पुणे: काल पुण्यात संध्याकाळच्या सुमारास सदाशिव पेठेत एक भीषण अपघात घडला. एक मद्यधुंद कार चालकाने १२ विद्यार्थ्यांना गाडीने उडवल्याची दुर्दैवी घटना घडली. पुण्याच्या मध्यवर्ती भागात ही घटना घडली आहे. सदाशिव पेठ हा कायमच वर्दळ असणारा भाग आहे. या ठिकाणचे रस्ते अरुंद आहेत. दरम्यान या प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात आली आहे. जखमीनवर उपचार सुरू आहेत.
पुणे शहरातील सदाशिव पेठेत असणाऱ्या भावे हायस्कूल जवळ एका कार चालकाने चहा पित असणाऱ्या १२ विद्यार्थ्यांना धडक दिली. यात १२ जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. दोन जणांची प्रकृती गंभीर असल्याचे समोर आले आहे. य घटनेचे सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आले आहे.
दरम्यान माहिती मिळताच आमदार हेमंत रासने यांनी घटनास्थळी भेत दिली. हेमंत रासने यांनी या सर्व घटनेची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिली. या विद्यार्थ्यांवर तातडीने उपचार करण्यात यावेत असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. तसेच या विद्यार्थ्यांवरील उपचारांचा खर्च शासनातर्फे केला जाणार असल्याचे समोर आले आहे.
कालच्या अपघातात काही स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी देखील जखमी झाले आहेत. येत्या रविवारी ते एमपीएससीच्या परीक्षेला सामोरे जाणार होते. मात्र कालच्या अपघातात टे जखमी झाल्याने त्यांच्या परीक्षेबद्दल काही वेगळा पर्याय काढला जातो का ते पाहणे महत्वाचे असणार आहे.
नेमके काय घडले?
कल्याणीनगरमधील ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’ म्हणून ओळखला जाणारा पोर्षे अपघातानंतर आता पुण्याच्या मध्यभागात ड्रंक अँड ड्राइव्हचे प्रकरण घडले असून, एका मद्यपी चालकाने भरधाव वेगात चहाच्या टपरीवर थांबलेल्या तरुण-तरुणी अश्या तबल १२ जणांना उडवल्याची खळबळजनक घटना घडली. हा भीषण अपघात काल सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास घडला. यातील दोघे गंभीर जखमी असून, इतरांवर प्राथमिक उपचारकरून सोडण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी चालक आणि त्याच्या शेजारी बसलेल्या मित्राला पकडले आहे.
Pune Accident: पुण्यात पुन्हा ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’; भर वस्तीत 12 जणांना उडवले, सदाशिव पेठेतील घटना
याप्रकरणी पोलिसांनी कारचालक जयराम शिवाजी मुळे (वय २७) याच्यासह गाडीत बसलेला मित्र राहुल गोसावी या दोघांना ताब्यात घेतले आहे. त्यांची ससून रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यास नेण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
याअपघातात अविनाश दादासाहेब फाळके (वय ३०, रा. माळशिरस सोलापूर), प्रथमेश पांडुरंग पतंगे (वय २६), संदीप सुनील खोपडे (२८), सोनाली सुधाकर घोळवे (वय ३०), मंगेश आत्माराम सुरवसे (३३) तसेच अमित अशोक गांधी (वय ४५) समीर श्रीपाद भाकलीकर (वय ४५), सोमनाथ केशव मेरुकर (वय २८) प्रशांत ब्रह्मदेव बंडगर (वय३०) अशी जखमी झालेल्याची नावे असून, इतर तिघांची नावे समजू शकलेले नाही. दरम्यान यातील दोघांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. तर या 9 जणांना प्राथमिक उपचार करून घरी सोडण्यात आले आहे.