
आंबेगावच्या आरोग्य यंत्रणेला बळ, तांबडेमळा रुग्णालयासाठी 40 कोटींचा निधी मंजूर; दिलीप वळसे पाटलांची माहिती
आरोग्य आणि पायाभूत सुविधांचे भक्कम जाळे
वळसे पाटील पुढे म्हणाले, “तालुक्यात पाबळ, घोडेगाव आणि मंचर येथे अत्याधुनिक आरोग्य सुविधांचे सक्षम जाळे उभारण्यात आले आहे. महामार्गावरील अपघातग्रस्तांना तातडीने उपचार मिळावेत यासाठी मंचर येथे सर्वोपचार अपघात केंद्र (ट्रॉमा केअर सेंटर) सुरू करण्यात आले आहे. आरोग्याबरोबरच शिक्षण क्षेत्रातही अभियांत्रिकी महाविद्यालय आणि दुर्गम भागातील आदिवासी विद्यार्थ्यांसाठी निवासी शाळांची उभारणी झाली आहे. मंचर शहराचा विकास आराखडा (डीपी) तयार झाला असून, शहराचा नियोजनबद्ध विकास साधण्यावर आमचा भर राहील.”
आंबेगाव तालुक्याची विकासात मोठी भरारी
पुणे म्हाडाचे अध्यक्ष व माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी यावेळी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, “आंबेगाव तालुक्याने आरोग्य, शिक्षण, रोजगार आणि मूलभूत पायाभूत सुविधांमध्ये मोठी प्रगती केली आहे. या सर्वंकष विकासामध्ये दिलीप वळसे पाटील यांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे.” यावेळी माजी आमदार पोपटराव गावडे आणि जिल्हा शल्यचिकित्सक अंबादास देवमाने यांचीही समयोचित भाषणे झाली. शरद सहकारी बँकेचे अध्यक्ष देवेंद्रशेठ शहा यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कार्याची प्रशंसा करत, आदिवासी भागात मोफत नेत्रतपासणी व चष्मे वाटप तसेच कुपोषणमुक्तीसाठी ठोस पावले उचलली जातील, असे नमूद केले.
मान्यवरांची मोठी उपस्थिती
कार्यक्रमास पूर्वा वळसे पाटील, नेत्रा शहा, भैरवनाथ पतसंस्थेचे उपाध्यक्ष सागर काजळे, पंचायत समितीचे सभापती कैलासबुवा काळे, नगराध्यक्ष संदीप (लक्ष्मण) थोरात, जिल्हा परिषद सदस्य विष्णु हिंगे पाटील, महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सुषमा शिंदे, आदिवासी नेते सुभाषराव मोरमारे, तालुका खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष नवनाथ हुले यांच्यासह विविध क्षेत्रांतील पदाधिकारी, डॉक्टर्स, कर्मचारी व आशा सेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
Ans: तांबडेमळा रुग्णालयाच्या विविध विकासकामांसाठी ४० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून, येथे लवकरच १०० खाटांचे सुसज्ज रुग्णालय सुरू होणार आहे.
Ans: मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात महिलांसाठी विशेष आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन असल्याची माहिती माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.
Ans: पाबळ, घोडेगाव आणि मंचर येथे अत्याधुनिक आरोग्य सुविधांचे जाळे उभारण्यात आले आहे. तसेच महामार्गावरील अपघातग्रस्तांना तातडीने उपचार मिळावेत यासाठी मंचर येथे ट्रॉमा केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे.