Pune News: महापालिकेच्या मिळकतकर विभागात ‘कुंपणच खातय शेत’; मनसेने केला 'हा' मोठा आरोप
पुणे: मिळकतदारांना कर भरायचाय पण, मिळकत कर विभागाचे कर्मचारीच नाेंदणीसाठी अवास्तव पैशाची मागणी करीत आहे, असा आरोप मनसेने केला आहे. येथे कुंपणच शेत खात असल्याचा फटका प्रामाणिक करदात्यांना दरमहा दंडाच्या रुपाने बसत आहे. या प्रकरणी चाैकशी करावी अशी मागणी पक्षाने केली आहे. गेल्या काही दिवसापासून महापालिकेचा मिळकत कर विभाग हा सातत्याने चर्चेत राहीला आहे.
आर्थिक वर्षाच्या शेवटच्या काही दिवसांत या वर्षाचे अपेक्षित उत्पन्नाचा आकडा गाठण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. त्याचवेळी महापािलकेच्या कर आकारणी व संकलनविभागावर राजकीय पक्ष, स्वंयसेवी संस्थांकडून टिकेची झाेड उठविली जात आहे. यामध्ये मिळकत करात चाळीस टक्के सवलत देण्याचा हा महत्वाचा विषय आहे. प्रशासनाने नव्या आर्थिक वर्षाची मिळकत कराची बिले पाठविताना, त्यांना चाळीस टक्के सवलत दिली गेली आहे, की नाही याचा स्पष्ट उल्लेख केला जाईल असे स्पष्ट केले आहे.
याचप्रमाणे महापािलकेच्या कर आकारणी आणि कर संकलनविभागाकडून नवीन मिळकतींवर कर आकारणी केली जात नाही असा आरोप केला जात आहे. याचसंदर्भात मनसेच्या शिष्टमंडळाने महापािलका आयुक्त डाॅ. राजेंद्र भाेसले यांची भेट घेतली. पक्षाचे नेते बाबू वागसकर, अॅड. गणेश सातपुते, बाळा शेडगे, अजय शिंदे आणि शहराध्यक्ष साईनाथ बाबर आदींनी भेट घेतली. तसेच त्यांना एका बांधकाम व्यावसाियकाशी संपर्क साधुन त्याला आलेल्या मिळकत कर विभागाच्या कर्मचाऱ्यांविषयीचा अनुभव ऐकविला.
Pune News: पुणे महापालिकेच्या ‘या’ कामांचे ‘थर्ड पार्टी ऑडिट’ होणार; मंत्री उदय सामंत
पुर्णत्वाचा दाखला दिला, पण बिले नाहीत
महापािलकेच्या हद्दीत माेठ्या प्रमाणावर निवासी बांधकामे सुरु आहेत, काम झालेल्या इमारतींना पुर्णत्वाचा दाखला दिला गेला. त्याठिकाणी नागरीक राहण्यास गेले आहेत. परंतु तेथील मिळकतीवर कर आकारणी केली गेली नाही. कर भरत नसतानाही त्यांना सर्व सुविधा मिळत आहे. ही कर आकारणी करण्यासाठी रहीवासी संबंधित बांधकाम व्यावसाियकाकडे पाठपुरावा करीत आहेत. परंतु, सदर कामासाठी महापािलकेच्या कर्मचाऱ्यांकडून अवास्तव पैशाची मागणी केली जात आहे, असा प्रकार समाेर आल्याचा दावा मनसेने निवेदनात केला आहे.
नाहक दंड साेसावा लागणार
नवीन मिळकतींची केवळ नाेंदणी झाली नाही, म्हणून त्यांच्यावर कर आकारणी हाेत नाही. पुर्णत्वाचा दाखला, भाेगवटा पत्र देण्यात आलेल्या अनेक इमारती असुन, ज्या ठिकाणी कर अकरणीसाठी नाेंदणीच केली गेली नाही. महापािलकेकडून नाेंदणीसाठी दुर्लक्ष केले जात आहे. त्याचा फटका मिळकतदाराला दर महा दाेन टक्के दंड आकारणीमुळे बसू शकताे. या प्रकारामुळे महापािलकेचे नुकसान हाेत आहे . मिळकत कर अाकारणीच्या कामात हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी मनसेने केली आहे.