पुणे/ प्रतीक धामोरीकर: पावसाळ्यापूर्वी संसर्गजन्य आजारांपासून प्राण्यांचे संरक्षण करण्यासाठी पशुसंवर्धन विभागामार्फत पुणे जिल्ह्यात व्यापक लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. ही मोहीम १५ जूनपर्यंत राबविण्यात येणार असून आतापर्यंत जिल्ह्यात ५,७०,७९१ जनावरांचे लसीकरण करण्यात आले आहे. पावसाळ्यात डास, फर्या (ब्लॅक क्वार्टर – बीक्यू ), एन्टरोटॉक्सिमिया आणि लम्पी स्किन डिसीज (एलएसडी) सारख्या आजारांपासून जनावरांचे संरक्षण करणे हे त्याचे मुख्य उद्दिष्ट आहे.
या आजारांचा संसर्ग रोखण्यासाठी आणि पावसाळ्यात जनावरांच्या मृत्युदर कमी करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने विशेष प्रयत्न केले आहेत. मोहिमेअंतर्गत मिळालेल्या ५,९७,२०० लसींचा साठा गावपातळीवर वितरित करण्यात आला आहे. मान्सूनपूर्व लसीकरणात ३,४७,३९६ गायी, ३६,८०८ म्हशी आणि २८,०७४ वासरांचे लसीकरण करण्यात आले आहे. जिल्ह्यात १५ मे पर्यंत लम्पी स्किन डिसीजचे लसीकरण पूर्ण झाले असून इतर संसर्गजन्य आजारांसाठी मोहीम सुरू असल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विष्णु गर्जे ह्यांनी दिली.
जनावरे कोणत्या आजारांना बळी पडतात?
पावसाळ्यात जनावरांना अनेक आजार होण्याची शक्यता असते. त्यात मुख्तय फर्या (ब्लॅक क्वार्टर – बीक्यू): हा एक गंभीर आजार आहे ज्यावर वेळेवर उपचार न केल्यास जनावरांचा मृत्यू होऊ शकतो. पुणे जिल्ह्यात गायींना या आजारापासून वाचवण्यासाठी बीक्यू लस दिली जात आहे. आतापर्यंत २५,१६२ बीक्यू डोस देण्यात आले आहेत.
घटसर्प (हेमोरेजिक सेप्टीसीमिया – एचएस): या आजारात मृत्युदर बराच जास्त आहे. विशेष लसीकरण मोहिमेत गायी आणि म्हशींना एचएस लस दिली जात आहे. आतापर्यंत १,३८,०९६ घटसर्प च्या लसी देण्यात आल्या आहेत. घट्टसर्प स्किन डिसीज (एलएसडी) हा आजार पावसात वेगाने पसरतो आणि वेळेवर उपाययोजना न केल्यास जनावरांचा मृत्यू होऊ शकतो.
अंत्रविषार (एन्टरोटॉक्सिमिया): या आजारासाठी प्राण्यांनाही लसीकरण केले जात आहे, त्यापैकी १,८३,४४८ डोस देण्यात आले आहेत.
जिल्ह्यातील सर्व सरकारी पशुवैद्यकीय रुग्णालयांमध्ये मान्सूनपूर्व उपाययोजने अंतर्गत पाळीव प्राण्यांना लसीकरण केले जात आहे. संसर्गजन्य रोगांपासून प्राण्यांचे संरक्षण करण्यासाठी, शेतकरी आणि पशुपालकांनी त्यांच्या जवळच्या पशुवैद्यकीय रुग्णालयात जाऊन त्यांच्या प्राण्यांना लसीकरण करून घ्यावे.
– डॉ. विष्णू गर्जे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद पुणे,
आतापर्यंत लसीकरण (रोगानुसार):
घटसर्प: १,३८,०९६
फर्या: (BQ): २५,१६२
एंटरोटॉक्सिमिया: १,८३,४४८
तहसीलनिहाय लसीकरण आकडेवारी:
तहसील
लसीकरण क्रमांक
जुन्नर – ५४,९१३
आंबेगाव- ४७,९९५
खेड- ४४,२००
हवेली- २७,०८८
मावळ- १९,७७२
मुळशी- १२,६८०
वेल्हा- ७,३७८
भोर- १७,४८९
पुरंदर- 31,200
बारामती- ९३,७४७
इंदापूर- ८५,३५३
दौंड – ५५,८१६
शिरूर – ७३,१६०
संपूर्ण लसीकरण :५,७०,७९१