Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Election Survey: महाविकास आघाडीत काँग्रेससाठी गुड न्यूज; शिंदे-पवार गटाचं टेन्शन वाढणार

2019 मध्ये शिवसेना एकसंध होती. उद्धव ठाकरे पक्षप्रमुख होते. गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला 56 जागा मिळाल्या होत्या. तर 2019 मध्ये शरद पवार आणि अजित पवार एकत्र असताना राष्ट्रवादीला 54 जागा मिळाल्या होत्या.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Nov 01, 2024 | 04:25 PM
Maharashtra Election Survey: महाविकास आघाडीत काँग्रेससाठी गुड न्यूज; शिंदे-पवार गटाचं टेन्शन वाढणार
Follow Us
Close
Follow Us:

पुणे: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. राजकीय वातावरण तापू लागले आहे. निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. अशातच वेगवेगळ्या संस्थांकडून निवडणुकीचे सर्वे समोर येऊ लागले आहेत. इलेक्टोरल एजचे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबाबतचे प्री-पोलने केलेल्या सर्वेक्षणातून काँग्रेस महाराष्ट्रात सर्वात मोठा पक्ष ठरल्याचे दिसत आहे. सर्वेक्षणात MVA च्या बाजूने सर्वात जास्त कल असल्याचे  समोर आले आहे.

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला महाविकास आघाडी (MVA) आणि महायुती या पक्षांनी सुरुवात केली आहे. निवडणुका जिंकण्यासाठी सर्वच पक्षांनी आपल्या ज्येष्ठ नेत्यांवर मोठी जबाबदारी टाकली आहे.इलेक्टोरल एज प्री-पोल सर्वेक्षणानुसार, महाविकास आघाडीला महाराष्ट्रात बहुमत मिळत असल्याचं दिसत आहे.  एमव्हीएला राज्यातील 288 विधानसभा जागांपैकी 157 जागा मिळू शकतात.

हेही वाचा:  देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेत वाढ; गुप्तचरांच्या अहवालानंतर सरकारचा निर्णय, घराबाहेर कमांडो तैनात

महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येऊ शकतो,  काँग्रेसला सर्वाधिक 68 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 44 जागा आणि ठाकरे गटाला 41 जागा मिळू शकतात. त्यासोबतच समाजवादी पक्षाला 1, सीपीआयएम 1 आणि पीडब्ल्यूपीला 2 जागा मिळू शकतात.

शिवसेना (UBT) नेते उद्धव ठाकरेंना MVA मधून मुख्यमंत्र्यांचा चेहरा म्हणतात. सर्वेक्षणात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला तर मुख्यमंत्रीपदासाठी रस्सीखेच होऊ शकते, असेही सांगितले जात आहे. 2019 मध्ये झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबद्दल बोलायचे झाले तर त्यावेळी काँग्रेसला 44 जागा मिळाल्या होत्या. सर्वेक्षणानुसार यावेळी काँग्रेसच्या जागा जवळपास 50 टक्क्यांनी वाढू शकतात.

हेही वाचा:  ऋतुराज गायकवाड पुन्हा एकदा फेल; ‘याच’ कारणाने नाही झाला टीम इंडियामध्ये समावेश

2019 मध्ये शिवसेना एकसंध होती. उद्धव ठाकरे पक्षप्रमुख होते. गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला 56 जागा मिळाल्या होत्या. राष्ट्रवादीचीही तीच स्थिती आहे. 2019 मध्ये शरद पवार आणि अजित पवार एकत्र असताना राष्ट्रवादीला 54 जागा मिळाल्या होत्या, मात्र आता दोन्ही पक्षांचे दोन भाग झाले आहेत. सर्वेक्षणानुसार महाराष्ट्रात महायुतीला केवळ 117 जागा मिळू शकतात, त्यापैकी भाजपला सर्वाधिक 79 जागा मिळू शकतात. याशिवाय शिंदे गटाला 23 जागा, राष्ट्रवादीला 14 जागा, आरवायएसपीला एक जागा आणि इतरांना 14 जागा मिळू शकतात.

Web Title: Maharashtra assembly election survey congress will increase by 50 percent seats nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 01, 2024 | 04:25 PM

Topics:  

  • maharashtra election 2024
  • Mahayuti

संबंधित बातम्या

Ratnagiri : रत्नागिरी महायुतीची दमदार तयारी!
1

Ratnagiri : रत्नागिरी महायुतीची दमदार तयारी!

Maharashtra Politics: निवडणुका येताच महायुती अन् ‘मविआ’ फुटली? ‘या’ जिल्ह्यात वातावरण तापले
2

Maharashtra Politics: निवडणुका येताच महायुती अन् ‘मविआ’ फुटली? ‘या’ जिल्ह्यात वातावरण तापले

Nagpur Politics: महायुती तुटली; मविआ फुटली नागपुरात शिंदेसेना स्वबळावर, तर भाजपचे ‘वेट अॅण्ड वॉच’
3

Nagpur Politics: महायुती तुटली; मविआ फुटली नागपुरात शिंदेसेना स्वबळावर, तर भाजपचे ‘वेट अॅण्ड वॉच’

“सन्मानजनक जागा मिळाल्या नाही तर…”: महायुती फुटणार? ‘या’ नेत्याच्या विधानाने खळबळ
4

“सन्मानजनक जागा मिळाल्या नाही तर…”: महायुती फुटणार? ‘या’ नेत्याच्या विधानाने खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.