार
1

Hinjawadi-Shivajinagar Metro: हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोबाबत मोठी अपडेट; १७ स्थानकांवर सेवा सुरू होणार

Devendra Fadnavis: अंमली पदार्थांच्या गुन्ह्यांची सुनावणी होणार जलद; पुण्यात विशेष NDPS न्यायालयाची स्थापना
2

Devendra Fadnavis: अंमली पदार्थांच्या गुन्ह्यांची सुनावणी होणार जलद; पुण्यात विशेष NDPS न्यायालयाची स्थापना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.