"जोपर्यंत माझ्यात श्वास आहे तोवर शेतीचे पाणी..."; दिलीप वळसे पाटलांची नागरिकांना ग्वाही
मंचर तालुका आंबेगाव येथे महायुतीचे उमेदवार दिलीप वळसे पाटील यांच्या विजय निर्धार मेळाव्या च्या सांगता सभेला मार्गदर्शन करताना उमेदवार दिलीप वळसे पाटील बोलत होते .उमेदवार दिलीप वळसे पाटील म्हणाले मला कोणती ईडीची , सीबीआयची किंवा कोणतीच नोटीस नाही .त्या भीतीने मी भाजप सरकार मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून सहभागी झाल्याची विरोधी उमेदवार चर्चा करतात, परंतु मी आज मतदार बंधू-भगिनींच्या साक्षीने सांगतो की मला कोणतीही नोटीस आजवर आलेली नाही .जर कोणाला नोटीस मिळाली तर मी माझी उमेदवारी मागे घेईल, केवळ विकासाचे कोणतेही मुद्दे विरोधकांकडे नाही बदनामी आणि धांगडधिंगा करून विकास होत नाही, त्यामुळे बेताल वक्तव्य करून मला बदनाम करण्याचा प्रयत्न करतात.
परंतु येथील जनतेला माहिती आहे की कोण खरं आणि कोण खोटं. समोरील उमेदवार प्रचारांमध्ये यांची नार्कोटेस्ट करा, अशी जाहीर मागणी करत आहे तर माझेही म्हणणं आहे की माझी नार्को टेस्ट करा माझ्यातून विकासच बाहेर येईल .परंतु तुमचे नार्को टेस्ट केली तर तुम्हाला बाहेर फिरणं मुश्किल होईल. अशी टीका करत उमेदवार वळसे पाटील यांनी विरोधी उमेदवारावर हल्लाबोल केला.
केवळ विकासाच्या मुद्द्यावरच आणि पुढील पाच वर्षात मी काय काम करणार या अजिंठ्यावरच ही निवडणूक लढवत आहे. परंतु समोरच्या उमेदवार मात्र विकासाच्या मुद्द्यावरून भरकटून वैयक्तिक, आकसापोटी टीका करतात त्यांच्याकडे कोणतेही विकासाची व्हिजन नाही. परंतु तुमच्याकडे पुढील विकासाचा अजंठा काय आहे .याचा मात्र त्यांच्याकडे थांगपत्ता नाही. बदलापूर पासून तर समोरील उमेदवाराचे गाव असलेल्या नागापूर गावापर्यंत झालेले दुषकृत्य बरोबर नाही त्याची चौकशी झाली पाहिजे. माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत आंबेगाव चे पाणी सुरक्षित राहण्यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे .त्यामुळे येथील जनतेने मला भरघोस मताने विजयी करावे ,असे आवाहनही उमेदवार वळसे पाटील यांनी केले.
पुणे म्हाडाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले निवडून दिलेल्या खासदाराने केवळ मतदारांची दिशाभूल चालवली आहे. कोणतेही काम न करता थेट लोकसभेनंतर विधानसभा निवडणुकीत भूलवलया करण्यासाठी ते येथे येतात, येथील समोरचे उमेदवार देवदत्त निकम यांची खिल्ली उडवताना आढळराव पाटील यांनी जोरदार टीका केली .ते म्हणाले देवदत्त निकम हे केवळ चुकीच्या पद्धतीने राजकारण करून विकास साध्य करू शकत नाही, शरद पवार यांच्या सभेत लाव रे व्हिडिओ म्हणणारे निकम यांनी रात्री घरी व्हिडिओ लावून पहावे. असा टोला लगावत निकम यांना आता पाडा, पाडा ,पाडा असे मी सांगतो .त्या पद्धतीने मतदाराने साथ द्यावी. असे आवाहन करून आढळराव पाटील म्हणाले .
वळसे पाटलांसारखा सुसंस्कृत नेता महाराष्ट्रा सहआंबेगाव विधानसभा मतदारसंघाला लाभला आहे .त्यामुळे त्यांना मतदान करून विकासाला साथ द्यावी आणि बोगद्याला साथ देणाऱ्यांचे पितळ उघडे पाडावे .असे आवाहनही त्यांनी केले. युवा नेत्या पूर्वा ताई वळसे पाटील यांनी गेल्या 35 वर्षात उमेदवार दिलीप वळसे पाटील यांनी प्रचंड विकास कामे करून आंबेगाव विधानसभा मतदारसंघाचे नाव जिल्ह्यासह राज्यात उंचावले आहे. त्यांच्यामुळे तालुक्याला कधीच कमीपणा आला नाही .परंतु आता समोरील उमेदवारांना विकास दिसतच नाही, हुतात्मा बाबू गेनू सागर डिंभे धरण चा बोगदा पाडून माणिक डोह धरणात पाणी नेण्याचा डाव अनेकांनी रचला. त्या माध्यमातून उमेदवार वळसे पाटील यांनी हे पाणी माणिकडोहद्वारे नगर जिल्ह्याला जाणार हे ओळखून स्वतःची आमदारकी किंवा राजकीय प्रतिष्ठा पणाला लावून भाजप सरकारमध्ये राष्ट्रवादी पक्ष सत्तेत सहभागी झाला .त्यावेळी ही भूमिका मला पटली नव्हती.
हेही वाचा: “…त्यामुळे त्यांना मतदानातून योग्य उत्तर द्या”; प्रचारादरम्यान वळसे पाटलांची विरोधकांवर जोरदार टीका
परंतु आता मात्र गेल्या दीड महिन्यात विधानसभा निवडणुकीत नगर जिल्ह्यातील काही आमदार ,काही खासदार डिंब्याचं पाणी माणिक डोह धरणात बोगद्याद्वारे नेण्याचा घाट रचत आहे. त्याचे व्हिडिओ पाहिल्यानंतर माझे बाबा आणि उमेदवार दिलीप वळसे पाटील यांनी राजकीय दृष्ट्या घेतलेला निर्णय योग्य आहे. यावर मी शिक्कामोर्तब केले. पाण्यामुळेच आंबेगावची समृद्धी टिकून आहे आणि चुकीच्या पद्धतीने विचार करून जर आपण विकासाला साथ देण्याऐवजी चुकीच्या पद्धतीने काम करणाऱ्या व्यक्तीला साथ दिली तर तालुक्यासह आजूबाजूच्या शेतीचेही प्रचंड नुकसान होईल. यासाठी उमेदवार दिलीप वळसे पाटील यांना मोठ्या बहुमताने विजयी करावे असे आवाहन करते.
उमेदवार दिलीप वळसे पाटील भाषणाला उभे राहतात अजित पवार दिलीप वळसे पाटील, आणि शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या विजयाच्या सततच्या घोषणांनी उमेदवार वळसे पाटील यांना भाषण सुरू करता येईना .अखेर शेवटी त्यांनी हात जोडून सर्वांना शांत राहण्याचे आवाहन करून भाषण सुरू केले .त्यावेळी अधून मधून जय जय कराच्या घोषणा होत होत्या. त्यावेळी वळसे पाटील यांनी पुन्हा मतदारांना शांत राहण्याचे आवाहन करून आपले भाषण सुरू केले.
हेही वाचा: “केवळ आमदारकी डोळ्यासमोर ठेवूनच ते…”; दिलीप वळसे पाटील यांची देवदत्त निकमांवर टीका