Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ganeshotsav: ‘वक्रतुंड’ ते ‘माता महाकाली’! रथ, पालख्या अन्…; लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी पुण्यनगरी सज्ज

Pune Ganeshotsav: बाप्पाच्या आगमनापासून अहोरात्र राबलेल्या कार्यकर्त्यांच्या डोळ्यांसमोर आता निरोपाची वेळ उभी ठाकली आहे. शुक्रवारी (ता. २५) सकाळी साडेनऊ वाजता मंडईतील लोकमान्य टिळक पुतळ्यापासून मुख्य विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होणार आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 23, 2026 | 07:58 PM
Pune Ganeshotsav 2026

Pune Ganeshotsav 2026

Follow Us
Follow Us:
  • ‘वक्रतुंड’, ‘विष्णू’, ‘माता महाकाली’सह विविध रथ ठरणार आकर्षण
  • कार्यकर्त्यांची विसर्जन मिरवणुकीसाठी लगबग
  • मानाच्या गणपतींच्या मिरवणुकीला सकाळी साडेनऊ वाजता सुरुवात
सुनयना सोनवणे / Ganeshotsav: लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी ‘माता महाकाली’चा फुलांचा रथ, भव्य ‘विष्णू रथ’, ‘श्री वक्रतुंड’ रथासह कोणार्क सूर्य मंदिराच्या वास्तुशैलीवरील रथ सज्ज झाले आहेत. चांदीच्या पालख्या, फुलांची सजावट, विद्युत रोषणाई, सामाजिक संदेश देणारे रथ आणि ढोल-ताशा, नगारा, सनई-चौघड्याच्या निनादात पुण्याच्या वैभवशाली गणेशोत्सवाची सांगता होणार आहे. गणेशोत्सवाच्या शेवटच्या दिवसासाठी शहरातील गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांचे हात आता विसर्जन मिरवणुकीच्या तयारीत व्यस्त झाले आहेत. बाप्पाच्या आगमनापासून अहोरात्र राबलेल्या कार्यकर्त्यांच्या डोळ्यांसमोर आता निरोपाची वेळ उभी ठाकली आहे. शुक्रवारी (ता. २५) सकाळी साडेनऊ वाजता मंडईतील लोकमान्य टिळक पुतळ्यापासून मुख्य विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होणार आहे. पारंपरिक पद्धतीने आणि उत्साहात गणरायाला निरोप देण्यासाठी मानाच्या गणपतींसह प्रमुख मंडळांनी जय्यत तयारी केली आहे.

कसबा गणपती

मानाचा पहिला श्री कसबा गणपती सकाळी ९.३० वाजता मंडईतील लोकमान्य टिळक पुतळ्याजवळ पूजा झाल्यानंतर रजत पालखीतून मिरवणुकीत सहभागी होणार आहे. रमणबाग युवा मंच, परशुराम व रुद्रगर्जना ढोल-ताशा पथकांसह विविध दिंड्या आणि कामायनी प्रशालेतील विशेष मुलांची दिंडी सहभागी होणार आहे. टिळक चौकात दुपारी २.४५ वाजता मिरवणूक पूर्ण होणार आहे.

तांबडी जोगेश्वरी

तांबडी जोगेश्वरी गणपती सकाळी ८ वाजता जोगेश्वरी चौकातून पालखीत विराजमान होऊन मंडईतील मुख्य मिरवणुकीत सहभागी होईल. सतीश आढाव यांचे नगारा वादन, न्यू गंधर्व ब्रास बँड, विघ्नहर्ता, ताल आणि शिवमुद्रा ढोल-ताशा पथके सहभागी होणार आहेत. विष्णूनादचे कार्यकर्ते शंखनाद करणार असून, पारंपरिक वेशातील महिला-पुरुष कार्यकर्ते चांदीची पालखी खांद्यावरून वाहणार आहेत.

Pune Ganeshotsav 2026: गणेशोत्सवाच्या देखाव्यांना ‘AI’ची साथ; तंत्रज्ञानाने बदलले जिवंत देखाव्यांचे रूप

गुरुजी तालीम

मानाचा तिसरा श्री गुरुजी तालीम गणपती ‘माता महाकाली’च्या फुलांच्या आकर्षक रथातून मिरवणुकीत सहभागी होणार आहे. सकाळी ९.३० वाजता टिळक पुतळ्यापासून मिरवणुकीला सुरुवात होईल. जयंत नगरकर यांचे नगारावादन, अश्वराज ब्रास बँड, नादब्रह्म, गर्जना आणि शिवगर्जना ढोल-ताशा पथके सहभागी होणार आहेत.

तुळशीबाग गणपती

मानाचा चौथा श्री तुळशीबाग गणपती भव्य विष्णू रथातून मिरवणुकीत सहभागी होणार आहे. १६ फूट रुंद, २२ फूट लांब आणि ३२ फूट उंच रथावर १० फूट उंच विष्णूची मूर्ती आहे. मेट्रो पुलाच्या उंचीमुळे रथाची उंची कमी करण्यासाठी हायड्रॉलिक यंत्रणा वापरण्यात आली आहे. कमळात विराजमान गणराया, जलपरी, गाय, हत्ती, नाग आणि मत्स्य यांच्या फुलांच्या प्रतिकृती रथाचे आकर्षण असतील. लोणकर बंधूंचे नगारा वादन, स्वरूपवर्धिनी, गजलक्ष्मी आणि शिवमुद्रा पथके सहभागी होणार आहेत. सकाळी ९.३० वाजता मिरवणुकीला प्रारंभ होईल.

केसरीवाडा गणपती

मानाचा पाचवा केसरीवाडा गणपती फुलांनी सजविलेल्या पालखीतून मिरवणुकीत सहभागी होणार आहे. टिळक पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सकाळी १०.३० वाजता मिरवणुकीला सुरुवात होईल. बिडवे बंधूंचे सनई-चौघडा वादन, श्रीराम, शिवमुद्रा आणि अभेद्य ढोल-ताशा पथके असतील. इतिहासप्रेमी मंडळाचा महात्मा फुले यांच्या जन्मद्विशताब्दी वर्षानिमित्त ‘लोकमान्य टिळक व आगरकर यांचे महात्मा फुले यांनी केलेले स्वागत’ हा जिवंत देखावा साकारण्यात आला आहे. ‘सुजलाम सुफलाम’ रथही सहभागी होणार आहे.

वक्रतुंड रथातून ‘दगडूशेठ’ला निरोप

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या १३४व्या वर्षाच्या उत्सवाची सांगता मिरवणूक दुपारी ४ वाजता बेलबाग चौकातून सुरू होईल. ‘श्री वक्रतुंड’ रथ वृंदावन येथील प्रेम मंदिराच्या धर्तीवर साकारण्यात आला आहे. १५ बाय १५ फूट आकाराचा आणि २१ फूट उंच रथ आठ नक्षीदार स्तंभांनी सजविला आहे. विष्णू, कुबेर यांच्या प्रतिमा, शिखर, घुमट आणि जाळीदार नक्षीकाम हे आकर्षण ठरणार आहे. मानवसेवा रथासह स्वरूपवर्धिनी, प्रभात बँड, दरबार बँड आणि केरळचे चेंदा मेलम पथक सहभागी होणार आहे.

Pune Metro झाली मालामाल! केवळ 2 दिवसांमध्ये पुणे मेट्रोला ‘इतक्या’ कोटींचा महसूल प्राप्त

भाऊसाहेब रंगारी गणपती

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या गणरायाची सकाळी ७.३० वाजता सुवर्णगणेश धाम येथे पूजा होईल. त्यानंतर ८ वाजता ‘श्री विघ्नहर्ता’ रथातून मंडईतील टिळक पुतळ्याकडे प्रस्थान होईल. येथे मानाच्या पाचही गणपतींना पुष्पहार अर्पण करण्याची परंपरा जपली जाणार आहे. मानाच्या गणपतींचे विसर्जन झाल्यानंतर सायंकाळी ६ वाजता मंडईतून भाऊसाहेब रंगारी गणपतीच्या मिरवणुकीला सुरुवात होईल.

कोणार्कच्या रथातून मंडई गणपती

अखिल मंडई मंडळाच्या १३३व्या वर्षाच्या गणेशोत्सवाची सांगता मिरवणूक सायंकाळी होणार आहे. कोणार्क सूर्य मंदिराच्या वास्तुशैलीवर आधारित ३२ फूट उंच रथातून मंडई गणपती सहभागी होणार आहे. हत्ती, सिंह आणि गणपतीमागील सूर्याची प्रतिकृती रथाचे आकर्षण असेल. विद्युत रोषणाईने सजलेला हा रथ कलादिग्दर्शक विशाल ताजणेकर यांनी साकारला आहे. जयंत नगरकर बंधूंचे नगारावादन, न्यू गंधर्व बँड आणि शिवगर्जना पथकाचा सहभाग राहणार आहे.

Web Title: Pune 5 manache ganpati immersion vakrtunda mahakali devi rath pune ganeshotsav 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 23, 2026 | 07:53 PM

Topics:  

  • dagdusheth halwai
  • Ganesh Festival 2026
  • Ganeshotsav 2026
  • pune ganpati

संबंधित बातम्या

Girgaon Chowpatty: गणेश विसर्जन सोहळ्यात परदेशी पाहुण्यांचाही सहभाग, पर्यटन विभागाचा अनोखा उपक्रम
1

Girgaon Chowpatty: गणेश विसर्जन सोहळ्यात परदेशी पाहुण्यांचाही सहभाग, पर्यटन विभागाचा अनोखा उपक्रम

भक्तीला जनजागृतीची जोड! गणेश दर्शनासोबत योजनांची माहिती! ‘लोकसंवाद २०२६’मधून नागरिकांना थेट मार्गदर्शन
2

भक्तीला जनजागृतीची जोड! गणेश दर्शनासोबत योजनांची माहिती! ‘लोकसंवाद २०२६’मधून नागरिकांना थेट मार्गदर्शन

Anant Chaturdashi: भगवान विष्णूच्या अनंत रूपाची पूजा का करतात? जाणून घ्या सुशीला-कौंडिन्याची पौराणिक कथा
3

Anant Chaturdashi: भगवान विष्णूच्या अनंत रूपाची पूजा का करतात? जाणून घ्या सुशीला-कौंडिन्याची पौराणिक कथा

Ganeshotsav 2026: अपघातात व्हिडिओ नको, मदतीचा हात द्या! ‘सानपाडाचा राजा’ मंडळाचा माणुसकीचा जागर
4

Ganeshotsav 2026: अपघातात व्हिडिओ नको, मदतीचा हात द्या! ‘सानपाडाचा राजा’ मंडळाचा माणुसकीचा जागर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.