Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Laxman Hake: ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ निरा बंद 

Nira News: ओबीसी बांधवांच्या हाकेला साथ देत आज सकाळी नीरा येथील व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद पाळला आणि काल घडलेल्या घटनेचा निषेध केला.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 01, 2025 | 09:33 PM
Laxman Hake: ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ निरा बंद 
Follow Us
Close
Follow Us:
नीरा: नीरा( ता. पुरंदर)येथे काल ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि मराठा आंदोलन यांच्यामध्ये शाब्दिक बाचाबाची झाली होती. यानंतर लक्ष्मण हाके यांनी आपल्यावर हल्ला झाल्याचा दावा केला होता. मात्र हा त्यांच्या या दाव्यानंतर ओबीसी समाज संतप्त झाला आहे. या हल्ल्याचा आज (सोमवारी ) नीरा बाजारपेठ बंद ठेवून निषेध करण्यात आला.
काल रविवारी लक्ष्मण हाके हे पुण्याहून लोणंदकडे निघाले होते. मात्र नीरा येथे आल्यावर त्यांनी एका हॉटेलमध्ये चहा घेण्यासाठी थोडा वेळ घालवला. यादरम्यान तिथे असलेल्या मराठा तरुणांनी हाकेसाहेब तुम्ही आमच्या समाजाबद्दल का बोलता? असा प्रश्न विचारला व आम्हालाही आरक्षण मिळूद्या अशी विचारांना केली. तेथूनच हाके आणि तरुणांमध्ये बाचाबाची झाली.
मात्र यानंतर हाके यांनी रस्त्यावर ठिय्या मांडत आक्रमक पवित्रा घेतला. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर हे प्रकरण तिथे मिटलं. मात्र या प्रकरणानंतर लोणंद मध्ये गेल्यावर नीरा येथे आपल्यावर जीवघेना हल्ला केल्याचा दावा केला. त्यामुळे या परिसरातील ओबीसी बांधव प्रचंड संतप्त झाला आहे. काल रात्री याबाबत मराठा तरुणांवर कारवाई करण्याचे निवेदन जेजुरी पोलिसांना देण्यात आले. ज्या तरुणांनी हाके यांना अडवलं आणि जाब विचारला त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी ओबीसी समाजाच्यावतीने करण्यात आली. त्याचबरोबर काल रात्रीच नीरा बंदची हाक देण्यात आली.

ओबीसी बांधवांच्या हाकेला साथ देत आज सकाळी नीरा येथील व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद पाळला आणि काल घडलेल्या घटनेचा निषेध केला. यानंतर सकाळी दहा वाजता नीरा येथील ओबीसी बांधवांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर एकत्र येत हाके यांच्यावर झालेल्या कथित हल्ल्याचा निषेध केला.

Laxman hake : “फडणवीस सरकार उलथवून टाकण्यासाठी हे आंदोलन”, लक्ष्मण हाकेंची मनोज जरांगेंच्या आंदोलनावर टीका

हाकेंचा फोनवरून संवाद 

दरम्यान सभा सुरू असताना लक्ष्मण हाके यांनी फोनवरून उपस्थित अशी संवाद साधला. काहीही झालं तरी ओबीसी आरक्षणाला आपण धक्का लागू देणार नाही, असा विश्वास त्यांनी यावेळी उपस्थित त्यांना दिला त्याचबरोबर ओबीसी बांधवांना शांतता राखण्याचे देखील आवाहन केले.

यावेळी दादासाहेब गायकवाड, शंकरराव मर्दाने, गणपत लकडे, शितल चोरमले, विजय धायगुडे, प्रकाश कदम, राजेंद्र लकडे, ॲड. आदेश गिरमे, बबन गोफणे, संदिप धायगुडे, गणेश फरांदे, दयानंद चव्हाण, राजेंद्र बरकडे, अनिल चव्हाण, राजेश काकडे, सचिन मोरे, काळुराम चौधरी, गणेश गडदरे, गणेश केसकर, सरपंच तेजश्री काकडे, दत्ता चव्हाण, डॉ वसंतराव दगडे, यांनी मनोगत व्यक्त करत झालेल्या घटनेचा निषेध केला. यावेळी झालेल्या कार्यक्रमाचे प्रस्तविक नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विक्रम दगडे यांनी केले सूत्रसंचालन विष्णू गडदरे यांनी केले तर आभार अनंता शिंदे यांनी म्हणाले.

Web Title: Nira purandar people closed city today attack on obc leader laxman hake

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 01, 2025 | 09:33 PM

Topics:  

  • Caste Reservation
  • Laxman hake
  • Purandar

संबंधित बातम्या

Pune Crime: तू तिच्याशी लग्न का केलं? प्रेयसीच्या नवऱ्याचा कोयत्याने निर्घृण खून; महिन्याभरापूर्वीच झालं होतं लग्न
1

Pune Crime: तू तिच्याशी लग्न का केलं? प्रेयसीच्या नवऱ्याचा कोयत्याने निर्घृण खून; महिन्याभरापूर्वीच झालं होतं लग्न

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.