Pune: ५८ अंगणवाडीतील मुले अंधारात! धक्कादायक बाब उघड; वीजबिल भरले नसल्याने वीजपुरवठा खंडित
पुणे: पुणे महापालिकेच्या (पीएमसी) हद्दीत २०२१ साली समाविष्ट झालेल्या २३ गावांतील तब्बल ५८ अंगणवाड्यांवर गंभीर दुर्लक्ष झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या अंगणवाड्यांचे वीज बिल न भरल्यामुळे महाराष्ट्र राज्य वीज मंडळाने (एमएसईबी) वीजपुरवठा खंडित केला. परिणामी, लहान मुलं व अंगणवाडी कर्मचारी अंधरातात बसण्यास मजबूर झाले आहेत.
या परिस्थितीचा पाठपुरावा करून पण काही झाले नाही म्हणून बावधन च्या नागरिकांनी (बावधन सिटीझन फोरम ) पुढाकार घेत अंगणवाड्यांची थकबाकी भरली, मात्र हा प्रश्न तात्पुरता सोडवण्याचा प्रकार आहे. अंगणवाड्यांना मूलभूत सुविधा पुरवण्यात आलेल्या अपयशामुळे प्रशासनाची संवेदनशीलता व जबाबदारीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या संदर्भात पुणे शहर आम आदमी पक्षाचे उपाध्यक्ष अॅड. कृणाल घारे म्हणाले, ‘‘सरकार एवढे गरीब आहे का की ते अंगणवाड्यांचे वीज बिल भरू शकत नाहीत? की ही त्यांची असंवेदनशीलता आहे? मुलं आणि शिक्षक अंधारात बसतात, याआधी, अशाच एका बावधानच्या शाळेत शिक्षिकेचा अंधाऱ्या शौचालयात साप चावल्याने मृत्यू झाला होता. वीज नसल्यामुळे बेसीनजवळ असलेला साप दिसला नाही आणि हा दुर्दैवी प्रकार घडला. ’’
पीएमसी, जिल्हा परिषद, आणि महिला व बालकल्याण विभागाच्या सचिवांना वारंवार पत्र पाठवूनही काहीच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे बावधन नागरिक मंचाने पुढाकार घेत आंगणवाडीची थकबाकी भरली. नागरिकांनी सरकारला दाखवलेली मदत कौतुकास्पद आहे, पण ही जबाबदारी सरकारची आहे. प्रशासन एकमेकांवर जबाबदारी ढकलत राहतात, असा आरोपही डाॅ. घारे यांनी केला.
एकजुटीमुळे समोर आला प्रश्न
बावधनचे नागरिकांनी दाखवलेला एकजुटीचा हा नमुना कौतुकास्पद आहे , पण त्याच वेळेस प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर प्रश्न उभा करतो. अंगणवाड्यांना योग्य सुविधा देण्यासाठी राज्य आणि महापालिका प्रशासनाने तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिक व नेते करत आहेत.
दरम्यान महापािलका प्रशासनाने अंगणवाडीच्या जागा किंवा मिळकती या महापालिकेच्या ताब्यात आल्या नाहीत. त्या जिल्हा परीषद किंवा राज्य सरकारच्या ताब्यात असतील. यामुळे महापािलका या मिळकतींचे वीज बिलाची रक्कम भरू शकत नाही असा दावा प्रशासनाने केला आहे.
महाराष्ट्रातल्या अंगणवाडीतील 10 हजार मुलांना रिलायन्स फाऊंडेशनच्या माध्यमातून शिक्षण
मुलांना खेळातून शिक्षण देण्याबरोबरच अंगणवाडी ताईनी त्यांच्या आई होऊन शिक्षण दिले तर या मुलांना शिक्षणाची आवड निर्माण होईल, आणि हे काम रिलायन्स फाऊंडेशन च्या माध्यमातून सुरू झाले आहे. महाराष्ट्रात सुमारे ७०० अंगणवाडीतील १० हजार मुलांना असे शिक्षण देण्याच्या या उपक्रमाचे उद्घाटन आज कल्याण तालुक्यातील रायते येथे झाले असल्याचे एकात्मिक बालविकास विभागाचे आयुक्त कैलास पगारे यांनी जाहीर केले.
रिलायन्स फाऊंडेशन
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) ने रिलायन्स फाउंडेशनच्या माध्यमातून समावेशक भारताच्या त्यांच्या दृष्टिकोनात लक्षणीय योगदान देत आहे. संस्थापक अध्यक्षा श्रीमती नीता एम अंबानी यांच्या नेतृत्वाखाली, रिलायन्स फाउंडेशनची स्थापना २०१० मध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या विविध परोपकारी उपक्रमांना चालना देण्यासाठी करण्यात आली. समूहाच्या प्रयत्नांनी भारतातील ५५,५५० हून अधिक गावे आणि अनेक शहरी ठिकाणी ७६ दशलक्षाहून अधिक लोकांच्या जीवनाला स्पर्श केला आहे.