कोणाच्या गळ्यात पडणार मंत्रीपदाची माळ? पुण्यातील 'या' आमदारांची नावे अधिक चर्चेत, उत्सुकता वाढली
पुणे: नुकतीच राज्यात विधानसभा निवडणूक झाली आहे. महायुतीचे सरकार लवकरच स्थापन होणार आहे. दरम्यान मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर पुणे जिल्ह्यात काेणाला कॅबिनेट मंत्री पद मिळणार ? काेणाला राज्यमंत्री पद मिळणार याची उत्सुकता वाढली आहे. चंद्रकांत पाटील , अजित पवार ,दिलीप वळसे पाटील यांना कॅबिनेट तर माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, दत्तात्रय भरणे, विजय शिवतारे यांना राज्यमंत्री पद मिळण्याची शक्यता आहे.
महायुतीने पुणे जिल्ह्यातील एकवीस पैकी अठरा जागा मिळविल्या आहे. यामध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काॅंग्रेसने आठ, भाजपने नऊ आणि शिंदेच्या शिवसेनेचे एक असे आमदार निवडुन आले आहेत. यामुळे पुणे जिल्ह्याला मंत्री मंडळात स्थान मिळेल यात शंका नाही. गेल्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकारमंत्री दिलीप वळसे – पाटील, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री म्हणून चंद्रकांत पाटील यांनी काम पाहीले हाेते. या तिघांना पुन्हा कॅबिनेट मंत्री पद दिले जाऊ शकते. त्यामुळे या तिघांची नावे पहील्या यादीत येतील यात शंका नाही.
हेही वाचा: Pune News: विजयानगर कॉलनीतील ‘ती’ जागा ट्रस्टकडे; महापािलकेची ‘ओपन’स्पेस’ परत मिळविण्यासाठी धावाधाव
पुणे जिल्ह्यात भाजपकडून चारवेळा निवडुन आलेल्या माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर या ज्येष्ठ सदस्यांना संधी दिली जाऊ शकते. तसेच ग्रामीण भागातील प्रतिनिधी म्हणून आमदार राहुल कुल यांच्या नावाचाही विचार केला जाऊ शकताे. त्यांना राज्यमंत्री पद मिळू शकते. तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काॅंग्रेसकडून विजयाची हॅटट्रिक करणारे दत्तात्रय भरणे यांना देखील राज्यमंत्री पद दिले जाऊ शकते. तर घवघवीत मतांनी दुसऱ्यांदा विजय मिळविणारे सुनील शेळके यांच्या नावाचाही विचार केला जाऊ शकताे. शिंदेच्या शिवसेनेकडून पुरंदरचे आमदार विजय शिवतारे यांच्या नावाचा राज्यमंत्री पदासाठी विचार केला जाऊ शकताे. २०१४ साली युतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर शिवतारे यांच्याकडे जलसंपदा विभगच्या राज्यमंत्री पदाची जबाबदारी हाेती. त्यामुळे त्यांचा अनुभव लक्षात घेऊन त्यांनाही मंत्री पद मिळण्याची अपेक्षा आहे.
* आमदार चंद्रकांत पाटील हे भाजपतील ज्येष्ठ नेते असल्याने त्यांना मंत्री मंडळातून डावलण्याची शक्यता तुर्तास दिसत नाही.
* पाटील यांच्या प्रमाणे भाजपकडून आणखी एक मंत्री पद पुण्यात देऊन आगामी महापािलका निवडणुकीच्या दृष्टीने विचार केला जाऊ शकताे.
* पुणे जिल्ह्यात शिंदे यांच्या शिवसेनेचा एकमेव आमदार असल्यामुळे शिवतारे यांच्या नावाचा िवचार पक्षवाढीच्या दृष्टीने केला जाऊ शकताे.
* शरद पवार यांच्या राजकारणावर नियंत्रण ठेवण्यासाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काॅंग्रेसकडून पुण्यात दाेन ते तीन मंत्री केले जातील.