पुणे पोलिस दलात लोकसंख्येनुसार २१ हजार पोलिस आवश्यक असताना सद्य स्थितीत १० हजारपर्यंत पोलिस बळ पोहचले आहे. राज्यासह देशातील महत्त्वाच्या शहरांतील पोलिस दलाचे मनुष्यबळ पाहिल्यानंतर हे भयावह वास्तव स्पष्टपणे जाणवते.
वाहतूक विभागातील डिओंचा मनमानी कारभार चव्हाट्यांवर आल्यानंतर पोलीस आयुक्तांनी डिओंना दणका देत एकाचवेळी तीसही विभागातील या ड्युटी ऑफिसर (डिओ) असलेल्या या पोलीस कर्मचाऱ्यांची उचलबांगडी करण्याचे आदेश दिले.
गुन्हे शाखेचे कामकाज प्रभावी करण्यासाठी अधिकाऱ्यांनी गुन्हे शाखेची पुनर्रचना करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पुढील काळात गुन्हे शाखेच्या कामकाजात सुधार होईल, अशी अपेक्षा आहे.
Amitesh Kumar press conference in pune :पुण्यातील स्वारगेट बसस्थानकामध्ये 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार करण्यात आला. यामधील आरोपीला अटक करण्यात आली असून पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषद घेत…
सोशल मिडीया वापरताना आपण काय करतोय याची नेहमी जाणीव ठेवा. कोणतीही पोस्ट तुमच्या अंगलट येऊ नये, यासाठी तुम्हीच तुमच्यासाठी लक्ष्मण रेषा आखून घ्या, असा सल्ला पोलीस आयुक्तांनी दिला.
कडक शिस्तीचे पोलीस आयुक्त म्हणून ओळखले जात असलेल्या पुणे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी कोरेगांव पार्क परिसरात पायी पेट्रोलिंग करत नागरिकांशी संवाद साधला.
बेकायदा गोष्टी करत असाल तर हे शहर सोडून जा, अन्यथा तुमच्या सात पिढ्यांची आठवण करून देऊ, असा सज्जड दम पुन्हा एकदा पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी गुन्हेगारांना दिला आहे.
सुरक्षित म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात रहिवाशी असलेल्या एका विशिष्ट वर्गाला पिस्तूल "कंबरेला" हवेहवेसे वाटू लागले आहेत. त्यामुळे पुणे पोलिसांकडे अर्ज करून पिस्तूल बाळगण्याची मागणी करत आहेत.
Traffic Rules: पुणे शहरात दुचाकीस्वारासोबत सहप्रवाशांनी देखील हेल्मेट घालावे अन्यथा पोलिसांकडून कारवाई करण्यात येणार, अशा बातम्या गेली दोन दिवसांपासून प्रसिद्ध होत आहेत.
"एखादी अतिरेकी संघटना गर्दीचे ठिकाण लक्ष करून बॉम्बस्फोटासारखी दुर्घटना घडवून आणून त्यातून मोठ्या प्रमाणात जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.." अशा आशयाचे पत्र चक्क पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या सहीने…
हायप्रोफाईल अपघातप्रकरणानंतर प्रथमच पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. मात्र, ही भेट शहरातील वाहतुकीच्या अनुषंगाने असल्याचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी सांगितले.
पुणे : ‘वाहतूककोंडी’ फोडण्यासाठी पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी स्वतः रस्त्यावर उतरून पाहणी सुरू केली असून, गुरुवारी आयुक्तांनी विद्यापीठ चौकात सतत होणाऱ्या कोंडीबाबत पाहणी केली. त्यावेळी आयुक्तांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले.…
संजय राऊत यांनी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्यावर सवाल उपस्थित करत आता परेड काढणार का असा प्रश्न उपस्थित केला आहे. पत्रकार परिषद घेत संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर आरोप केला आहे.
शहरातील अवैध धंदे करणारे लोक रडारवर आले आहेत. पुणे पोलिसांनी दुसऱ्या दिवशी देखील परेड करत अवैध धंदे करणारे आणि बेकायदा शस्त्रे बाळगणाऱ्या लोकांची हजेरी घेतली आहे.
पुण्याचे पोलीस आयुक्त म्हणून नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची नियुक्ती करण्यात आली. चहूबाजूंनी वाढलेल्या गुन्हेगारीला आळा घालण्याचे आव्हान नव्या पोलीस आयुक्तांसमोर असणार आहे.