Pune News: विभागीय आयुक्त कार्यालयात अंदाजपत्रकाचे काम; प्रशासनाच्या कामात राजकीय हस्तक्षेप हाेण्याची शक्यता
पुणे: महापालिकेच्या मुख्य इमारतीबाहेर यापुर्वी अंदाजपत्रक तयार केले आहे. परंतु यावेळी विभागीय आयुक्त यांच्या कार्यालयातच २०२४-२५ या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक तयार करण्याच्या बैठका सुरु झाल्या आहेत. यामुळे अधिकाऱ्यांमध्ये उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे. प्रशासन जरी हे अंदाजपत्रक तयार करणार असले तरी यात राजकीय हस्तक्षेप हाेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
महापालिकेचे अंदाजपत्रक तयार करण्याचे काम स्थायी समिती करीत असते. महापािलकेच्या प्रशासनाने सादर केलेल्या अंदाजपत्रकावर स्थायी समितीत चर्चा हाेऊन ते अंतिम केले जाते. गेल्या चार वर्षापासून महापािलकेवर प्रशासकीय राज आहे . या कालावधीत महापािलकेच्या मुख्य इमारतीत अंदाजपत्रकावर चर्चा केली गेली नाही. घाेले राेड क्षेत्रीय कार्यालयात या बैठका पार पडल्या हाेत्या. तसेच लाेकप्रतिनिधींच्या काळातही महापालिकेच्या अंदाजपत्रकाला अंतिम स्वरुप हे बाहेर हाेणाऱ्या बैठकीतच दिले गेल्याची उदाहरणे घडली आहेत.
राजेंद्र भोसले यांच्याकडून तयारी
सध्याचे प्रशासक आणि आयुक्त डाॅ. राजेंद्र भाेसले यांनी डिसेंबर महीन्यापासूनच अंदाजपत्रकासंदर्भात तयारी सुरु केली हाेती. गेल्या काही दिवसापासून अंदाजपत्रक तयार करण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयात घेतल्या जात अाहे. यापुर्वीच्या प्रशासकांनी महापािलकेच्या मालकीच्या इमारत किंवा इतर कार्यालयात या बैठका घेतल्या. विभागीय आयुक्तांच्या व्हीआयपी कक्षात होणाऱ्या या बैठकांना महापािलकेचे अधिकारी उपस्थित राहत आहे. यामुळे अधिकारी हे कार्यालयात उपस्थित नसल्याचे चित्र गेल्या काही दिवसापासून पाहण्यास मिळत आहे. अधिकारी नसल्याने नागरीकांची कामे प्रलंबित राहत आहे. त्यांना अडचणी साेडविण्यासाठी काेणाकडे जावे हा प्रश्न पडत आहे.
तिन्ही पक्षांचे लक्ष
विभागीय आयुक्त कार्यालयात या बैठका हाेत असल्याने आगामी आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक तयार करताना राजकीय हस्तक्षेप हाेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्यात महायुती सत्तेत असुन, या युतीच्या तीनही पक्षांच्या प्रमुख नेत्यांचे पुण्याकडे लक्ष आहे. आगामी महापािलका निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर हे अंदाजपत्रक महत्वाचे ठरणार आहे. यामुळे या अंदाजपत्रकात राजकीय हस्तक्षेप हाेण्याची शक्यता आहे .
पुणे महानगरपालिकेचा कारभार आता पेपरलेस होणार
महानगरपालिकेचा कारभार आता पेपरलेस होणार आहे. ई-ऑफिस प्रणाली सुरू करण्याचे शासनाने निर्देश दिले आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) वतीने नागरिकांशी संबंधित सर्व विभागातील कामकाज ऑनलाईन केले जाणार आहे. राज्यभरातील विविध शासकीय कार्यालयांमध्ये ई-ऑफिस प्रणाली सुरू करण्याचे निर्देश राज्य शासनाने दिले आहेत. त्यानुसार पीएमआरडीएदेखील पाऊल उचलणार आहे. त्यामुळे आता महानगरपालिकेची कामे ऑनलाइन पद्धतीने होणार आहे.पीएमआरडीएच्या हद्दीतील ९ तालुक्यांतील 817 गावांचा समावेश असणाऱ्या सर्व कार्यालयांमध्ये आता पेपरलेस काम होणार आहे.
हेही वाचा: PMC: पुणे महानगरपालिकेचा कारभार आता पेपरलेस होणार; शासनाने दिले महत्वाचे निर्देश
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) वतीने नागरिकांशी संबंधित सर्व विभागातील कामकाज ऑनलाईन केले जाणार आहे. त्यामुळे पीएमआरडीएचा कारभार पेपरलेस होणार आहे. राज्यभरातील विविध शासकीय कार्यालयांमध्ये ई-ऑफिस प्रणाली सुरू करण्याचे निर्देश राज्य शासनाने दिले आहेत. त्यानुसार पीएमआरडीएदेखील पाऊल उचलणार आहे.