Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 9 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shambhuraj Desai: शेतकऱ्यांसोबत दिवाळीचा आनंद! पालकमंत्री शंभूराज देसाई यांची शेतकऱ्यांसोबत बांधावर दिवाळी

Shambhuraj Desai: पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी पिंपरी येथे शेकडो शेतकऱ्यांसोबत बांधावर दिवाळी साजरी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच उपलब्ध पाण्याचा जपून आणि योग्य नियोजन करून वापर करण्याचे आवाहन केले. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सकारात्मक कार्यवाही करण्याची ग्वाहीही त्यांनी दिली. 

  • By श्वेता झगडे
Updated On: Nov 09, 2026 | 01:05 PM
शेतकऱ्यांसोबत दिवाळीचा आनंद! पालकमंत्री शंभूराज देसाई यांची शेतकऱ्यांसोबत बांधावर दिवाळी; शेकडो शेतकऱ्यांशी साधला संवाद

शेतकऱ्यांसोबत दिवाळीचा आनंद! पालकमंत्री शंभूराज देसाई यांची शेतकऱ्यांसोबत बांधावर दिवाळी; शेकडो शेतकऱ्यांशी साधला संवाद

Follow Us
Follow Us:
  • पालकमंत्री शंभूराज देसाई यांची शेतकऱ्यांसोबत बांधावर दिवाळी
  • शेकडो शेतकऱ्यांशी साधला संवाद
  • बांधावर दिवाळी साजरी करत शंभूराज देसाई शेतकऱ्यांच्या भेटीला
दहिवडी : दिवाळीच्या मंगलमय पर्वानिमित्त तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी माण तालुक्यातील पिंपरी येथे शेतकऱ्यांसोबत बांधावर दिवाळी साजरी केली. यावेळी शेतकऱ्यांसोबत दिवाळी फराळाचा आनंद घेत त्यांनी शेतकऱ्यांशी मनमोकळा संवाद साधला. या कार्यक्रमाला शेकडो शेतकरी बांधव आणि शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. (Shambhuraj Desai)

आगामी काळात अल्प निनोच्या संभाव्य संकटामुळे पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता लक्षात घेता, शेतकऱ्यांनी तसेच नागरिकांनी पिण्याचे पाणी जपून व काटकसरीने वापरावे, असे आवाहन पालकमंत्री देसाई यांनी केले. पाणीटंचाई निर्माण झाल्यास मागणीनुसार तातडीने टँकर उपलब्ध करून देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी आणि तहसीलदारांना दिल्या असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

संगमवाडीतील पाण्याच्या टाकीचे काम दोन महिन्यात पूर्ण करा, अन्यथा…; मनसेचा प्रशासनाला इशारा 

शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे

राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून दिवाळीनिमित्त शेतकऱ्यांना देण्यात आलेला पाच हजार रुपयांचा बोनस ही केवळ सुरुवात असल्याचे त्यांनी सांगितले. लवकरच ‘गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार’ ही योजना सुरू करण्यात येणार असून, धरण व तलावांमधील गाळ शेतकऱ्यांनी आपल्या शेतात वापरावा, असे आवाहन त्यांनी केले.

शेतकऱ्यांना पाच हजार रुपयांचे अनुदान मिळाले असले तरी भूमिहीन आणि शेतमजुरांचाही विचार होणे आवश्यक आहे. हा प्रश्न शासनदरबारी मांडून शेतमजुरांसाठी विशेष योजना आखण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

शेखर गोरेंच्या कार्याचे पालकमंत्र्यांकडून कौतुक

यावेळी शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख शेखर गोरे यांच्या कार्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी विशेष कौतुक केले. शेखर गोरे हे जनतेसाठी स्वखर्चातून लोकहिताची कामे करीत असून, ते आमचे खंबीर नेते आहेत, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
शेतकऱ्यांच्या सुख-दुःखात सहभागी होत बांधावर दिवाळी साजरी करण्याच्या या उपक्रमामुळे पिंपरी परिसरातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

बांधावर दिवाळी साजरी करण्याचा उपक्रम चर्चेत

सणासुदीच्या काळात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्यासोबत दिवाळी साजरी केल्याने या उपक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. शेतकरी हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा आधार असून त्यांच्या प्रश्नांकडे लक्ष देणे आवश्यक आहे. अशा प्रत्यक्ष भेटींमुळे शेतकरी आणि लोकप्रतिनिधी यांच्यात संवादाचे व्यासपीठ निर्माण होण्यास मदत होते.

पिंपरी येथील या उपक्रमातून पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या प्रश्नांवर लक्ष देण्याची ग्वाही दिली. त्यामुळे या बांधावरच्या दिवाळी उपक्रमाची परिसरात चर्चा होत आहे.

Fire Incidents: “लक्ष्मीपूजनाच्या रात्री मुंबई अन् ठाण्यात कुठे काय घडलं? १७ मजली इमारतीला आगीसह अनेक ठिकाणी अग्नितांडव…

💡

Frequently Asked Questions

  • Que: पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी शेतकऱ्यांसोबत दिवाळी कुठे साजरी केली?

    Ans: पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी पिंपरी येथे शेतकऱ्यांसोबत बांधावर दिवाळी साजरी केली.

  • Que: या कार्यक्रमात किती शेतकरी सहभागी झाले होते?

    Ans: या कार्यक्रमात शेकडो शेतकरी सहभागी झाले होते. यावेळी शंभूराज देसाई यांनी त्यांच्याशी संवाद साधला.

  • Que: शंभूराज देसाई यांनी शेतकऱ्यांना कोणते आवाहन केले?

    Ans: उपलब्ध पाण्याचा जपून आणि योग्य नियोजन करून वापर करण्याचे आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केले. तसेच त्यांच्या प्रश्नांवर कार्यवाही करण्याची ग्वाही दिली.

Web Title: Guardian minister shambhuraj desai celebrates diwali with farmers at pimpri sz

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 09, 2026 | 01:05 PM

Topics:  

  • Diwali
  • Farmers
  • maharashtra
  • Shambhuraj Desai

संबंधित बातम्या

पुण्यात ऐन दिवाळीत गुन्हेगारीचा थरार! दोन वेगवेगळ्या घटनांत तरुणांवर शस्त्राने हल्ले; नेमकं काय घडलं?
1

पुण्यात ऐन दिवाळीत गुन्हेगारीचा थरार! दोन वेगवेगळ्या घटनांत तरुणांवर शस्त्राने हल्ले; नेमकं काय घडलं?

फिनिक्स मॉल परिसरात मध्यरात्री थरार! सिमेंटचा गट्टू तरुणाच्या डोक्यात घातला अन्…
2

फिनिक्स मॉल परिसरात मध्यरात्री थरार! सिमेंटचा गट्टू तरुणाच्या डोक्यात घातला अन्…

Firecracker Burn First Aid: दिवाळीत फटाक्यांमुळे हात भाजला आहे? घाबरून न जाता ‘हे’ घरगुती उपाय केल्यास तातडीने मिळेल आराम
3

Firecracker Burn First Aid: दिवाळीत फटाक्यांमुळे हात भाजला आहे? घाबरून न जाता ‘हे’ घरगुती उपाय केल्यास तातडीने मिळेल आराम

Dharashiv Fire News: दोन चिमुकल्यांसह तीन पिढ्या संपल्या! किराणा दुकानाला लागलेल्या आगीत लगतचे घरही जळून खाक
4

Dharashiv Fire News: दोन चिमुकल्यांसह तीन पिढ्या संपल्या! किराणा दुकानाला लागलेल्या आगीत लगतचे घरही जळून खाक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.