Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Purandar Airport : हक्कसोड पत्र दिलेल्या बहिणींच्या नव्याने आलेल्या हरकती फेटाळणार; जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्टच सांगितलं

जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी पुरंदरच्या प्रशासकीय इमारतीत पुरंदर विमानतळ प्रकल्पबाधित शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 23, 2026 | 02:05 PM
हक्कसोड पत्र दिलेल्या बहिणींच्या नव्याने आलेल्या हरकती फेटाळणार; जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्टच सांगितलं

हक्कसोड पत्र दिलेल्या बहिणींच्या नव्याने आलेल्या हरकती फेटाळणार; जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्टच सांगितलं

Follow Us
Follow Us:

सासवड/संभाजी महामुनी : बहिणीने पूर्वीच हक्कसोड पत्र दिले मात्र आता त्यावर पुन्हा हरकत घेतली आहे, काही प्रकरणात आठ ते दहा गुंठे क्षेत्राचा कोर्टात वाद सुरु असताना संपूर्ण क्षेत्रावर हरकत घेतली आहे. तसेच काही प्रकरणात भावाने स्वतः खरेदी केलेल्या जमिनीवर बहिणीने हक्क सांगून हरकत घेतल्याचे दिसून आले आहे. यामध्ये केवळ शेतकऱ्यांना त्रास देण्याच्या हेतूने हरकती घेतल्याचे दिसत असल्याने अशा हरकती फेटाळण्यात येतील आणि जमिनीचा मोबदला संबंधित शेतकऱ्यांना देण्यात येईल, असे पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी स्पष्ट केले.

 

पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाच्या भूसंपादनाची प्रक्रिया सुरु असून, शेतकऱ्यांच्या संमती घेवून त्यांना रोख स्वरुपात मोबदला देण्यात येत आहे. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी पुरंदरच्या प्रशासकीय इमारतीत प्रकल्पबाधित शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. यावेळी उपजिल्हाधिकारी सतीश राऊत, भूसंपादन अधिकारी कल्याण पांढरे, प्रांताधिकारी वर्षा लांडगे, संगीता चौघुले, तहसीलदार विक्रम राजपूत, संदीप पाटील, तालुका कृषीअधिकारी श्रीधर चव्हाण, भूमी अभिलेख अधिकारी स्मिता गौड तसेच सर्व विभागाचे अधिकारी, प्रतिनिधी आणि शेतकरी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डुडी यांनी सांगितले की, आतापर्यंत ११५० हेक्टर जमीनीच्या भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. अनेक शेतकऱ्यांच्या तहसील प्रांताधिकारी, जिल्हाधिकारी तसेच न्यायालयीन स्तरावरील तक्रारी होत्या. त्यासंबंधित शेतकऱ्यांशी चर्चा केली. जेणेकरून त्यांचे पैसे केसेसमुळे कोर्टात अडकून न पडता त्यांना त्वरित मिळावेत यादृष्टीने शेतकऱ्यांशी समोरासमोर चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. यातील बहुसंख्य केसेसमध्ये तोडगा निघण्याचे दोन्ही बाजूच्या शेतकऱ्यांनी मान्य केले असल्याने पुढील सोमवारी २९ जून रोजी एकदा सुनावणी घेवून समाधानकारक अंतिम निकाल देण्यात येईल.

हे सुद्धा वाचा : पुरंदर विमानतळ बाधितांच्या प्रश्नांवर जिल्हाधिकाऱ्यांचा खुलासा; मोबदला वितरणासाठीच्या विलंबाचं कारणही सांगितलं

जिल्हा न्यायाधीशांना विनंती केली – डुडी

विमानतळ प्रकल्पांतर्गत येणाऱ्या अनेक शेतकऱ्यांचे तहसील, प्रांत आणि जिल्हाधिकारी स्तरावर खटले सुरु आहेत त्यावर आमच्या पातळीवर तातडीने खटले मार्गी लावण्यात येत आहेत. त्याचबरोबर दिवाणी स्वरूपाचे अनेक खटले वर्षानुवर्षे तालुका आणि जिल्हा न्यायालयात सुरु आहेत तेही तातडीने निकाली काढण्यासाठी जिल्हा न्यायाधीशांना विनंती केली आहे. त्यांनी याबाबत सकारात्मक प्रतिसाद दाखवला असून, अशा खटल्यांची यादी तयार करून जिल्हा न्यायाधीशांच्या माध्यमातून सुनावणी घेवून निकाली काढण्यात येतील. उपजिल्हाधिकारी सतीश राऊत आठवड्यातून शुक्रवार आणि सोमवारी सासवडला उपस्थित राहणार असून, तेही या कामी सुनावणीस मदत करतील असे डुडी यांनी सांगितले.

Web Title: Pune district collector jitendra dudi interacted with farmers at the purandar administrative building

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 23, 2026 | 02:05 PM

Topics:  

  • Farmers
  • Purandar Airport
  • Purandar airport project

संबंधित बातम्या

Purandar Airport News: पुरंदर विमानतळ भूसंपादन: ९१० हेक्टर जमीन संपादित, ३,८७५ कोटींचा मोबदला वाटप; २० ऑक्टोबरची डेडलाईन
1

Purandar Airport News: पुरंदर विमानतळ भूसंपादन: ९१० हेक्टर जमीन संपादित, ३,८७५ कोटींचा मोबदला वाटप; २० ऑक्टोबरची डेडलाईन

Pratap Sarnaik: शेतकऱ्यांना लवकरच मिळणार मदत; जीआर काढण्याची प्रक्रिया सुरू – प्रताप सरनाईक
2

Pratap Sarnaik: शेतकऱ्यांना लवकरच मिळणार मदत; जीआर काढण्याची प्रक्रिया सुरू – प्रताप सरनाईक

Maharashtra Drought: कृषिमंत्री थेट बांधावर; सोयाबीन नुकसानीची केली पाहणी, लवकरच…
3

Maharashtra Drought: कृषिमंत्री थेट बांधावर; सोयाबीन नुकसानीची केली पाहणी, लवकरच…

आधी धरणग्रस्तांच्या प्रश्नांवर तोडगा काढा, मगच…; पवना जलवाहिनीवर सुनील शेळकेंची भूमिका स्पष्ट
4

आधी धरणग्रस्तांच्या प्रश्नांवर तोडगा काढा, मगच…; पवना जलवाहिनीवर सुनील शेळकेंची भूमिका स्पष्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.