
पुण्यातील प्रभाग क्रमांक ९ मध्ये किरण चांदेरे यांनी मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे मध्यरात्री परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. मतदारांना प्रभावित करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी बाणेर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून, या घटनेमुळे निवडणूक प्रचारातील आचारसंहितेच्या नियमांवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
PCMC Election 2026: ‘माझ्यावर ७० हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप करण्यांसोबत मी आज सत्तेत…’; अजित
बाबूराव चांदेरे, किरण चांदेरे यांच्यासह आणखी १३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. या सर्वांनी मतदारसंघात मतदारांच्या याद्या बाळगणे तसेच मतदारांना प्रभावित करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. बाबुराव चांदेरे हे पुण्यातील प्रभाग क्रमांक ९ मधून राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निवडणूक लढवत आहेत. आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी तसेच भारतीय न्याय संहिता कलम २२३, कलम १७१ आणि कलम ७४ अंतर्गत संबंधितांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पुण्यातील प्रभाग क्रमांक ९ मध्ये बाबुराव चांदेरे यांनी मतदारसंघात पैसे वाटल्याचा आरोप काल विविध राजकीय पक्षांकडून करण्यात आला होता. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे उमेदवार बाबुराव चांदेरे यांच्या मुलाने पैसे वाटल्याची तक्रार थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आल्याची माहिती आहे.
Maharashtra Politics : महायुतीमध्ये आली नामुष्की? अजित पवारांची पोलखोल अन् रवींद्र चव्हाणांचा पलटवार
या प्रकरणात प्रभाग ९ मधील भाजपचे उमेदवार गणेश कळमकर यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करून तक्रार नोंदवली होती. दरम्यान, भाजपच्या कार्यकर्त्यांनी रात्री एका महिलेला पकडले असून, ही महिला प्रभागातील महिलांची नावे लिहून घेत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. संबंधित महिलेने चौकशीत चांदेरे यांचे नाव घेतल्याचे व्हिडिओमध्ये दिसत असल्याचा दावा करण्यात आला आहे. या प्रकरणी बाबुराव चांदेरे यांचा मुलगा किरण चांदेरे याच्यासह सिद्धु कालशेट्टी, राजू चौकीमट आणि परेश मुरकुटे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.