Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 26 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बाजार समिती निवडणुकीसाठी राष्ट्रवादीची जोरदार तयारी; वळसे पाटील अन् कटकेंना उमेदवार निवडीचे सर्वाधिकार

शिरुर कृषि उत्पन्न बाजार समितीची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीने व एकदिलाने लढविण्याचा निर्धार पक्षाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुक्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 02, 2026 | 03:59 PM
बाजार समिती निवडणुकीसाठी राष्ट्रवादीची जोरदार तयारी; वळसे पाटील अन् कटकेंना उमेदवार निवडीचे सर्वाधिकार

बाजार समिती निवडणुकीसाठी राष्ट्रवादीची जोरदार तयारी; वळसे पाटील अन् कटकेंना उमेदवार निवडीचे सर्वाधिकार

Follow Us
Follow Us:

रांजणगाव गणपती : ५ जुलै रोजी मतदान होत असलेली शिरुर कृषि उत्पन्न बाजार समितीची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीने व एकदिलाने लढविण्याचा निर्धार पक्षाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुक्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. बाजार समितीच्या निवडणूकीत माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील व शिरुर हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर कटके यांना उमेदवार निवडीचे सर्वाधिकार या बैठकीत देण्यात आले.

 

आमदार कटके यांच्या अध्यक्षेतेखाली झालेल्या या बैठकीला जिल्हा परिषदेचे माजी सभापती मंगलदास बांदल, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रविंद्र काळे, प्रकाश पवार, आंबेगाव शिरुर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर, जिल्हा परिषद सदस्य प्रफुल्ल शिवले, दादा पाटील फराटे, माजी सभापती शशिकांत दसगुडे, आबाराजे मांढरे,विठ्ठल ढेरंगे, पंचायत समितीचे उपसभापती रामभाऊ सासवडे, आरती भुजबळ, बाबासाहेब फराटे, राजेंद्र जगदाळे, विजय रणसिंग, राजेंद्र गदादे, बबनराव वाळके, विठ्ठल घावटे आदीसह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

बाजार समिती ही शेतकरी, व्यापारी आणि सहकार क्षेत्राशी निगडीत अत्यंत महत्वाची संस्था असून, या बाजार समितीवर पुन्हा एकहाती झेंडा फडकविण्यासाठी पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मतभेद व गटतट विसरून एकदिलाने काम करावे, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर प्रथमच ही निवडणूक होत असून, दादांना श्रद्धांजली म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा बाजार समितीवर फडकविण्यासाठी सर्वांनी सज्ज होण्याचे आवाहन आमदार कटके यांनी केले.

हे सुद्धा वाचा : कवडीपाठ टोल नाका परिसरात अपघातांची मालिका सुरुच, नागरिक संतप्त; प्रशासनाला दिला ‘हा’ गंभीर इशारा

या निवडणुकीसाठी अंतिम उमेदवार निश्चित करण्याचे सर्वाधिकार माजी गृहमंत्री वळसे पाटील व आमदार कटके यांना देण्याचे या बैठकीत स्पष्ट करण्यात आले. या निवडणुकीसंदर्भात वरिष्ठ नेतृत्वाने घेतलेले निर्णय सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व इच्छुक उमेदवारांनी एकदिलाने मान्य करुन पक्षाच्या अधिकृत उमेदवारांना निवडून आणण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी पूर्ण ताकदीने काम करावे, असेही या बैठकीत स्पष्ट करण्यात आले.

हे सुद्धा वाचा : कांद्याला हमी भाव देण्याच्या मागणीसाठी महाविकास आघाडीचा विराट क्रांती महामोर्चा; पुणे- नाशिक महामार्ग रोखला

Web Title: Ncp is preparing vigorously for the shirur agricultural produce market committee elections

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 02, 2026 | 03:59 PM

Topics:  

  • Dilip Walase Patil
  • Election News
  • Shirur News

संबंधित बातम्या

सराईत गुन्हेगारावर गोळीबार करुन खुनाचा प्रयत्न; 5 आरोपींना सापळा रचून पकडले
1

सराईत गुन्हेगारावर गोळीबार करुन खुनाचा प्रयत्न; 5 आरोपींना सापळा रचून पकडले

राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा लवकरच वाजणार बिगूल; अंतिम मतदार यादी 4 ऑगस्टला होणार प्रसिद्ध
2

राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा लवकरच वाजणार बिगूल; अंतिम मतदार यादी 4 ऑगस्टला होणार प्रसिद्ध

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.