Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 20 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

PMC Action: दबाव आणाल तर नाव आणि फोटोसह जाहीर करणार! पुण्यात दोन महिने बुलडोझर मोहीम; आयुक्तांचा थेट इशारा!

PMC Action: पुण्यात पुढील दोन महिने बुलडोझरचा तडाखा! इमारतींच्या फ्रंट व साईड मार्जिनमधील अडीच लाख अनधिकृत व्यवसायांवर कारवाई; हस्तक्षेप करणाऱ्यांचे नाव आणि फोटो जाहीर करण्याचा आयुक्त नवल किशोर राम यांचा थेट इशारा!

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Nov 20, 2026 | 01:35 PM
PMC Action: दबाव आणाल तर नाव आणि फोटोसह जाहीर करणार! पुण्यात दोन महिने बुलडोझर मोहीम; आयुक्तांचा थेट इशारा!

PMC Action: दबाव आणाल तर नाव आणि फोटोसह जाहीर करणार! पुण्यात दोन महिने बुलडोझर मोहीम; आयुक्तांचा थेट इशारा!

Follow Us
Follow Us:
  • अनधिकृत मार्जिन व पार्किंग व्यवसायांवर महापालिकेची दोन महिने बुलडोझर मोहीम
  • आंदोलनानंतर आयुक्त नवल किशोर राम यांची प्रमुख रस्त्यांवर कारवाई
  • हस्तक्षेप करणाऱ्यांचे नाव-फोटो जाहीर करण्याचा इशारा; मोहीम सुरूच राहणार
PMC Action: रस्त्यांवरील केवळ पथारी व्यावसायिकांवर कारवाई करून अतिक्रमणाचा प्रश्न सुटणार नाही; कारण अतिक्रमणांचे खरे मूळ रस्त्यांलगतच्या इमारतींच्या फ्रंट मार्जिन, साईड मार्जिन आणि पार्किंगच्या जागांमध्ये आहे. त्यामुळे आता फूटपाथपुरती मर्यादित कारवाई न करता थेट अतिक्रमणांच्या मुळावरच घाव घालण्याचा निर्णय पुणे महापालिका प्रशासनाने घेतला आहे. शहरातील प्रमुख रस्त्यांवरील अशा जागांमध्ये सुरू असलेले सुमारे अडीच लाख अनधिकृत व्यवसाय हटवण्यासाठी पुढील दोन महिने सलग मोहीम राबवली जाणार असून, या कारवाईत हस्तक्षेप करणाऱ्यांचे नाव आणि फोटो जाहीर करण्याचा इशारा महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिला आहे.

हेही वाचा: Weapon Attack: आधी कार ट्रकला धडकवली अन् मग धारदार शस्त्राने वार! मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर पतीचे भयंकर कांड…

सभेतील आंदोलनानंतर आयुक्त थेट मैदानात

दोन दिवसांपूर्वी झालेल्या महापालिकेच्या मुख्य सभेत फर्ग्युसन रस्त्यावरील अतिक्रमणांच्या मुद्द्यावरून सत्ताधारी भाजपच्याच नगरसेवकांनी आंदोलन करत प्रशासनाला धारेवर धरले होते. या सभेत प्रशासनावर हप्तेखोरीचे गंभीर आरोपही करण्यात आले होते. या घडामोडींनंतर आयुक्त नवल किशोर राम यांनी स्वतः मैदानात उतरून कारवाईचा धडाका सुरू केला. फर्ग्युसन रस्त्यापाठोपाठ जंगली महाराज रस्ता, कोथरूड आणि शिवाजी रस्त्यावरही अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली. या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी आगामी दोन महिन्यांच्या मोहिमेची सविस्तर रूपरेषा मांडली.

अडीच ते तीन लाख अनधिकृत व्यवसाय; वाहतूक व सुरक्षेचा प्रश्न

पत्रकार परिषदेत बोलताना नवल किशोर राम म्हणाले की, शहरात केवळ २२ हजार परवानाधारक पथारी व्यावसायिक असताना सुमारे अडीच ते तीन लाख अनधिकृत व्यावसायिक फ्रंट आणि साईड मार्जिनमध्ये व्यवसाय करत असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या जागा मोकळ्या झाल्यास वाहतूककोंडी कमी होण्याबरोबरच पादचाऱ्यांना सुरक्षितपणे चालता येईल.

तसेच अग्निशमन दलाच्या वाहनांच्या जलद हालचालींसाठीही या जागा मोकळ्या असणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले. अनधिकृत ओटे, रेलिंग, बॅरिकेड्स, कॅनोपी हटवण्यात येतील आणि पुन्हा अतिक्रमण झाल्यास बांधकाम विभागामार्फत कठोर कारवाई केली जाईल. या मोहिमेसाठी अतिरिक्त जेसीबी, बुलडोझर आणि यंत्रसामग्रीसह १०० एमएसएफ जवानांची नियुक्ती करण्यात येणार असून, सुट्टीच्या दिवशीही कारवाई थांबणार नाही.

हस्तक्षेप करणाऱ्यांची नावे फोटोसह जाहीर करणार

अतिक्रमण हटविताना कोणत्याही स्तरावरून दबाव आणला गेल्यास तो सहन केला जाणार नाही, असा ठाम इशारा आयुक्तांनी दिला. चुकीचे काम करण्यासाठी कोणी सूचना दिल्यास अधिकाऱ्यांनी ती मान्य करू नये आणि हस्तक्षेप करणाऱ्यांची नावे जाहीर करण्याचे निर्देश क्षेत्रीय व वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गरीब किंवा श्रीमंत असा कोणताही भेदभाव न करता अतिक्रमण असेल तर ते हटवलेच जाईल, असेही ते म्हणाले.

हेही वाचा: Mumbai Police: गुन्हेगारांना वठणीवर आणणारेच हतबल! महिला कॉन्स्टेबलच्या कथित दहशतीने मुंबई पोलीस दलात खळबळ

मागील कारवाईबाबत कबुली आणि गांधीजींच्या विचारांचा दाखला

पुण्यातील अतिक्रमणांवर यापूर्वी कारवाई का केली नाही, या प्रश्नावर स्पष्ट कबुली देत नवल किशोर राम म्हणाले की, यावर माझ्याकडे उत्तर नाही. यावेळी त्यांनी महात्मा गांधीजींच्या विचारांची आठवण करून देत म्हटले की, गांधीजी म्हणायचे आपण दररोज काहीतरी नवे शिकतो; मलाही पुण्यातील फ्रंट मार्जिनवरील अतिक्रमणांची समस्या सर्वांत मोठी असल्याचे आता समजले. दरम्यान, इतकी वर्षे अतिक्रमणांचा प्रश्न कायम असताना प्रशासनाला त्याचे गांभीर्य आताच का कळले, असा सवालही या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: पुण्यात अतिक्रमणांविरोधात किती काळ मोहीम राबवली जाणार आहे?

    Ans: पुणे महापालिकेकडून पुढील दोन महिने सलग अतिक्रमणविरोधी बुलडोझर मोहीम राबवली जाणार असून, सुट्टीच्या दिवशीही ही कारवाई सुरू राहणार आहे.

  • Que: या मोहिमेत प्रामुख्याने कोणत्या जागांवरील अतिक्रमणे हटवली जातील?

    Ans: इमारतींच्या फ्रंट मार्जिन, साईड मार्जिन आणि पार्किंगच्या जागांमधील अनधिकृत व्यवसाय, ओटे, रेलिंग, बॅरिकेड्स आणि कॅनोपी यांवर प्रामुख्याने कारवाई केली जाणार आहे.

  • Que: दबाव किंवा हस्तक्षेप करणाऱ्यांबाबत आयुक्त नवल किशोर राम यांनी काय इशारा दिला आहे?

    Ans: कोणताही दबाव सहन केला जाणार नसून, कारवाईत हस्तक्षेप करणाऱ्यांचे नाव आणि फोटो सार्वजनिक करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

Web Title: Pmc bulldozer action naval kishore ram encroachment drive sn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 20, 2026 | 01:35 PM

Topics:  

  • Latest pune news update

संबंधित बातम्या

Fraud Case: निवृत्त होताच नर्सने रचला ५३ लाखांचा महाघोटाळा! गुंतवणुकीवर भरघोस परताव्याचे आमिष दाखवून सहकारी नर्सनाच गंडवले!
1

Fraud Case: निवृत्त होताच नर्सने रचला ५३ लाखांचा महाघोटाळा! गुंतवणुकीवर भरघोस परताव्याचे आमिष दाखवून सहकारी नर्सनाच गंडवले!

Fake IAS Officer: बारावी पास तरुण निघाला तोतया ‘आयएस’ अधिकारी; चेअरमन बनून सोसायटीला चुना लावत केला लाखांचा अपहार!
2

Fake IAS Officer: बारावी पास तरुण निघाला तोतया ‘आयएस’ अधिकारी; चेअरमन बनून सोसायटीला चुना लावत केला लाखांचा अपहार!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.