Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 18 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Fraud Case: निवृत्त होताच नर्सने रचला ५३ लाखांचा महाघोटाळा! गुंतवणुकीवर भरघोस परताव्याचे आमिष दाखवून सहकारी नर्सनाच गंडवले!

Fraud Case: पुणे महापालिकेच्या नर्सची ५३ लाखांची फसवणूक! निवृत्त नर्सने गुंतवणुकीच्या नावाखाली सहकारी भगिनींना गंडवले... लुटलेल्या पैशातून लावले लेकीचे लग्न अन् विकत घेतला फ्लॅट!

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Nov 18, 2026 | 01:22 PM
Fraud Case: निवृत्त होताच नर्सने रचला ५३ लाखांचा महाघोटाळा! गुंतवणुकीवर भरघोस परताव्याचे आमिष दाखवून सहकारी नर्सनाच गंडवले!

Fraud Case: निवृत्त होताच नर्सने रचला ५३ लाखांचा महाघोटाळा! गुंतवणुकीवर भरघोस परताव्याचे आमिष दाखवून सहकारी नर्सनाच गंडवले!

Follow Us
Follow Us:
  • निवृत्त नर्सने सहकारी परिचारिकांची ५३ लाखांची फसवणूक केली
  • गुंतवणुकीवर परताव्याचे आमिष देऊन पैसे लाटले
  • दोघांना अटक, तर फरार आई-मुलीचा शोध सुरू
Fraud Case: पुणे महापालिकेतील परिचारिकांची तब्बल ५३ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा एक अत्यंत खळबळजनक प्रकार समोर आला आहे. यात सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, ही फसवणूक करणारी महिला स्वतः याच महापालिकेत नर्स म्हणून काम करायची. मात्र, महापालिकेतून निवृत्त झाल्यानंतर या नर्सने सहकारी परिचारिकांची फसवणूक करण्यासाठी एक मोठा डाव रचला. गुंतवणुकीवर भरघोस परतावा देण्याचे आमिष दाखवून हा महाघोटाळा करणाऱ्या आणि सध्या फरारी असलेल्या आई व मुलीचा शोध गेल्या दोन महिन्यांपासून पोलिसांकडून युद्धपातळीवर सुरू आहे. या महिलांनी घोटाळ्याच्या पैशातून लेकीचे थाटामाटात लग्न लावून एक फ्लॅटही विकत घेतल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

हेही वाचा: Forest Crime: नागपूरचा फ्लॅट विकून मित्राला बिझनेससाठी दिले ६० लाख, अन् पुढे घडला भयानक प्रकार!

कशी केली फसवणूक?

पुणे महापालिकेतून निवृत्त झालेल्या नर्स स्टेला तायडे यांनी नोकरीदरम्यानच्या जुन्या ओळखीचा पुरेपूर फायदा घेतला. बोपोडीतील बँकेत रक्कम गुंतवल्यास महिन्याला चांगला परतावा मिळेल, असे आमिष त्यांनी आपल्या सहकारी नर्सेसना दाखवले. सुरुवातीला २०२१ ते २०२३ या कालावधीत नियमित परтаवा देऊन त्यांनी सर्वांचा पूर्ण विश्वास संपादन केला. यामुळे २०२४ नंतर अनेक परिचारिकांनी मोठ्या प्रमाणावर पैसे गुंतवले. मात्र, जेव्हा मोठी रक्कम जमा झाली, तेव्हा नर्सने खरा डाव खेळला. परिचारिकांनी परताव्याबाबत विचारणा सुरू करताच टाळाटाळ करण्यास सुरुवात झाली, ज्यातून हा संपूर्ण फसवणुकीचा बोगस प्रकार उघडकीस आला.

हेही वाचा: Slab Collapse: “जेवणानंतर विश्रांती घेत असताना भीषण अपघात; नाशिकमध्ये ‘साई निवारा’चा स्लॅब कोसळून १५ ते १७ भाविक गंभीर जखमी!”

गुन्ह्यातील पैशातून थाटामाटात विवाह आणि फ्लॅट खरेदी

एका ३४ वर्षीय परिचारिकेने या प्रकरणी फिर्याद दिल्यानंतर लक्ष्मीनगर पोलिसांनी तत्परता दाखवत अवघ्या दोन दिवसांत घरातील वडील आणि मुलाला अटक करून त्यांची रवानगी कारागृहात केली. स्टेला संतोष तायडे आणि एंजल संतोष तायडे अशी फरार असलेल्या आई व मुलीची नावे आहेत, तर संतोष अंकुश तायडे आणि जॉय संतोष तायडे (रा. वाघोली) अशी अटक केलेल्या वडील व मुलाची नावे आहेत.

पोलिसांच्या तपासात आरोपींनी एकूण ५३ लाखांची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले आहे. या लुटलेल्या पैशातूनच तायडे कुटुंबीयांनी मुलगी एंजल हिचा विवाह अत्यंत थाटामाटात पार पाडला आणि चऱ्होली परिसरात एक फ्लॅट विकत घेतल्याचे समोर आले आहे. तसेच मुख्य आरोपी स्टेला तायडे हिच्या बँक खात्यात तीन लाख रुपये असल्याचेही निष्पन्न झाले आहे. सध्या फरारी असलेल्या स्टेला आणि एंजलचा कसून शोध सुरू असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक दत्ता लिगाडे यांनी दिली आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही फसवणूक नेमकी कोणाकडून आणि कशी केली गेली?

    Ans: पुणे महापालिकेतील निवृत्त नर्स स्टेला तायडे यांनी बोपोडीतील बँकेत गुंतवणुकीवर भरघोस परताव्याचे आमिष दाखवून सहकारी परिचारिकांची फसवणूक केली.

  • Que: या प्रकरणात आतापर्यंत किती जणांना अटक करण्यात आली आहे?

    Ans: या प्रकरणात लक्ष्मीनगर पोलिसांनी मुख्य आरोपीच्या कुटुंबातील वडील (संतोष तायडे) आणि मुलगा (जॉय तायडे) यांना अटक केली आहे.

  • Que: घोटाळ्यातील पैशांचा वापर आरोपींनी कशासाठी केला?

    Ans: घोटाळ्यातील ५३ लाखांच्या रकमेपैकी पैशातून आरोपींनी मुलगी एंजल हिचा विवाह थाटामाटात पार पाडला आणि चऱ्होली परिसरात एक फ्लॅट खरेदी केला.

Web Title: Pune municipal corporation nurse stella tayde 53 lakhs fraud case sn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 18, 2026 | 01:22 PM

Topics:  

  • Crime in Pune
  • Fraud Case
  • Fraud with Woman
  • Latest pune news update
  • Nurses
  • scam

संबंधित बातम्या

Fake IAS Officer: बारावी पास तरुण निघाला तोतया ‘आयएस’ अधिकारी; चेअरमन बनून सोसायटीला चुना लावत केला लाखांचा अपहार!
1

Fake IAS Officer: बारावी पास तरुण निघाला तोतया ‘आयएस’ अधिकारी; चेअरमन बनून सोसायटीला चुना लावत केला लाखांचा अपहार!

दुबईतून भारतात ऑनलाइन फसवणुकीचा मोठा कट; 10 ते 12 हजार सिमकार्ड पुरविणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
2

दुबईतून भारतात ऑनलाइन फसवणुकीचा मोठा कट; 10 ते 12 हजार सिमकार्ड पुरविणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

FDA Raid: ‘सेफ फूड सेफ महाराष्ट्र’ मोहीम, पुण्यातील वानवडीत दोन कराची स्वीट्सवर FDA ची धडक कारवाई
3

FDA Raid: ‘सेफ फूड सेफ महाराष्ट्र’ मोहीम, पुण्यातील वानवडीत दोन कराची स्वीट्सवर FDA ची धडक कारवाई

Group Attack: तरुणावर लोखंडी फायटर अन् दगडांनी टोळीचा जीवघेणा हल्ला; संपूर्ण थरार CCTV मध्ये कैद!
4

Group Attack: तरुणावर लोखंडी फायटर अन् दगडांनी टोळीचा जीवघेणा हल्ला; संपूर्ण थरार CCTV मध्ये कैद!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.