Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra च्या राजकारणात भूकंप? शिवसेनेच्या मंत्र्यांचा मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार, निवडणुकीआधी काय घडले?

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी शिवसेनेची प्री-कॅबिनेट बैठक झाली. त्यानंतर झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मात्र एकनाथ शिंदे यांना वगळता शिवसेनेचा एकही मंत्री उपस्थित नव्हता.

  • By anuradha sagar
Updated On: Nov 18, 2025 | 05:00 PM
Maharashtra च्या राजकारणात भूकंप? शिवसेनेच्या मंत्र्यांचा मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार, निवडणुकीआधी काय घडले?
Follow Us
Follow Us:
  • मंत्रिमंडळ बैठकीला शिंदे गटाने पाठ फिरवली
  • पक्षांतरावरून दोन्ही पक्षांमध्ये नाराजीचा सूर
  • अंतर्गत फोडाफोडीवरून देवेंद्र फडणवीसांनी ठणकावले
Maharashtra Politics:  राज्याचा राजकारणातून एक महत्त्वाची राजकीय घडामोड समोर आली आहे. आज (१८ नोव्हेंबर) रोजी झालेल्या महाराष्ट्र मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिवसेना शिंदे गटाचे मंत्री अनुपस्थित होते. शिवसेना आणि भाजप नेत्यांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून मतभेद असल्याची चर्चा आहे. त्यातच आज शिंदे गटाच्या नेत्यांनी मंत्रिमंडळ बैठकीकडे पाठ फिरवल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

शिवसेनेचे मंत्री मंत्रालयात आले पण ते मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपस्थित राहिले नाहीत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंत्रिमंडळाचे कामकाज संपल्यानंतर शिवसेनेचे सर्व मंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटण्याचे नियोजन करत होते.

मोठी बातमी! बिबट्यांचा धोका कमी होणार; केंद्र सरकारने दिली ‘या’ कृतीला मान्यता

असंतोषाचे कारण आणि मुख्यमंत्र्यांचा स्पष्ट संदेश

दरम्यान, शिवसेनेच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि त्यांची नाराजीही व्यक्त केली. मंत्र्यांच्या असंतोषाचे मुख्य कारण डोंबिवलीतील भाजप पक्षप्रवेश हे होते. मंत्र्यांच्या नाराजीला थेट उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, उल्हासनगरमध्ये तुम्हीच त्याची सुरुवात केली होती. तुम्ही केले तर योग्य आणि भाजपने केले तर ते चुकीचे. असं चालणार नाही. त्यामुळे आतापासून एकमेकांच्या कार्यकर्त्यांना पक्षप्रवेश दिले जाणार नाही, हा नियम दोन्ही पक्षांना पाळावा लागेल.

मंत्री बावनकुळे यांनी नाराजीच्या वृत्त फेटाळले

भाजप नेते व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिवसेना मंत्र्यांच्या नाराजीबाबतच्या वृत्त फेटाळून लावले आहेत. मंत्रिमंडळ बैठकीला गैरहजर राहिलेल्या मंत्र्यांच्या अनुपस्थितीमागे नाराजी नसून निवडणूक वचनबद्धता कारणीभूत आहे. शिवसेना आणि भाजप—दोन्ही पक्षांचे काही मंत्री निवडणुकीसंदर्भातील कार्यक्रमामुळे बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत. त्यामुळे नाराजीचा कोणताही मुद्दा नाही.

Ajit Pawar News: नारळ, फुले, हळद-कुंकू, कापलेले लिंबू! अजित पवारांच्या घरासमोर भानामतीचा प्रकार

मुख्यमंत्र्यांसोबत दोन महत्त्वाच्या बैठकांना मंत्री उपस्थित

बावनकुळे म्हणाले की, मुख्यमंत्र्यांसोबत पायाभूत सुविधा विकास आणि वन विभागाशी संबंधित अशा दोन महत्त्वाच्या बैठकांचे आयोजन करण्यात आले होते. बिबट्या दर्शनासारख्या वनसंबंधित मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा झाली. शिवसेनेचे अनेक मंत्री या बैठकीत सहभागी झाले होते. भाजपचेही आठ मंत्री निवडणुकीतील कार्यक्रमांमुळे अनुपस्थित होते, असे त्यांनी सांगितले.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी शिवसेनेची प्री-कॅबिनेट बैठक झाली. त्यानंतर झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मात्र एकनाथ शिंदे यांना वगळता शिवसेनेचा एकही मंत्री उपस्थित नव्हता. उपस्थितीबाबत विचारले असता शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले की, “एकनाथ शिंदे यांनी आम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी आवश्यक आकडेवारी आणि डेटा गोळा करण्याचे निर्देश दिले आहेत.”

मात्र, या निमित्ताने मंत्रिमंडळाची बैठक सोडून शिंदे गट कोणती महत्त्वाची रणनीती आखत होता, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. या घडामोडीमुळे शिंदे गटात पडद्यामागे काही गंभीर नाराजी असल्याची कुजबुजही सुरु झाली आहे.

 

Web Title: Maharashtra politics shiv sena ministers boycott cabinet meeting

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 18, 2025 | 05:00 PM

Topics:  

  • CM Devendra Fadnavis
  • Eknath Shinde
  • Maharashtra Politics

संबंधित बातम्या

Maharashtra Breaking News Today 2026: राज्यात ऊन-पावसाचा खेळ; ५ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा यलो अलर्ट
1

Maharashtra Breaking News Today 2026: राज्यात ऊन-पावसाचा खेळ; ५ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा यलो अलर्ट

मोठी बातमी ! शिंदे गटाच्या नेत्याकडून विमानतळावर फायरिंग; दोन सुरक्षा कर्मचारी जखमी
2

मोठी बातमी ! शिंदे गटाच्या नेत्याकडून विमानतळावर फायरिंग; दोन सुरक्षा कर्मचारी जखमी

‘दिमागी नक्षलवाद’च्या टीकेवरून फडणवीस-सपकाळ आमनेसामने; सोनिया गांधींच्या व्हिडिओवरून राजकारण तापले
3

‘दिमागी नक्षलवाद’च्या टीकेवरून फडणवीस-सपकाळ आमनेसामने; सोनिया गांधींच्या व्हिडिओवरून राजकारण तापले

‘सक्षम शेतकरी, कर्तृत्ववान युवक आणि सशक्त महिला हीच विकासाची खरी व्याख्या’; एकनाथ शिंदेंचा विश्वास
4

‘सक्षम शेतकरी, कर्तृत्ववान युवक आणि सशक्त महिला हीच विकासाची खरी व्याख्या’; एकनाथ शिंदेंचा विश्वास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.