Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune News : पुणेकरांची परदेशवारी सुसाट; मागील पाच वर्षांत पासपोर्ट अर्ज दुप्पट

Pune Passport News : गेल्या पाच वर्षांत शिक्षण, नोकरी आणि पर्यटनासाठी परदेशात जाणाऱ्यांमध्ये पुणेकरांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पासपोर्टसाठी येणाऱ्या अर्जांचा आकडा जवळपास दुप्पट झाला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: May 13, 2026 | 02:18 PM
Pune Passport Applications Double in 5 Years

Pune Passport Applications Double in 5 Years

Follow Us
Follow Us:
  • पुणेकरांची परदेशवारी सुसाट
  • मागील पाच वर्षांत पासपोर्ट अर्ज दुप्पट
  • तत्काळ सेवेला वाढती पसंती
किरण ढोणे: शिक्षण, नोकरी आणि पर्यटनासाठी परदेशात जाणाऱ्या पुणेकरांच्या संख्येत गेल्या पाच वर्षांत लक्षणीय वाढ झाली असून, पासपोर्टसाठी येणाऱ्या अर्जांचा आकडा जवळपास दुप्पट झाला आहे. या वाढत्या मागणीबरोबरच कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) साहाय्याने बनावट कागदपत्रे सादर करण्याच्या प्रकारांतही वाढ झाल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. अशा प्रकरणांमध्ये संबंधितांवर थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती विभागीय पासपोर्ट अधिकारी डॉ. विनोद गायकवाड यांनी दिली.

Water Shortage in Pune: पुणे जिल्ह्याच्या पाणी टंचाईवर प्रशासनाचा ‘मास्टर प्लॅन’; ३५ कोटी ७४ लाखांचा आराखड्याला मंजूरी

डिजिटल प्रक्रियेमुळे सेवा जलद झाली असली, तरी एआयच्या मदतीने खोटी कागदपत्रे तयार करून सादर करण्याचे आव्हानही वाढले आहे. काही अर्जदार खरी माहिती लपवून खोटी कागदपत्रे देत असल्याचे निदर्शनास आले असून, अशा प्रकरणांवर आता कठोर कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

तत्काळ सेवेला वाढती पसंती

पासपोर्टच्या तत्काळ सेवेलाही पुणेकरांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. २०२१ मध्ये केवळ ७,२१३ नागरिकांनी तत्काळ कोट्यातून अर्ज केले होते. मात्र २०२५ मध्ये ही संख्या तब्बल ८५,८९७ वर पोहोचली. अवघ्या पाच वर्षांत तत्काळ पासपोर्ट घेणाऱ्यांची संख्या दहापटीहून अधिक वाढल्याचे दिसून येते.

२०२१ ते २०२५ या कालावधीत पासपोर्ट कार्यालयाकडे एकूण २० लाख ४२ हजार १८२ अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी १९ लाख ५९ हजार ६४४ नागरिकांना पासपोर्ट वितरित करण्यात आले असून, वितरणाचे प्रमाण ९६ टक्क्यांवर पोहोचले आहे.
पासपोर्ट अर्जांमध्ये सातत्याने होत असलेली वाढ पुणेकरांचा परदेशातील शिक्षण, रोजगार आणि पर्यटनाकडे वाढता कल अधोरेखित करत आहे.

पुण्याचे प्रादेशिक पासपोर्ट अधिकारी डॉ. विनोद गायकवाड यांनी सांगितले की, “पासपोर्ट कार्यालयाचे कामकाज पूर्णपणे डिजिटल झाले असून, अपॉइंटमेंटपासून पासपोर्ट मिळेपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन आणि अधिक वेगवान झाली आहे. अर्जदारांनी शासनाने निर्धारित केलेली कागदपत्रे पूर्ण करून अर्ज केल्यास प्रक्रिया सुलभ होते. आमचा उद्देश ३० दिवसांत पासपोर्ट वितरित करण्याचा आहे. मात्र, कागदपत्रांतील त्रुटी आणि पोलिस पडताळणीतील विलंबामुळे काही अर्जांना उशीर होतो.”

मागील पाच वर्षांतील पासपोर्ट अर्ज व वितरण

वर्ष अर्ज वितरित पासपोर्ट
२०२१ २,३९,९८६ २,३२,७६७
२०२२ ३,६४,०९५   ३,४७,१३७
२०२३ ४,७४,४१३ ४,७१,४५४
२०२४ ४,५५,१६० ४,३५,३२०
२०२५ ५,०८,५२८ ४,७२,९६६

Pune Water Supply: शहरी विकास निधीतून पुण्याला 1,290 कोटींची मंजुरी

Web Title: Pune passport applications double in 5 years overseas education jobs fuel surge

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 13, 2026 | 02:18 PM

Topics:  

  • Marathi News
  • passport news
  • pune news

संबंधित बातम्या

LPG Cylinder Rules : 16 ऑगस्टनंतर ‘या’ ग्राहकांना मिळणार नाही LPG सिलिंडर? कनेक्शन चालू ठेवण्यासाठी त्वरित करा ‘हे’ काम
1

LPG Cylinder Rules : 16 ऑगस्टनंतर ‘या’ ग्राहकांना मिळणार नाही LPG सिलिंडर? कनेक्शन चालू ठेवण्यासाठी त्वरित करा ‘हे’ काम

Share Market Weekly Outlook : शेअर बाजारात तेजी की मंदी? 17 ते 21 ऑगस्टमध्ये ठेवा बारीक लक्ष; ‘हे’ ट्रिगर्स ठरवणार मार्केटची दिशा
2

Share Market Weekly Outlook : शेअर बाजारात तेजी की मंदी? 17 ते 21 ऑगस्टमध्ये ठेवा बारीक लक्ष; ‘हे’ ट्रिगर्स ठरवणार मार्केटची दिशा

Vaping Ban Demand : लहान मुलं नशेच्या विळख्यात? चॉकलेट-फळांच्या फ्लेवरमध्ये निकोटीन प्रॉडक्ट्स; कठोर कायद्याची मागणी
3

Vaping Ban Demand : लहान मुलं नशेच्या विळख्यात? चॉकलेट-फळांच्या फ्लेवरमध्ये निकोटीन प्रॉडक्ट्स; कठोर कायद्याची मागणी

Designer Rakhi Business Idea : डिझायनर राख्यांना मोठी मागणी! फक्त ‘इतक्या’ रुपयांच्या गुंतवणूकीत सुरु करा व्यवसाय
4

Designer Rakhi Business Idea : डिझायनर राख्यांना मोठी मागणी! फक्त ‘इतक्या’ रुपयांच्या गुंतवणूकीत सुरु करा व्यवसाय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.