Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

MSRTC च्या NCMC कार्ड ला प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; पुण्यात महिनाभरात १ लाखांहून अधिक अर्ज

MSRTC Bus News : एसटी प्रवासाचे हक्काचे ओळखपत्र तयार करण्यासाठी शासनाने सुरू केलेल्या 'नॅशनल कॉमन मोबिलिटी'ला चांगला प्रतिसाद मिळत आहे. पुणे विभागातून तब्बल १ लाखांहून अधिक नागरिकांनी या कार्डसाठी अर्ज केला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: May 10, 2026 | 05:20 PM
MSRTC Smart Card

MSRTC Smart Card

Follow Us
Follow Us:
  • ST प्रवाशांसाठी मोठी अपडेट
  • प्रवासासाठी मिळणार नवे कार्ड
  • ३० दिवसांत उपलब्ध होणार सुविधा
MSRTC Smart Card : चंद्रकांत कांबळे : एसटी प्रवासाचे हक्काचे ओळखपत्र तयार करण्यासाठी शासनाने सुरू केलेल्या ‘नॅशनल कॉमन मोबिलिटी’ला चांगला प्रतिसाद मिळत असून, एका महिन्यात केवळ पुणे विभागातून तब्बल १ लाखांहून अधिक नागरिकांनी या कार्डसाठी अर्ज दाखल केले आहेत. त्यापैकी तब्बल ११ हजार प्रवाशांना हे मोबिलीटी कार्ड मिळाले देखील आहे. प्रवास करताना आता या प्रवाशांना आधार कार्ड किंवा इतर कागदपत्रे दाखविण्याची गरज भासणार नाही.

महाराष्ट्राचं ‘लय भारी’ जोडपं, आता लालपरीचा चेहरा! “जेनेलिया रितेश देशमुख” ST चे नवे Brand Ambassador

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) वतीने एसटी प्रवाशांसाठी हे कार्ड खास तयार करण्यात येत आहे. १ एप्रिल पासून या कार्डसाठी अर्ज दाखल करण्यास सुरूवात झाली आहे. एसटी प्रवाशांसाठी वेगवेगळ्या योजना आहेत. महिला, ज्येष्ठ तसेच विद्यार्थ्यांसाठी अर्धे तिकेटावरून प्रवास करता येतो. परंतु, त्यांना त्यासाठी आधार कार्ड तसेच मतदान कार्ड दाखवावे लागत होते. त्यातून काही गैरप्रकार देखील आढळून आले होते. त्यापार्श्वभूमीवर महामंडळाकडून मोबिलिटी कार्ड हा पर्याय सुरू करण्यात आला आहे. या कार्डमुळे पारदर्शकता येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

पुणे विभागातून नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्डसाठी तब्बल १ लाख ६ हजार ५३४ ज्येष्ठ नागरिक व महिला प्रवाशांनी नोंदणी केली आहे. आतापर्यंत ११ हजार ५८५ प्रवाशांना कार्ड वितरित करण्यात आले आहे. मोबिलिटी कार्ड वितरणासाठी ८५ अधिकृत विक्रेत्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्येक आगर आणि बसस्थानकांवर ही कार्ड उपलब्ध करून देण्यात येत आहेत. नवीन एनसीएमसी कार्ड घेणाऱ्या प्रवाशांसाठी १९९ रुपये, तर यापूर्वी समार्ट कार्ड असलेल्या प्रवाशांसाठी १४९ रुपये असा दर निश्चित करण्यात आला आहे. सध्या महिला, ज्येष्ठ नागरिक आणि ‘अमृत’ ज्येष्ठ नागरिक यांची नोंदणी व कार्ड वितरण प्रक्रिया सुरू असून, टप्प्याटप्प्याने इतर सवलतधारक प्रवाशांचाही या योजनेत समावेश करण्यात येणार आहे.

महामंडळाच्या सूचनेनुसार, लवकरच सर्व सवलतधारक प्रवाशांसाठी एसटी प्रवासादरम्यान एनसीएमसी कार्ड वापरणे अनिवार्य केले जाणार आहे. त्यामुळे प्रवास अधिक सुलभ होण्याबरोबरच सवलतींचा लाभ अचूक आणि डिजिटल पद्धतीने देणे शक्य होणार आहे. तसेच, या कार्डद्वारे तिकीट वितरण, कार्ड टॉप-अप आणि इतर व्यवहारांसाठी देखील ही कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे.

नोंदणी नंतर ३० दिवसांनी मिळते कार्ड : अधिकृत कार्ड विक्रेत्यांकडून नोंदणी केल्यानंतर ३० दिवसांनी एनसीएमसी कार्ड विक्रेत्यांकडे येते. त्यानंतर कार्ड ऍक्टिव्हेट करुन प्रवाशांना दिले जाते.

सवलत धारकांसाठीच कार्ड वितरण : सध्या महिला,ज्येष्ठ नागरिक,अमृत ज्येष्ठ नागरिक या सवलत धारक प्रवाशांसाठीच कार्ड रजिस्ट्रेशन आणि विरतरण चालू आहे.

पुणे एसटी विभागाचे विभागीय वाहतूक अधिकारी कमलेश धरनाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या टप्प्यात महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिक यांची नोंदणी सुरू आहे. त्यांनी स्पष्ट केले की, याचे स्वरूप टप्प्याटप्प्याने वाढवण्यात येईल. नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (एनसीएमसी) पूर्णपणे सक्तीचे करण्यात आले नाही.त्यामुळे कार्ड काढण्यासाठी गर्दी करु नये.

आता ‘लालपरी’ झाली स्मार्ट! ST प्रवाशांसाठी देशातील पहिले राज्यव्यापी ‘NCMC’ कार्ड लाँच, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

Web Title: Msrtc ncmc card gets huge response over 1 lakh applications in pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 10, 2026 | 05:20 PM

Topics:  

  • Marathi News
  • MSRTC Bus

संबंधित बातम्या

World News : स्वीडनने माफी मागावी ;सामी लोकांवरील अन्यायाची कबुली
1

World News : स्वीडनने माफी मागावी ;सामी लोकांवरील अन्यायाची कबुली

Mumbai University : विद्यार्थी–कुलगुरू संवादातून प्रश्नांच्या निराकरणाला गती; तक्रारी समजून घेत प्रभावी कार्यवाही
2

Mumbai University : विद्यार्थी–कुलगुरू संवादातून प्रश्नांच्या निराकरणाला गती; तक्रारी समजून घेत प्रभावी कार्यवाही

Breaking News :आम्हाला तेल विकू दिले नाही तर कोणालाही तेल विकता येणार नाही ;इराणचा इशारा
3

Breaking News :आम्हाला तेल विकू दिले नाही तर कोणालाही तेल विकता येणार नाही ;इराणचा इशारा

Maharashtra Drought :दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर भव्य गरबा-दांडिया रद्द करा; खर्च शेतकरी आणि ग्रामीण भागासाठी वळवा
4

Maharashtra Drought :दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर भव्य गरबा-दांडिया रद्द करा; खर्च शेतकरी आणि ग्रामीण भागासाठी वळवा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.