Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पहिल्यांच झाली फुरसुंगी-उरुळी देवाची नगरपरिषदेसाठी उपनगराध्यक्षाची लढत; ओंकार कामठेंनी मारली बाजी

Pune News : फुरसुंगी–उरुळी देवाची नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे ॲड. ओंकार मच्छिंद्र कामठे यांची 20 विरुद्ध 8 मतांनी निवड झाली.

  • By प्रीति माने
Updated On: Jan 18, 2026 | 11:40 AM
NCP Onkar Kamthe elected as the Deputy Chairperson of the Fursungi-Uruli Devachi Municipal Council

NCP Onkar Kamthe elected as the Deputy Chairperson of the Fursungi-Uruli Devachi Municipal Council

Follow Us
Close
Follow Us:
  • फुरसुंगी–उरुळी देवाची नगरपरिषदेमध्ये चुरस
  • उपनगराध्यक्ष पदासाठी निवडणूक पार
  • ॲड. ओंकार मच्छिंद्र कामठे यांनी मिळवले यश
Pune Political News : फुरसुंगी (पुणे) : राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची (Local Body Elections) रणधुमाळी आता संपली आहे. महापालिका निवडणूका झाल्या असून काही दिवसांपूर्वी नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणुका देखील पार पडल्या आहेत. यानंतर आता नदर परिषदांमध्ये उपनगराध्यक्ष पदासाठी कोणाची निवड होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नव्याने तयार झालेल्या फुरसुंगी-उरुळी देवाची नगरपरिषदेमध्ये उपनगराध्यक्ष पदासाठी उत्सुकता निर्माण झाली होती. (Pune Political News) पहिल्यांदाच झालेल्या या निवडीमध्ये 20 विरुद्ध 8 मतांनी राष्ट्रवादीचा झेंडा फडकला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीने प्रथमच झालेल्या निवडणुकीत ऐतिहासिक यश मिळवले आहे.

फुरसुंगी–उरुळी देवाची नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे ॲड. ओंकार मच्छिंद्र कामठे यांची 20 विरुद्ध 8 मतांनी निवड झाली. गुरुवारी (ता. 15) नगराध्यक्ष संतोष फकीरा सरोदे यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक पार पडली. यावेळी निवडणूक सहायक म्हणून मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांनी काम पाहिले.

हे देखील वाचा : पुणेकरांसाठी अत्यंत महत्वाची बातमी! ग्रँड चॅलेंज टूरनिमित्त उद्या ‘हे’ प्रमुख रस्ते राहणार बंद

उपनगराध्यक्ष पदासाठी गुरुवारी (दि. 15 जानेवारी) सकाळी नगराध्यक्ष संतोष सरोदे यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे ओंकार कामठे व शिवसेनेच्या नगरसेविका राणी बाळासाहेब हरपळे यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे उमेदवारी अर्ज दाखल केले होते. विहित कालावधीत झालेल्या छाननीत दोन्ही अर्ज वैध ठरले. कुणीही माघार न घेतल्याने प्रत्यक्ष मतदान होणार हे निश्चित झाले होते.

हे देखील वाचा : ‘मांजा हटवा अन् जीव वाचवा! चायनीज मांजा ठरतोय मृत्यूचा सापळा; पुण्यात ‘विद्या प्रमाण रेस्क्यू अभियान’

या निवडणुकीत भाजपाचे पाच नगरसेवक गैरहजर राहिले. मतदानात नगरसेवकांची 19 मते आणि नगराध्यक्षांचे एक मत अशी एकूण 20 मते ओंकार कामठे यांना मिळाली, तर राणी हरपळे यांना 8 मते मिळाली. त्यामुळे ओंकार कामठे यांची उपनगराध्यक्षपदी निवड झाल्याची घोषणा नगराध्यक्ष संतोष सरोदे यांनी केली. निकाल जाहीर होताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष साजरा केला.

फुरसुंगी–उरुळी देवाचीच्या नव्या राजकीय इतिहासाला कलाटणी

दरम्यान, प्रथमच झालेल्या फुरसुंगी–उरुळी देवाची नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) नगराध्यक्ष पदासह 32 पैकी 19 जागा जिंकत नगरपरिषदेवर आपला झेंडा फडकावला आहे. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पॅनल प्रमुख, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कमी वयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिलेली जबाबदारी ॲड. ओंकार मच्छिंद्र कामठे यांनी यशस्वीपणे पार पाडली असून, त्यांची उपनगराध्यक्षपदी झालेली निवड फुरसुंगी–उरुळी देवाचीच्या नव्या राजकीय इतिहासाला कलाटणी देणारी असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

Web Title: Ncp onkar kamthe elected as the deputy chairperson of the fursungi uruli devachi municipal council

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 18, 2026 | 11:40 AM

Topics:  

  • pune news
  • Pune Politics
  • Uruli Devachi

संबंधित बातम्या

Pmc Election Result : दिग्गजांना नवख्यांकडून घरचा रस्ता; ‘या’ बड्या नेत्यांचा पराभुतांमध्ये समावेश
1

Pmc Election Result : दिग्गजांना नवख्यांकडून घरचा रस्ता; ‘या’ बड्या नेत्यांचा पराभुतांमध्ये समावेश

पुणेकरांसाठी अत्यंत महत्वाची बातमी! ग्रँड चॅलेंज टूरनिमित्त उद्या ‘हे’ प्रमुख रस्ते राहणार बंद
2

पुणेकरांसाठी अत्यंत महत्वाची बातमी! ग्रँड चॅलेंज टूरनिमित्त उद्या ‘हे’ प्रमुख रस्ते राहणार बंद

Maharashtra Politics: “…नाराजी खपवून घेतली जाणार नाही”; फडणवीसांचा नगरसेवकांना इशारा
3

Maharashtra Politics: “…नाराजी खपवून घेतली जाणार नाही”; फडणवीसांचा नगरसेवकांना इशारा

‘मांजा हटवा अन् जीव वाचवा! चायनीज मांजा ठरतोय मृत्यूचा सापळा; पुण्यात ‘विद्या प्रमाण रेस्क्यू अभियान’
4

‘मांजा हटवा अन् जीव वाचवा! चायनीज मांजा ठरतोय मृत्यूचा सापळा; पुण्यात ‘विद्या प्रमाण रेस्क्यू अभियान’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.