
Fake IAS Officer: बारावी पास तरुण निघाला तोतया 'आयएस' अधिकारी; चेअरमन बनून सोसायटीला चुना लावत केला लाखांचा अपहार!
हितेश प्रमोद कुलकर्णी (वय २१, रा. बाणेर) असे अटक करण्यात आलेल्या तोतया ‘आयएएस’ अधिकाऱ्याचे नाव आहे. हितेश हा त्याच्या कुटुंबीयांसह बाणेरमधील इन्क्लुझिव्ह को-ऑपरेटिव्ह सोसायटीत वास्तव्यास आहे. जानेवारी ते नोव्हेंबर २०२६ या कालावधीत त्याने हा संपूर्ण कट रचला. त्याने सोसायटीच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर आपली ‘आयएस’ अधिकारी म्हणून नियुक्ती झाल्याची खोटी माहिती पसरवली होती. त्याच्या या खोट्या रुबाबावर विश्वास ठेवून सोसायटीच्या समितीने त्याची थेट सोसायटीच्या चेअरमनपदी निवड केली.
चेअरमनपदाचा गैरवापर करत हितेशने सोसायटीतील रिकाम्या सदनिका लॉटरी पद्धतीने मिळवून देतो, असे सांगत लोकांकडून आणि सोसायटीच्या खात्यात १९ लाख रुपये जमा करून घेतले. एवढेच नव्हे, तर सोसायटीच्या ३७ लाखांच्या मुदत ठेवीवर (FD) परस्पर १० लाख रुपयांचे कर्ज काढून मोठा आर्थिक घोटाळा केला. हा सर्व प्रकार उघडकीस आल्यानंतर सोसायटीचे खजिनादार दत्तराय नागरगोजे यांनी बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली, ज्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे.
Ans: हितेश प्रमोद कुलकर्णी (वय २१) असे आरोपीचे नाव असून, तो अवघा बारावी पास असूनही स्वतःला आयएस अधिकारी म्हणून मिरवत होता.
Ans: त्याने स्वतःची बनावट आयएस अधिकारी म्हणून ओळख निर्माण करून सोसायटीचा चेअरमन पद मिळवले. त्यानंतर म्हाडाच्या लॉटरीतून फ्लॅट मिळवून देण्याच्या नावाखाली पैसे उकळले आणि सोसायटीच्या एफडीवर परस्पर कर्ज काढून ३५ लाखांचा अपहार केला.
Ans: सोसायटीच्या खजिनदाराच्या फिर्यादीवरून बाणेर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, तोतया अधिकारी हितेश कुलकर्णी याला अटक करण्यात आली आहे.