Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

लोणी काळभोर पोलिस ठाण्यावर आयुक्तांनी फिरवली भाकरी! एकाचवेळी ३२ कर्मचाऱ्यांच्या इतरत्र बदल्या

पोलिस ठाण्याच्या वरिष्ठांवर देखील अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष केंद्रीत केले असल्याची सूत्रांची माहिती आहे. या माहितीत थोडीही गडबड मिळताच अचानक याच पद्धतीने मोठी कारवाई होईल असेही सांगितले जाते.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 19, 2026 | 07:12 PM
लोणी काळभोर पोलिस ठाण्यावर आयुक्तांनी फिरवली भाकरी! एकाचवेळी ३२ कर्मचाऱ्यांच्या इतरत्र बदल्या
Follow Us
Follow Us:

एकाचवेळी ३२ कर्मचाऱ्यांची इतरत्र बदल्या
पुणे पोलिस दलात खमंग चर्चा
पोलिस आयुक्तांनी घेतला मोठा निर्णय

पुणे: पुणे शहर पोलिस दलातील काही वर्षांपुर्वीच दाखल झालेल्या व सर्वाधिक मोठे असलेल्या लोणी काळभोर पोलिस ठाण्यावर पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी कर्मचाऱ्यांच्या बदल्यारूपी भाकर फिरवली आहे. एकाचवेळी तब्बल ३२ कर्मचाऱ्यांची बदल्यांचे आदेश पोलिस आयुक्तांनी दिले आहेत. यामुळे पोलिस दलात मोठी खळबळ तर उडाली आहेच पण खमंग चर्चा देखील सुरू आहे.

पोलिस आयुक्त अमितेश कुमार अवैध धंदे, अवैध गोष्टी तसेच ड्रग्जप्रकरणात कडक भूमिका घेतलेली आहे. थोडी कानकून देखील कानावर येताच, त्यांच्याकडून वैयक्तिकरित्या लक्ष घालून कारवाई केली जाते. त्यानंतरही शहरातील अधून-मधून अवैध गोष्टी सुरू असल्याचे समोर येते.

लोणी काळभोर पोलिस ठाणे, तसे आडबाजूला अन् वरिष्ठांपासून दूर पडते. त्यामुळे तेथील गडबडीबाबत वरिष्ठांना कळत नाही किंवा कळणार नाही, असा समज आहे. दरम्यान, गेल्या काही महिन्यांत लोणी काळभोरच्या हद्दीतून अवैध धंदे सुरू असल्याचे समोर आले होते. सातत्याने कारवाया, तसेच ड्रग्जविरोधातील कारवाई देखील झाल्या होत्या. याप्रकरणात या ना त्या कारणांने काही अंमलदारांचे संबंध समोर आले होते. त्यातच मध्यंतरी एसीबीची एक कारवाई देखील फसली गेली होती. अन्यथा एसीबीचा ट्रॅप सक्सेस झाला असता तर मोठी लक्तरे वेशीवर टांगली गेली असती. दुसरीकडे मध्यंतरी एका ‘झीरो’ला गुन्हे शाखेने ताब्यात घेऊन सखोल तपास केला होता. वरिष्ठांच्या समोर उभा केल्यानंतर त्या झीरीने घडाघडा माहिती समोर टाकत काहींची नावे घेतली होती.

पुण्यातील राजकीय राड्यानंतर पोलिस आयुक्तांचा मोठा निर्णय; ‘आता यापुढे…’

यासर्व पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्तांनी लोणी काळभोर पोलिस ठाण्याबाबत गेल्या काही दिवसांपासून विशेष लक्ष केंद्रीत केले. तसेच, बुधवारीच अचानक एकाचवेळी पोलिस ठाण्यातील ३२ कर्मचाऱ्यांची उचलबांगडी केली. यानंतर पोलिस दलात मोठ्या चर्चेला उधान आले असून, एकप्रकारे भाकरी फिरवली गेल्याची चर्चा पोलिस दलात सुरू आहे.

पुणे पोलिसांबाबतच दुजाभाव का? मुंबई, नागपूरच्या तुलनेत पुण्यात पोलिसांचे मनुष्यबळ अत्यंत कमी

वरिष्ठांवरही विशेष लक्ष
पोलिस ठाण्याच्या वरिष्ठांवर देखील अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष केंद्रीत केले असल्याची सूत्रांची माहिती आहे. या माहितीत थोडीही गडबड मिळताच अचानक याच पद्धतीने मोठी कारवाई होईल असेही सांगितले जाते. दरम्यान, या सामूहिक बदल्यांमागे नेमके कारण काय, याबाबत अधिकृतरीत्या स्पष्ट माहिती देण्यात आलेली नसली तरी, पाच वर्षांचा कालावधी पुर्ण झाल्याने या बदल्या केल्याचे सांगितले जाते.

Web Title: Pune cp amitesh kumar transfered 32 officers in loni kalbhor police station

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 19, 2026 | 07:11 PM

Topics:  

  • Amitesh Kumar
  • Loni Kalbhor Police
  • Pune Police

संबंधित बातम्या

Pune MPSC Student Protest : आंदोलनाला हायकोर्टाचा दणका? नागरिकाची याचिका, राज्य सरकार-पोलिसांना नोटीस, उद्या होणार सुनावणी
1

Pune MPSC Student Protest : आंदोलनाला हायकोर्टाचा दणका? नागरिकाची याचिका, राज्य सरकार-पोलिसांना नोटीस, उद्या होणार सुनावणी

Pune Crime: पुण्यात खळबळ! ग्रामदैवत कसबा गणपती मंदिरात चोरी, ५०-६० हजारांची रोकड गायब
2

Pune Crime: पुण्यात खळबळ! ग्रामदैवत कसबा गणपती मंदिरात चोरी, ५०-६० हजारांची रोकड गायब

‘एकमेकांकडे पाहिलं’ अन् वाद पेटला, डिलिव्हरी बॉयच्या डोक्यात कोयत्याने वार; उत्तमनगरमधील घटनेनं खळबळ
3

‘एकमेकांकडे पाहिलं’ अन् वाद पेटला, डिलिव्हरी बॉयच्या डोक्यात कोयत्याने वार; उत्तमनगरमधील घटनेनं खळबळ

डॉक्टरला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं, पोलिसांची धमकी दिली अन्…; पुण्यातील धक्कादायक प्रकार
4

डॉक्टरला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं, पोलिसांची धमकी दिली अन्…; पुण्यातील धक्कादायक प्रकार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.