Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“… कार्यवाही पूर्ण करावी”: Purandar Airport बाबत मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट निर्देश

CM Devendra Fadnavis: विमानतळ विकासासाठी निधी उपलब्धतेचा प्रस्ताव पुढील मंत्रिमंडळ बैठकीत आणावा, असे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 03, 2026 | 06:47 PM
“… कार्यवाही पूर्ण करावी”: Purandar Airport बाबत मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट निर्देश
Follow Us
Follow Us:

मुख्यमंत्र्यांनी घेतला पुरंदर विमानतळ विकास कामांचा आढावा
पुणे शहर व परिसर गुंतवणुकीचे बनले आकर्षण
वर्षा निवासस्थानी पार पडली पुरंदर एअरपोर्टची बैठक

मुंबई: वेगाने होत असलेल्या पायाभूत सुविधांच्या विकासामुळे पुणे शहर व परिसर गुंतवणुकीचे आकर्षण बनले आहे. त्यामुळे पुणे शहर व परिसरात औद्योगिकरण वाढत आहे. नागरीकरणाचा वेगही गतिमान आहे, अशा परिस्थितीत भविष्यातील पुणे शहराची गरज लक्षात घेऊन पुरंदर विमानतळाची निर्मिती करावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

विमानतळासाठी भूसंपादन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या माध्यमातून कालमर्यादेत पूर्ण करून विमानतळ विकासाचा मोठा टप्पा पार करावा,असे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. वर्षा निवासस्थानी पुरंदर विमानतळ विकासकामांचा आढावा घेताना मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, विमानतळ विकासासाठी निधी उपलब्धतेची विशिष्ट पद्धत ठरविण्यात यावी. भूसंपादनाकरिता महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने कार्यवाही पूर्ण करावी. विमानतळ विकासामध्ये सिडको, नगरविकास विभाग यंत्रणांनी आपली जबाबदारी निश्चित करून भूमिका यशस्वीपणे पार पाडावी. विमानतळ निर्माण झाल्यानंतर हा परिसर ‘ डेव्हलपमेंट झोन’ म्हणून पुढे येणार आहे. त्या अनुषंगाने सिडकोने परिसरात आत्ताच जमीन उपलब्धतेची खात्री करून घ्यावी.

Purandar Airport: “पुरंदर विमानतळावर छत्रपती संभाजी महाराज यांचा भव्य पुतळा उभारणार”, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

राज्यातील विमानतळाचा विकास करण्याची जबाबदारी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडे आहे. कंपनीची क्षमता वृद्धी करून राज्यातील निर्माणाधीन असलेली सर्व विमानतळे विकासाकरिता कंपनीकडे देण्यात यावीत. पुरंदर विमानतळाच्या उर्वरित भूसंपादनाची अधिसूचना ‘ एमआयडीसी’ने काढावी तसेच निधीची उपलब्धतेबाबत विशिष्ट पद्धत ठरवण्यात यावी. विमानतळ विकासासाठी निधी उपलब्धतेचा प्रस्ताव पुढील मंत्रिमंडळ बैठकीत आणावा, असे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. द्यस्थितीत प्रस्तावित क्षेत्रापैकी १२१६ हेक्टर आर जमिनीची संयुक्त मोजणी पूर्ण करावी. या संयुक्त मोजणीचा, हरकतींचा अहवाल शासनास सादर करण्यात यावा, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

बैठकीस मुख्य सचिव राजेश अग्रवाल, अपर मुख्य सचिव (वित्त) ओ. पी. गुप्ता, अपर मुख्य सचिव (परिवहन) संजय सेठी, प्रधान सचिव (उद्योग) पी. अन्बळगन, मुख्यमंत्री यांचे गुंतवणूक सल्लागार कौस्तुभ धवसे, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती पांडे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलारसू आदी उपस्थित होते. दूरदृश्य संवाद प्रणाली द्वारे पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी बैठकीत सहभाग घेतला.

पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनासाठी सहा हजार कोटींचा खर्च; मुख्यमंत्री फडणवीस शेतकऱ्यांना भेटणार

या गावात भूसंपादनाची प्रक्रिया

पुणे जिल्ह्यातील वनपुरी, कुंभार वळण, उदाची वाडी, एखतपूर, मुंजवडी, खानवडी व पारगाव या सात गावात पुरंदर विमानतळासाठी भूसंपादन करण्यात येत आहे. या गावांमध्ये भूसंपादनासाठी गाव निहाय उपजिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी दर्जाचे भूसंपादन अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत.

 

Web Title: Cm devendra fadnavis instructions to purandar airport development pune marathi neews

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 03, 2026 | 06:46 PM

Topics:  

  • CM Devendra Fadnavis
  • Purandar
  • Purandar Airport

संबंधित बातम्या

महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय; कृषी क्षेत्रात मोठा बदल, कृषी संचालक, सहसंचालकांसह चार नवीन अधिकारी होणार नियुक्त
1

महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय; कृषी क्षेत्रात मोठा बदल, कृषी संचालक, सहसंचालकांसह चार नवीन अधिकारी होणार नियुक्त

मराठा आरक्षणावरून जरांगे पुन्हा आक्रमक; ‘सरकार बदनाम करण्याचा प्रयत्न करेल’, भास्कर जाधवांचा गंभीर आरोप
2

मराठा आरक्षणावरून जरांगे पुन्हा आक्रमक; ‘सरकार बदनाम करण्याचा प्रयत्न करेल’, भास्कर जाधवांचा गंभीर आरोप

‘जो गद्दारी करेल तो मराठा जातीचा नाही’; आटपाडीच्या सभेत मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर जोरदार हल्लाबोल
3

‘जो गद्दारी करेल तो मराठा जातीचा नाही’; आटपाडीच्या सभेत मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर जोरदार हल्लाबोल

फडणवीस-जयंत पाटील यांचा एकाच विमानातून प्रवास; राजकीय चर्चांना उधाण, गुलाबराव पाटलांचं मोठं वक्तव्य
4

फडणवीस-जयंत पाटील यांचा एकाच विमानातून प्रवास; राजकीय चर्चांना उधाण, गुलाबराव पाटलांचं मोठं वक्तव्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.