
Vote Chori ची तक्रार अन् पुणे महानगरपालिका ॲक्शन मोडमध्ये; घेतला 'हा' महत्वाचा निर्णय
महापालिकेच्या मतदार याद्यांची फेरपडताळणी
व्होट चोरीच्या तक्रारींनंतर प्रशासनाचा निर्णय
विरोधक झाले आक्रमक
Vote Chori च्या मुद्द्यावरून राज ठाकरेंचा घणाघात
निवडणूक आयोगाच्या “बेकायदेशीर आणि सदोष” कार्यपद्धतींवर प्रकाश टाकण्यासाठी महाराष्ट्रातील विरोधी पक्षांनी आज म्हणजेच १ नोव्हेंबर २०२५ रोजी मुंबईत मोठ्या संयुक्त सत्य मार्चचे आवाहन केले आहे. यावेळी महाविकास आघाडीची एकजूट दिसून आली. विशेषतः मतदार यादीतून अंदाजे १ कोटी बनावट किंवा डुप्लिकेट नावे काढून टाकण्याची मागणी विरोधी पक्षांकडून करण्यात आली आहे. दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरेयांनी मतदार यादीतील घोळ यावरून जोरदार तोफ डागली आहे.
MNS MVA Satyacha Morcha: “मग तुम्हाला अडवले…”; Vote Chori च्या मुद्द्यावरून राज ठाकरेंचा घणाघात
मनसे अध्यक्ष राज ठाकरे ‘सत्य मार्च’ यांनी मोर्चाला संबोधन केले. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले, “आजचा मोर्चा हा राग दाखवण्याचा, ताकद दाखवण्याचा मोर्चा आहे. या विषयांमध्ये सर्वजण बोलले आहेत. खरेतर छोटे विषय आहेत. फार मोठा विषय नाही हा. यामध्ये दुबार मतदार आहेत. हे सर्वजण बोलत आहेत. इतकेच काय तर महायुतीचे नेते देखील म्हणत आहेत. मग तुम्हाला अडवले कोणी? निवडणूक घेण्याची घाई का करता? मतदार याद्या साफ केल्यानंतर निवडणुका घ्या.”