Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अन्नातील भेसळीवर थेट वार! तुकाराम मुंढेंच्या कडक शिस्तीला पुण्याच्या गणेश मंडळांची अनोखी साथ

Ganeshotsav 2026: विशेष म्हणजे बालकलाकारांकडून हा देखावा सादर केला जात आहे. अन्नातील भेसळ कशी ओळखावी, याच्या सोप्या पद्धतीही देखाव्यातून दाखविण्यात आल्या आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 19, 2026 | 07:58 PM
Pune Ganeshotsav 2026

Pune Ganeshotsav 2026

Follow Us
Follow Us:
  • गणेशोत्सवाच्या देखाव्यांत तुकाराम मुंढेंच्या कार्यशैलीचे प्रतिबिंब
  • नियमपालन आणि शिस्तीवर गणेश मंडळांकडून सामाजिक प्रबोधन
  • व्यंगचित्रातून करण्यात आले भेसळीवर भाष्य 
पुणे/Tukaram Mundhe: गणरायाच्या चरणी अर्पण होणाऱ्या नैवेद्यापासून ते सार्वजनिक जीवनातील शिस्तीपर्यंत… यंदाच्या गणेशोत्सवात पुण्यातील गणेश मंडळांनी सामाजिक प्रश्नांना देखाव्यांच्या माध्यमातून प्रभावीपणे वाचा फोडली आहे. अन्नातील भेसळीविरोधात सुरू असलेल्या कारवायांच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची कार्यशैलीही मंडळांच्या देखाव्यांचा विषय ठरली आहे. कुठे व्यंगचित्रातून भेसळीवर भाष्य करण्यात आले आहे, तर कुठे जिवंत देखाव्यातून शिस्त, नियमपालन आणि कर्तव्यनिष्ठेचा संदेश देण्यात आला आहे.

अन्नातील भेसळ रोखण्यासाठी राज्यभर सुरू असलेल्या धडक कारवायांमुळे तुकाराम मुंढे चर्चेत आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या हॉटेल्स, दुकाने आणि खाद्य आस्थापनांवर कारवाई करण्यासह नागरिकांनीही अन्नाची गुणवत्ता आणि भेसळ याबाबत जागरूक राहावे, असा संदेश देण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर पुण्यातील काही गणेश मंडळांनी मुंढे यांच्या कार्यशैलीचा संदर्भ घेत सामाजिक प्रबोधनाचे देखावे साकारले आहेत.

देखणे हे रूप दिसे! ‘श्रीमंतां’च्या दर्शनासाठी गर्दीचा महापूर; पुण्यनगरीत भविकांचा उत्साह

‘सुरक्षित अन्न आणि सुरक्षित नागरिक’

मॉडेल कॉलनीतील अजिंक्य महाराष्ट्र मित्रमंडळाने ‘सुरक्षित अन्न आणि सुरक्षित नागरिक’ हा विषय घेऊन जिवंत देखावा साकारला आहे. अन्नातील भेसळ रोखणे, नागरिकांना सुरक्षित अन्न मिळणे आणि नियमांची काटेकोर अंमलबजावणी यावर देखाव्यातून भाष्य करण्यात आले आहे. तुकाराम मुंढे यांच्या कार्यशैलीचा संदर्भ घेत शिस्त, जबाबदारी आणि प्रामाणिकपणाचा संदेश देण्यात आला आहे.

विशेष म्हणजे बालकलाकारांकडून हा देखावा सादर केला जात आहे. अन्नातील भेसळ कशी ओळखावी, याच्या सोप्या पद्धतीही देखाव्यातून दाखविण्यात आल्या आहेत. तसेच नागरिकांसाठी माहिती पुस्तिकेचे वाटप करण्यात येत आहे, अशी माहिती मंडळाचे संचालक उमेश शेवते यांनी दिली.

व्यंगचित्रांतून मुंढेंच्या कार्यशैलीला सलाम 
बुधवार पेठेतील वीर हनुमान मित्रमंडळाने तुकाराम मुंढे यांच्या कार्याचा संदर्भ घेत अन्नातील भेसळीविरोधात जनजागृती करणारा देखावा साकारला आहे. भ्रष्टाचारमुक्त आणि निःस्वार्थपणे काम करणाऱ्या अधिकाऱ्याच्या पाठीशी समाजाने उभे राहावे, हा संदेश या देखाव्यातून देण्यात आला आहे.

पौरणिक देखाव्यांपासून…! पुण्यात गणेशोत्सवाचा अनोखा उत्साह; संध्याकाळी पेठांमध्ये अलोट जनसागर

व्यंगचित्रे आणि स्केचच्या माध्यमातून ही संकल्पना मांडण्यात आली आहे. विशेष आकर्षण म्हणजे तुकाराम मुंढे हातात भिंग घेऊन गणरायाला अर्पण करण्यात येणाऱ्या मोदकाची तपासणी करताना दाखविण्यात आले आहेत. देवाला अर्पण केल्या जाणाऱ्या नैवेद्यातही भेसळ होऊ नये, याबाबत जनजागृती करण्याचा प्रयत्न असल्याचे मंडळाचे अध्यक्ष आनंद सागरे यांनी सांगितले. गणेशोत्सवाच्या निमित्ताने केवळ धार्मिक किंवा मनोरंजनात्मक देखाव्यांऐवजी सामाजिक प्रश्नांवर भाष्य करणारे विषय मंडळांकडून मांडले जात असल्याने यंदाच्या उत्सवातील प्रबोधनाची बाजूही ठळक झाली आहे.

Web Title: Pune ganesh mandals dekhava for tukaram munde fda actions social message ganeshotsav 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 19, 2026 | 07:58 PM

Topics:  

  • Ganeshotsav 2026
  • pune ganpati
  • Tukaram Mundhe

संबंधित बातम्या

Ganeshotsav 2026: अरे देवा! गणेशोत्सवातील DJ, लाऊडस्पीकर अन् ढोल-ताशांचा आवाज हायकोर्टात; नियमांच्या काटेकोर अंमलबजावणीची मागणी
1

Ganeshotsav 2026: अरे देवा! गणेशोत्सवातील DJ, लाऊडस्पीकर अन् ढोल-ताशांचा आवाज हायकोर्टात; नियमांच्या काटेकोर अंमलबजावणीची मागणी

डीएस ग्रुपच्या पल्स कँडीचा गणेश महोत्सवाचा उत्साह; ‘देश की पल्स से बना गणपती त्योहार’ मोहिमेला सुरुवात
2

डीएस ग्रुपच्या पल्स कँडीचा गणेश महोत्सवाचा उत्साह; ‘देश की पल्स से बना गणपती त्योहार’ मोहिमेला सुरुवात

देखणे हे रूप दिसे! ‘श्रीमंतां’च्या दर्शनासाठी गर्दीचा महापूर; पुण्यनगरीत भविकांचा उत्साह
3

देखणे हे रूप दिसे! ‘श्रीमंतां’च्या दर्शनासाठी गर्दीचा महापूर; पुण्यनगरीत भविकांचा उत्साह

Gauri Ganpati Visarjan: गौरी-गणपती विसर्जनाची परंपरा काय? जाणून घ्या घरगुती पूजेपासून विसर्जनापर्यंतची पद्धत
4

Gauri Ganpati Visarjan: गौरी-गणपती विसर्जनाची परंपरा काय? जाणून घ्या घरगुती पूजेपासून विसर्जनापर्यंतची पद्धत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.