राज ठाकरेंची सरकारवर टीका (फोटो- यूट्यूब)
Maharashtra Politics: निवडणूक आयोगाच्या “बेकायदेशीर आणि सदोष” कार्यपद्धतींवर प्रकाश टाकण्यासाठी महाराष्ट्रातील विरोधी पक्षांनी आज म्हणजेच १ नोव्हेंबर २०२५ रोजी मुंबईत मोठ्या संयुक्त सत्य मार्चचे आवाहन केले आहे. यावेळी महाविकास आघाडीची एकजूट दिसून आली. विशेषतः मतदार यादीतून अंदाजे १ कोटी बनावट किंवा डुप्लिकेट नावे काढून टाकण्याची मागणी विरोधी पक्षांकडून करण्यात आली आहे. दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मतदार यादीतील घोळ यावरून जोरदार तोफ डागली आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे ‘सत्य मार्च’ यांनी मोर्चाला संबोधन केले. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले, “आजचा मोर्चा हा राग दाखवण्याचा, ताकद दाखवण्याचा मोर्चा आहे. या विषयांमध्ये सर्वजण बोलले आहेत. खरेतर छोटे विषय आहेत. फार मोठा विषय नाही हा. यामध्ये दुबार मतदार आहेत. हे सर्वजण बोलत आहेत. इतकेच काय तर महायुतीचे नेते देखील म्हणत आहेत. मग तुम्हाला अडवले कोणी? निवडणूक घेण्याची घाई का करता? मतदार याद्या साफ केल्यानंतर निवडणुका घ्या.”
ठाकरे गटाच्या नेत्याची खुली धमकी
मतदार यादीतील अनियमितता आणि मतचोरीच्या मुद्द्यावर विरोधी पक्ष आता पूर्णपणे आक्रमक झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार तसेच देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्रातील राज्य सरकार मतदान चोरी आणि मतदार यादीतील अनियमिततेमुळे सत्तेवर आले आहे, असा आरोप विरोधकांचा आहे. या मतचोरीविरोधात आज मुंबईत महाविकास आघाडी आणि मनसेने मोर्चा आयोजित केला आहे. या मोर्च्याला सुरूवातदेखील झाली आहे. एकीकडे हा मोर्चा सुरू असताना दुसरीकडे उद्धव ठाकरे गटाचा पदाधिकाऱ्याने थेट निवडणूक आयोगाला धमकी दिली आहे.

निवडणुकीदरम्यान बोगस मतदान किंवा मतपेटीत गैरप्रकार झाल्यास संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचे हातपाय तोडू, असे वादग्रस्त वक्तव्य शिवसेना (ठाकरे गट) उपनेते शरद कोळी यांनी केले आहे. “भाजप मतदार याद्यांतील घोळ करूनच सत्तेत येत आहे. निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या मागण्या तातडीने मान्य कराव्यात. जो बोगस मतदान करेल किंवा करवून घेईल, त्याच्यावर आम्ही कठोर कारवाई करू.” असा इशाराही शरद कोळी यांनी दिला आहे.