Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Election : भाजपसमोर शिंदेंच्या शिवसेनेचे आव्हान; युतीचा सस्पेन्स आज संपणार

महापालिका निवडणुकीत अर्ज माघारीच्या दिवशी शिंदेची शिवसेना आणि भाजप यांच्यात तडजाेड हाेण्याची चिन्हे नाहीत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jan 02, 2026 | 11:39 AM
भाजपसमोर शिंदेंच्या शिवसेनेचे आव्हान; युतीचा सस्पेन्स आज संपणार

भाजपसमोर शिंदेंच्या शिवसेनेचे आव्हान; युतीचा सस्पेन्स आज संपणार

Follow Us
Follow Us:
  • भाजपसमोर शिंदेंच्या शिवसेनेचे आव्हान
  • माघारीचा निर्णय अशक्यच
  • युतीचा सस्पेन्स आज संपणार
पुणे : महापालिका निवडणुकीत अर्ज माघारीच्या दिवशी शिंदेची शिवसेना आणि भाजप यांच्यात तडजाेड हाेण्याची चिन्हे नाहीत. शिंदेंच्या शिवसेनेने माेठ्या संख्येने उमेदवार उभे केल्यामुळे त्यांचे अर्ज माघारी घेण्याचे आव्हान साेपे नाही. यामुळे मैत्रीपुर्ण लढत हाच एकमेव पर्याय दाेन्ही पक्षांसमोर आहे.

उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत शिंदेची शिवसेना आणि भाजप यांच्यातील जागा वाटपाचे सुत्र जमले नाही. या गाेंधळाच्या परीस्थितीत शिंदेंच्या शिवसेनेकडून माेठ्या संख्येने अर्ज वाटप केले गेले. या पार्श्वभुमीवर भाजपने अजुनही शिवसेनेला १६ जागा देण्याची तयारी दाखविली आहे. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर माेहाेळ यांनी शिवसेनेशी युती हाेईल असा विश्वास पत्रकार परीषदेत केला आहे. या परीषदेत त्यांनी स्थानिक पातळीवरील नेत्यांमध्ये जागांबाबत एकमत झाले नाही. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महायुतीबाबत निर्णय घेतील असे स्पष्ट केले. वास्तविक शिंदेंच्या शिवसेनेकडेे आता एकच नगरसेवक असताना त्यांनी जास्त जागा मागणे व्यवहार्य वाटले नाही, असे माेहाेळ यांनी नमूद केले.

भाजपकडून पहील्या दिवसापासून शिंदेंच्या शिवसेनेबराेबर युती हाेईल असा दावा केला. प्रत्यक्षात १६५ म्हणजे सर्वच जागांवर त्यांनी उमेदवार उभे केले आहेत. तर शिंदेच्या शिवसेनेने तब्बल २६ प्रभागांमध्ये शंभरहून अधिक उमेदवार उभे करून भाजपसमोर थेट राजकीय आव्हान उभे केले आहे. त्यामुळे युतीचा अंतिम निर्णय झाला, तरी मोठ्या प्रमाणावर दिलेले एबी फॉर्म आणि भरलेले उमेदवारी अर्ज माघारी घेणे हे दोन्ही पक्षांसाठी मोठे संकट ठरणार आहे.

उमेदवारी नाकारल्यामुळे भाजपमध्ये माेठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त हाेत आहे. त्यातच आता शिवसेनेला जागा साेडण्यासाठी आपल्याच उमेदवारांना अर्ज माघारी घेण्यास सांगण्याचे धाडस त्यांना करावे लागणार आहे. शिंदेंच्या शिवसेनेने ४० ते ४५ जागांची मागणी केली, तर भाजपने सुरुवातीला मर्यादित जागांचीच तयारी दर्शविली. पुढे झालेल्या चर्चेत १६ जागा देण्याची तयारी भाजपने दाखविली हाेती. परंतु भाजपसाेबत जाण्यावरून शिंदेंच्या शिवसेनेत स्थानिक पातळीवर एकमत झाले नाही. शहरप्रमुख नाना भानगिरे यांनी देखील पक्षाच्या बैठकीतून काढता पाय घेतला हाेता.

माघारीचा निर्णय अशक्यच

शिंदेच्या शिवसेनेतील अंतर्गत वाद वाढत गेला, शेवटी शिवसेनेनेही मोठ्या संख्येने एबी फॉर्म देत उमेदवार मैदानात उतरवले. दाेन्ही पक्षांच्या नेत्यांनी युती करण्याचा निर्णय घेतला तर भाजपला जेमतेम १५ ते २० जागांवरील उमेदवार माघारी घ्यावे लागतील, तर शिवसेनेसमोर ८० हून अधिक उमेदवारांचे अर्ज मागे घेण्याचे आव्हान उभे आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आज संपत आहे. यामुळे एवढ्या कमी वेळेत युतीचा आणि माघारीचा निर्णय हाेण्याची चिन्हे दिसत नाही.

शिवसेनेने उमेदवार उभे केलेले प्रभाग

प्रभाग क्र. 1, 3, 5, 6, 10, 11, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 24, 30, 32, 33, 34, 36, 37, 38, 39, 40, 41

Web Title: A decision on the alliance between bjp and shindes shiv sena in pune will be taken today

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 02, 2026 | 11:39 AM

Topics:  

  • BJP
  • Election News
  • pune news

संबंधित बातम्या

Digital Board: कधीकाळी ब्रशच्या फटकाऱ्यांतून सजायची दुकानाची पाटी; आता डिजिटल बोर्डांनी घेतली जागा
1

Digital Board: कधीकाळी ब्रशच्या फटकाऱ्यांतून सजायची दुकानाची पाटी; आता डिजिटल बोर्डांनी घेतली जागा

Cricket: “वय ५० पार, उत्साह मात्र तरूणपणीचाच! पुण्यात रंगणार ‘रायझिंग स्टार करंडक’चा टी-२० थरार’
2

Cricket: “वय ५० पार, उत्साह मात्र तरूणपणीचाच! पुण्यात रंगणार ‘रायझिंग स्टार करंडक’चा टी-२० थरार’

NCC च्या विस्ताराला पायाभूत सुविधांचा अडथळा? महाराष्ट्रात प्रशिक्षण व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर
3

NCC च्या विस्ताराला पायाभूत सुविधांचा अडथळा? महाराष्ट्रात प्रशिक्षण व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर

देशसेवेचा अभिमान, आधुनिक कौशल्यांची जोड! NCC कॅडेट्सना आता ड्रोन प्रशिक्षणासह सायबर सुरक्षेचे धडे
4

देशसेवेचा अभिमान, आधुनिक कौशल्यांची जोड! NCC कॅडेट्सना आता ड्रोन प्रशिक्षणासह सायबर सुरक्षेचे धडे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.