Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

PMRDA: राज्य सरकराचा मोठा निर्णय; PMRDA चा वादग्रस्त प्रारुप विकास आराखडा रद्द

मुख्यमंत्री तसेच पीएमआरडीएचे अध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार राज्य सरकारने हा विकास आराखडा (डीपी) रद्द करण्याचा निर्णय घेतला आणि त्याची अधिकृत अधिसूचना शनिवारी जाहीर करण्यात आली.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Sep 28, 2025 | 09:51 AM
PMRDA: राज्य सरकराचा मोठा निर्णय; PMRDA चा वादग्रस्त प्रारुप विकास आराखडा रद्द
Follow Us
Close
Follow Us:
  •  राज्य सरकारकडून पीएमआरडीएचा वादग्रस्त प्रारूप आराखडा अखेर रद्द
  • पुणे जिल्हा आणि २३ गावांचा विकास आराखडा पुणे महापालिकेकडे जाण्याची शक्यता
  • हा आराखड्यासाठी ‘पीएमआरडी’चा सिंगापूरमधील एका कंपनीसोबत सुमारे 40 कोटींचा करार

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा (PMRDA) संदर्भात एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. राज्य सरकारने पीएमआरडीएचा वादग्रस्त प्रारूप आराखडा अखेर रद्द केला आहे. शनिवारी (२७ सप्टेंबर) यासंबंधीची अधिकृत अधिसूचना जारी करण्यात आली. या निर्णयानंतर पुणे महापालिकेत समाविष्ट झालेल्या 23 गावांचा विकास आराखडा आता महापालिकेकडे सोपवला जाणार का, याबाबत उत्सुकता वाढली आहे. पुढील वाटचालीसंदर्भात शासन काय निर्णय घेते, याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे.

Skullcandy Uproar TWS: संपता संपणार नाही बॅटरी! Skullcandy चे नवे ईयरबड्स भारतात लाँच, 3 हजारांहून कमी आहे

पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका, सात नगरपरिषदा आणि जिल्ह्यातील इतर 842 गावांचा नियोजनबद्ध विकासासाठी करण्यासाठी 2015 साली राज्य सरकारने पीएमआरडीएची स्थापना केली होती. विशेष बाब म्हणजे, हा आराखडा तयार करण्यासाठी ‘पीएमआरडीए’ने सिंगापूरमधील एका कंपनीला सुमारे 40 कोटींचा करार केला होता. मात्र, हा आराखडाच रद्द झाल्याने हा खर्चही वाया गेला. यानंतर पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (पीएमआरडीए) नियोजन प्राधिकरण म्हणून मान्यता देण्यात आली असून, विकास आराखडा तयार करण्याचे अधिकारही त्यांच्याकडे सोपवण्यात आले.

2021 मध्ये प्रारूप विकास आराखडा जाहीर (Draft development plan announced by PMRDA in 2021)
पाच वर्षांनंतर पीएमआरडीएने २०२१ साली पुण्याचा प्रारुप आराखडा तयार केला होता. या आराखड्यावर तब्बल ७६ हजार हरकती आणि सूचना मिळाल्या. याच दरम्यान २३ गावे पुणे महापालिकेत समाविष्ट करण्यात आली. त्यामुळे गावांचा विकास आराखडा तयार करण्याचा अधिकार पीएमआरडीएकडे नाही तर पुणे महापालिकेकडे असल्याचा दावा भाजपने केला होता.

Dombivli Crime: संतापजनक! शाळेच्या मुख्याध्यापकानेच 6 वर्षांच्या विद्यार्थिनीवर केला अतिप्रसंग;

मात्र, त्या काळात राज्यात महाविकास आघाडीची सरकार असल्यामुळे भाजपच्या या मागणीवर तातडीने कारवाई करण्यात आलेली नव्हती. या पार्श्वभूमीवर काही संस्था पीएमआरडीएच्या अधिकारांविरुद्ध उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. न्यायालयाने मार्च 2023 मध्ये या प्रकरणावर अंतरिम स्थगिती दिली होती.

शेवटी, मुख्यमंत्री तसेच पीएमआरडीएचे अध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार राज्य सरकारने हा विकास आराखडा (डीपी) रद्द करण्याचा निर्णय घेतला आणि त्याची अधिकृत अधिसूचना शनिवारी जाहीर करण्यात आली.

दरम्यान न्यायालयात पीएमआरडीएने १४ जुलैपर्यंत राज्य शासनाकडून विकास आराखडा रद्द केला जाणार असल्याचे प्रतिज्ञापत्र सादर केले होते. मात्र, त्या वेळी न्यायालयाकडून त्यावर अंतिम निर्णय दिला गेला नव्हता. अखेर, न्यायालयाच्या आदेशानंतर पीएमआरडीएने पुढील आवश्यक कार्यवाही पूर्ण केली आहे.

Web Title: Pmrda big decision by the state government pmrdas controversial draft development plan cancelled

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 28, 2025 | 09:49 AM

Topics:  

  • devendra fadnavis
  • PMRDA

संबंधित बातम्या

Sanjay Raut News: ‘तुम्ही काय शेण खाताय ते आधी बोला…’; संजय राऊतांचा मुख्यमंत्री फडणवीसांवर घणाघात
1

Sanjay Raut News: ‘तुम्ही काय शेण खाताय ते आधी बोला…’; संजय राऊतांचा मुख्यमंत्री फडणवीसांवर घणाघात

Devendra Fadnavis : “वन-आधारित उपजीविकेला कृषी व पणन क्षेत्रात ‘नाबार्ड’च्या सहभागाने मिळेल चालना – देवेंद्र फडणवीस
2

Devendra Fadnavis : “वन-आधारित उपजीविकेला कृषी व पणन क्षेत्रात ‘नाबार्ड’च्या सहभागाने मिळेल चालना – देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News: दिल्लीत मोठी जबाबदारीपासून पक्षातील छुपा विरोधापर्यंत..; देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
3

Devendra Fadnavis News: दिल्लीत मोठी जबाबदारीपासून पक्षातील छुपा विरोधापर्यंत..; देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं

बळीराजाचे पीक गेले वाहून! CM देवेंद्र फडणवीस आणि DCM अजित पवारांनी केली सोलापूर पूरस्थितीची पाहणी
4

बळीराजाचे पीक गेले वाहून! CM देवेंद्र फडणवीस आणि DCM अजित पवारांनी केली सोलापूर पूरस्थितीची पाहणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.