Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बारामतीतल्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराची थेट नागपूर कारागृहात रवानगी, MPDA कायद्यांतर्गत १ वर्षासाठी जेल

सुरेंद्र रवींद्र काजळे याला थेट नागपूर मध्यवर्ती कारागृहात एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले आहे. पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे बारामती परिसरातील गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Mar 08, 2026 | 07:04 PM
( फोटो सौजन्य : AI )

( फोटो सौजन्य : AI )

Follow Us
Follow Us:
  • थेट नागपूर मध्यवर्ती कारागृहात एक वर्षासाठी स्थानबद्ध
  • पुन्हा नव्याने गुन्हे करत असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न
  • कसा आवळला कायद्याचा फास?
Baramati News : बारामती तालुका पोलिसांनी गुन्हेगारी प्रवृत्तींना मोठा धक्का देत एका सराईत गुन्हेगारावर कठोर ‘एमपीडीए’ (MPDA) कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. अनेक गंभीर गुन्हे दाखल असूनही वर्तणुकीत सुधारणा न दाखवणाऱ्या सुरेंद्र रवींद्र काजळे याला थेट नागपूर मध्यवर्ती कारागृहात एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले आहे. पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे बारामती परिसरातील गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.

वाहतूक कोंडी कमी होणार! विद्यापीठ चौकातील एकात्मिक दुमजली उड्डाणपूल पुणेकरांच्या सेवेत

गंभीर गुन्ह्यांची मालिका

मिळालेल्या माहितीनुसार, तांदुळवाडी (ता. बारामती) येथील रहिवासी असलेल्या सुरेंद्र काजळे याच्यावर पुणे ग्रामीण आणि बारामती परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण केल्याचा ठपका आहे. त्याच्यावर दरोडा, गंभीर दुखापत करणे, विनयभंग, मारामारी आणि फसवणूक यांसारखे अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे विविध पोलीस ठाण्यांत दाखल आहेत. वारंवार कारवाई होऊनही त्याच्या गुन्हेगारी कृत्यांमध्ये खंड पडत नव्हता, उलट तो पुन्हा नव्याने गुन्हे करत असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झालं आहे.

कसा आवळला कायद्याचा फास?

गुन्हेगारी कारवायांना कायमचा आळा घालण्यासाठी बारामती तालुका पोलिसांनी त्याच्याविरुद्ध ‘महाराष्ट्र झोपडपट्टीदादा, धोकादायक व्यक्ती व विघातक कृत्यास आळा घालण्याबाबत अधिनियम १९८१’ (MPDA) नुसार प्रस्ताव तयार केला. हा प्रस्ताव पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आला होता. जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व कागदपत्रांची आणि गुन्ह्यांच्या रेकॉर्डची सखोल छाननी करून, आरोपीला समाजासाठी धोकादायक ठरवत एक वर्षाच्या स्थानबद्धतेचे आदेश दिले. आदेश मिळताच पोलिसांनी तातडीने सुरेंद्र काजळेला ताब्यात घेऊन त्याची रवानगी नागपूर जेलमध्ये केली.

पोलिसांचा कडक इशारा

ही यशस्वी कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, बारामती तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहाय्यक निरीक्षक विक्रम पवार आणि त्यांच्या टीमचा मोलाचा वाटा आहे.

“सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेला बाधा आणणाऱ्या कोणत्याही गुन्हेगाराची गय केली जाणार नाही,” असा स्पष्ट इशारा या कारवाईतून पोलिसांनी दिला आहे. या निर्णयामुळे तांदुळवाडी आणि बारामती परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला असून, पोलिसांच्या या धाडसी पावलाचे सर्वत्र स्वागत केलं जात आहे.

धर्मवीर संभाजी प्रतिष्ठानची कार्यकारणी जाहीर; अध्यक्षपदी नगरसेवक राघवेंद्र बाप्पु मानकर यांची निवड

Web Title: Mpda action surendra kajale sent to nagpur jail

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 08, 2026 | 07:04 PM

Topics:  

  • baramati
  • Baramati Crime
  • Baramati Crime News

संबंधित बातम्या

Baramati News : जुन्या वादाचा खतरनाक शेवट! कोयत्याने सपासप वार; २४ तासांत दोघे जेरबंद
1

Baramati News : जुन्या वादाचा खतरनाक शेवट! कोयत्याने सपासप वार; २४ तासांत दोघे जेरबंद

Baramati Politics: ‘अजितदादा, बघताय ना सोमेश्वरकडे?’; पार्थ पवारांना  इशारा देणारे पत्र बारामतीत व्हायरल!
2

Baramati Politics: ‘अजितदादा, बघताय ना सोमेश्वरकडे?’; पार्थ पवारांना इशारा देणारे पत्र बारामतीत व्हायरल!

Baramati Power Outrage: बारामती तालुक्यात अवेळी भारनियमनाचा त्रास! शेतकरी अन् व्यापारी त्रस्त
3

Baramati Power Outrage: बारामती तालुक्यात अवेळी भारनियमनाचा त्रास! शेतकरी अन् व्यापारी त्रस्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.