पुणे: केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियान २०२४ अंतर्गत जाहीर करण्यात आलेल्या स्वच्छ शहरांच्या यादीत पुणे शहराने देशात आठवा क्रमांक पटकावला आहे. गेल्या काही वर्षांतील कामगिरीच्या तुलनेत यंदा पुण्याने चांगली भरारी घेत स्वच्छतेच्या लढतीत आपली ठोस उपस्थिती नोंदवली आहे.
दहा लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांच्या श्रेणीत हे मूल्यांकन करण्यात आले होते. मध्य प्रदेशातील इंदूर शहराने सलग आठव्यांदा देशात पहिल्या क्रमांकावर आपले वर्चस्व राखले आहे. इंदूरला ‘सेव्हन स्टार’ रेटिंग देण्यात आले असून, गुजरातमधील सुरत दुसऱ्या, तर नवी मुंबईने तिसऱ्या स्थानावर समाधान मानले आहे.
पुण्याची सातत्यपूर्ण वाटचाल
पुणे महानगरपालिकेच्या स्वच्छतेविषयक प्रयत्नांना यंदा चांगले यश लाभले आहे. मागील काही वर्षांत पुण्याला पहिल्या दहामध्ये स्थान मिळवण्यात अडथळे येत होते. मात्र २०१९ साली ३७व्या स्थानावर असलेले पुणे, २०२० मध्ये १५व्या क्रमांकावर, २०२१ मध्ये पाचव्या, २०२२ व २०२३ मध्ये नवव्या स्थानावर होते. यंदा २०२४ मध्ये ८व्या स्थानावर पोहोचत शहराने सकारात्मक घोडदौड केली आहे.
स्वच्छ सर्वेक्षण २०२४ : देशातील आघाडीची शहरे
१. इंदूर (मध्य प्रदेश) – सलग आठव्यांदा पहिला क्रमांक
२. सुरत (गुजरात) – दुसरे स्थान
३. नवी मुंबई (महाराष्ट्र) – तिसरे स्थान
८. पुणे (महाराष्ट्र) – आठवे स्थान
स्वच्छतेच्या दिशेने भक्कम पावले
२०१६ साली केवळ ७३ शहरांमध्ये राबवले गेलेले हे अभियान आता ४५०० शहरांपर्यंत पोहोचले आहे. ४५ दिवस चाललेल्या मूल्यांकनात ३,००० हून अधिक प्रशिक्षित कर्मचाऱ्यांनी देशभरातील हजारो वॉर्डांना भेट दिली. ११ लाखांहून अधिक घरांचे प्रत्यक्ष निरीक्षण करण्यात आले आणि त्यानुसार शहरांची स्वच्छतेच्या आधारे रँकिंग निश्चित करण्यात आली.
गेल्यावर्षी महापालिकेने काय केले ?
– १७ ठिकाणी इ वेस्ट कलेक्शन सेंटर उभारले
– दंडात्मक कारवाई वाढविली
– दाराेदारी जाऊन कचरा गाेळा
– ९८ टक्के कचऱ्याचे वर्गीकरण
– तीन पाळ्यात स्वच्छतेचे काम
– जनजागृती, महास्वच्छता अभियान अादी उपक्रमांचे अायाेजन
‘‘पुणे मनपा स्वच्छ सर्वेक्षण मध्ये आठव्या स्थानावर आले आहे. मागच्या वेळी आपण नवव्या स्थानावर आलो होतो. यंदा एक स्टेप आपण वरती आलो आहे. परंतु आपण पहिल्या तीन मध्ये येवू शकतो. यासाठी आपण प्रयत्न केले पाहीजेत. आपल्या कडे पात्रता आहे व यंत्रणा ही आहे. यांच्यावर आपण अजून मेहनत घेणे आवश्यक आहे.’’
– पृथ्वीराज बी. पी. (अतिरिक्त आयुक्त)
‘‘ यावर्षात बायाेमानिंगचे काम पुर्ण करण्याचे नियाेजन अाहे. तसेच रात्रपाळीत स्वच्छतेचे काम सुरु केले अाहे. विविध प्रक्रीया प्रकल्प सुरु करीत अाहाेत, तसेच प्ांधरा क्षेत्रीय कार्यालयातंर्गत स्वच्छता स्पर्धा अायाेजित केली जाणार अाहे. अशा विविध उपाययाेजनांमुळे अापण पुढील वर्षी स्वच्छ सर्वेक्षणात देशात पहील्या तीन शहरात राहू असा विश्वास वाटताे.’’
– संदीप कदम (उपायुक्त, घन कचरा विभाग )