Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

खरंच फेरीवाले आत्मनिर्भर होणार? नऊ महिने बंद असलेली स्वनिधी योजना सुरू; बँकांकडून योग्य प्रतिसाद नाही

बँकांकडून योग्य प्रतिसाद मिळत नसल्याची तक्रार आता फेरीवाल्यांनी केली आहे. स्वनिधी योजना पुन्हा सुरू झाली असली तरीही त्याचा फायदा मात्र अजूनही फेरीवाले घेऊ शकत नाहीयेत, जाणून घ्या कारण

  • By दिपाली नाफडे
Updated On: Nov 17, 2025 | 01:23 PM
फेरीवाल्यांची नाराजी (फोटो सौजन्य - iStock)

फेरीवाल्यांची नाराजी (फोटो सौजन्य - iStock)

Follow Us
Close
Follow Us:
  • ९ महिन्यानंतर स्वनिधी योजना चालू
  • तरीही फेरीवाल्यांमध्ये नाराजी
  • बँकेकडून प्रतिसाद नाही 

पुणे/आकाश डुमे:  फेरीवाल्यांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी सुरु करण्यात आलेली आत्मनिर्भर योजना गेली ९ महिने बंद होती, परंतु योजना पुन्हा सुरू झाल्यानंतर बँकांकडून फेरीवाल्यांना योग्य प्रतिसाद मिळत नसल्याची तक्रार फेरीवाल्यांकडुन करण्यात आली आहे. फेरीवाल्यांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी योजना बनवली आहे, परंतु बँकाच्या चुकीच्या प्रतिसादामुळे मुळ हेतूलाच हरताळ फासण्यात येत आहे. आत्मनिर्भर होण्यापासून चुकीच्या प्रतिसादामुळे फेरीवाले दूर लोटले जात असल्याची बाब समोर आली आहे.

९ महिने बंद असलेल्या योजनेला केंद्र सरकारने ३१ मार्च २०३० पर्यंत मुदतवाढ दिली आहे. या योजने अंर्तगत तीन टप्प्यामध्ये पेसै दिले जातात. पहिल्या टप्प्यातील पैसे परत फेड केल्यानंतर दुसऱ्यांदा टप्प्याचा फायदा घेण्यासाठी अर्जदार पाञ होतो. यासाठी नव्याने फॉर्म भरण्याची आवश्यकता नाही, पूर्वीचे कर्ज बंद करुन योजनेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी पात्र करण्याचे अधिकार बँकांकडे आहेत परंतु बँकांकडून योग्य प्रतिसाद मिळत नसल्यामुळे फेरीवाल्यांना महापालिकेमध्ये खेटया घालाव्या लागतात. 

फेरीवाला धाेरण अंमलात येताच अनधिकृत फेरीवाल्यांची मुजाेरी राेखली जाणार

आता पर्यंत ६२४८९ अर्ज आले होते त्यातील ४६४४५ फेरीवाल्यांना या योजनेचा फायदा झाला आहे. एकूण ७४.३३ टक्के फेरीवाल्यांना याचा फायदा झाला आहे. यात ६२ हजार अर्जापैकी पहिल्या टप्प्यातील ४६४४५ फेरीवाल्यांना कर्ज मिळाले आहे, दुसऱ्या टप्प्यात ११५७१, तिसऱ्या टप्प्यात १६८६ फेरीवाल्यांना या योजनेचा लाभ घेता आला आहे. पहिल्या टप्प्यातील लाभधारक पाहता दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील लाभधारकांची संख्या खूप कमी आहे. याला बँकांचा अयोग्य प्रतिसाद कारणीभूत असल्याचे समोर आले आहे. बँकांचा योग्य प्रतिसाद मिळाल्यास उर्वरीत टप्प्यातील लाभधारकांची संख्या वाढण्यास मदत होईल आणि फेरीवाले आत्मनिर्भर बनण्यास अजून भक्कम पाऊल पडेल.

योजनेतील फेरबदलांनुसार किंवा पहिल्या टप्प्यात फेरीवाल्यांना पुर्वी जे १० हजार रुपये मिळणार होते त्यामध्ये वाढ करुन ती रक्कम आता १५ हजार केली आहे, टप्प्यातील कर्ज २० हजाराहुन वाढून २५ हजार केले आहे, तिसऱ्या टप्प्यातील २५ हजाराहून वाढवून ५० हजार करण्यात आले आहे.

फेरीवाला म्हणजे नक्की कोण ?

नगरवासीयांच्या आर्थिक कुवतीप्रमाणे स्वस्त दरात वस्तु, आणि सेवांची उपलब्धता सुनिश्चित करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजवतात त्यांना त्यांना पथविक्रेता म्हणतात.

फेरीवाला धोरण अद्याप कागदावरच – मुंबई पालिका आणि राज्य सरकारची उदासीनता कारणीभूत

अग्रणी बँकेची सूचना

अग्रणी बँकेने दिलेल्या सूचनेनुसार पहिल्या टप्प्यातील कर्ज बंद झाल्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या कर्जासाठी दुसरा फॉर्म भरण्याची आवश्यकता नाही, पहिले कर्ज फेडल्यानंतर ते बंद करण्याची प्रक्रीया बँकांनीच करायची आहे. त्यानंतर दुसरया कर्जासाठी फेरीवाले आपोआप पाञ होतील त्यासाठी महापालिकेत जाण्याची आवश्यकता नाही.

फेरीवाल्यांची आर्थिक क्षमता वाढवण्यासाठी योजना

केंद्र सरकारने पी एम स्वनिधी योजना उदयाजकता, आर्थिक साक्षरता, डीजिटल कौशल्य याबाबतीत फेरीवाल्यांची क्षमता वाढवण्यासाठी आणली गेली आहे.

पी. एम. स्वनिधी योजनेचा फायदा अधिकाअधिक फेरीवाल्यांनी घ्यावा आणि आत्मनिर्भर बनण्याकडे एक पाऊल टाकावे, ही शासनाची महत्वपूर्ण योजना आहे. अर्ज केलेल्या अर्जदारांपैकी ७४ टक्के फेरीवाल्यांना कर्ज मिळाले आहे – रामदास चव्हाण, समाज विकास अधिकारी, पुणे महापालिका

Web Title: Will hawkers really become self reliant the swanidhi scheme closed for nine months is being launched

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 17, 2025 | 01:23 PM

Topics:  

  • maharashtra news
  • Pune
  • pune news

संबंधित बातम्या

Ahilyanagar News: अतिवृष्टी होऊन गेली सुद्धा मात्र शेतकरी मदतीपासून वंचितच! चिंचोडी शिराळ परिसरातील बळीराजा नाराज
1

Ahilyanagar News: अतिवृष्टी होऊन गेली सुद्धा मात्र शेतकरी मदतीपासून वंचितच! चिंचोडी शिराळ परिसरातील बळीराजा नाराज

Pune Navale Bridge Accident : नवले पूल अपघातावर Supriya Sule यांची प्रतिक्रिया
2

Pune Navale Bridge Accident : नवले पूल अपघातावर Supriya Sule यांची प्रतिक्रिया

मुलांना तंत्रज्ञानाचे ‘गुलाम’ बनू न देता, त्याचा ‘मालक’ बनायला शिकवा; शिक्षक अमोल हंकारे यांचा मोलाचा सल्ला
3

मुलांना तंत्रज्ञानाचे ‘गुलाम’ बनू न देता, त्याचा ‘मालक’ बनायला शिकवा; शिक्षक अमोल हंकारे यांचा मोलाचा सल्ला

पुणे महापालिका वसाहतीत आग; तीन नगरसेवक वास्तव्यास असूनही दुरवस्था कायम
4

पुणे महापालिका वसाहतीत आग; तीन नगरसेवक वास्तव्यास असूनही दुरवस्था कायम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.