Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 25 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मानहानीच्या प्रकरणात राहुल गांधी पुणे न्यायालयात गैरहजर, सावरकरांच्या वकिलांनी केली कारवाईची मागणी

संसदेच्या हिवाळी अधिवेशनामुळे काँग्रेस खासदार राहुल गांधी हिंदुत्व विचारवंत वीर सावरकरांच्या कुटुंबीयांनी केलेल्या मानहानीच्या तक्रारीप्रकरणी सोमवारी पुणे न्यायालयात हजर झाले नसल्याने कारवाईची मागणी

  • By दिपाली नाफडे
Updated On: Dec 03, 2024 | 12:38 AM
राहुल गांधीवर वीर सावरकर प्रकरणात कारवाईची मागणी

राहुल गांधीवर वीर सावरकर प्रकरणात कारवाईची मागणी

Follow Us
Follow Us:

पुणे: वीर सारवकर यांच्याशी संबंधित वक्तव्याबाबत पुणे न्यायालयात प्रलंबित असलेल्या खटल्याच्या सुनावणीसाठी काँग्रेस नेते राहुल गांधी हजर राहिले नाहीत. गांधींचे वकील मिलिंद पवार म्हणाले की, संसदेच्या हिवाळी अधिवेशनामुळे काँग्रेस खासदार राहुल गांधी हे हिंदुत्ववादी विचारवंत वीर सावरकर यांच्या कुटुंबीयांनी केलेल्या मानहानीच्या तक्रारीप्रकरणी सोमवारी पुण्यातील न्यायालयात हजर झाले नाहीत.

राहुल गांधी यांचे वकील मिलिंद पवार यांनी संसदेचे सत्र सुरू असल्यामुळे त्यांच्या अशिलाला न्यायालयात हजर राहण्यापासून सूट देण्याची मागणी केली आहे. पवार म्हणाले की, लोकसभेतील विरोधी पक्षनेते 10 जानेवारीला न्यायालयात हजर होतील. त्यामुळे आता या संदर्भात न्यायाची वाट पाहण्यासाठी जानेवारी महिन्याची वाट पाहावी लागणार आहे (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम) 

काय आहे प्रकरण

वीर सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी पुणे न्यायालयात तक्रार दाखल केली होती की, राहुल गांधी यांनी मार्च 2023 मध्ये लंडनमधील भाषणात सांगितले होते की, सावरकरांनी एका पुस्तकात लिहिले होते की, त्यांना आणि त्यांच्या पाच-सहा मित्रांनी एकदा एका मुस्लिम माणसाला मारहाण केली होती आणि यानंतर सावरकर अत्यंत आनंदी होते. 

याचिकेनुसार वीर सावरकरांनी असे कुठेही लिहिलेले नाही. त्यावेळी न्यायालयाने पोलिसांना या आरोपांची चौकशी करून अहवाल सादर करण्यास सांगितले होते. चौकशीअंती विश्रामबाग पोलिसांनी तक्रारीत प्रथमदर्शनी सत्य असल्याचे सांगितले. सह दिवाणी न्यायाधीश आणि न्यायदंडाधिकारी (प्रथम वर्ग) अमोल शिंदे यांच्या खासदार-आमदार न्यायालयाने 18 नोव्हेंबर रोजी आदेश देताना राहुल गांधी यांना 2 डिसेंबर रोजी न्यायालयात हजर राहण्यास सांगितले होते.

Maharashtra New CM: महायुतीत आता नवे संकट? मुख्यमंत्री तर ठरला BJP चा, पण गृहमंत्रालयावर अडलं घोडं

राहुल गांधीविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी करण्याची मागणी 

तक्रारदार सात्यकी सावरकर यांचे प्रतिनिधित्व करणारे वकील संग्राम कोल्हटकर यांनी राहुल गांधी यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी करण्याची विनंती केली आहे, कारण ते तीन वेळा न्यायालयात हजर राहिलेले नाहीत.

कोल्हटकर यांनी असा युक्तिवाद केला की राहुल गांधी हे समन्स प्राप्त करूनही हजर झाले नाहीत. याशिवाय भारतीय दंड संहितेच्या कलम 174 नुसार कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. 10 जानेवारी रोजी न्यायालयात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात येईल, असे कोल्हटकर यांनी नंतर पत्रकारांना सांगितले.

सावरकरांवर करण्यात आलेली टिप्पणी थांबवावी

सात्यकी सावरकर यांचे वकील कोल्हटकर यांनी 26 नोव्हेंबर रोजी राहुल गांधींनी दिलेल्या भाषणाशी संबंधित काही वृत्त क्लिपिंग्जही न्यायालयात सादर केल्या. गांधींना सावरकरांविरुद्ध कोणतीही टिप्पणी करण्यापासून रोखण्याची विनंती त्यांनी न्यायालयाला केली, ज्यावर न्यायमूर्ती शिंदे यांनी वकील पवार यांना त्यांच्या अशिलाला अशी टिप्पणी करू नये याची मौखिक ताकीद दिली आहे. 

दरम्यान न्यायालयाने 23 ऑक्टोबर रोजी गांधींना प्रत्यक्ष हजर राहण्यास सांगितले होते. या प्रकरणाची पुढील सुनावणी 10 जानेवारीला होणार असून त्यादरम्यान राहुल हजर राहण्याची शक्यता आहे.

Maharashtra Politics : विधीमंडळ पक्षनेता निवडीसाठी भाजपकडून निरीक्षकांची नियुक्ती; केंद्रातील बड्या नेत्यांचा समावेश

Web Title: Rahul gandhi did not appear in pune court in veer savarkar defamation case lawyer demands action

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 03, 2024 | 12:38 AM

Topics:  

  • Indian Political News
  • Rahul Gandhi

संबंधित बातम्या

Congress Politics : विरोधी पक्षनेते राहुल गांधी 1 नोव्हेंबरला काढणार रॅली; भाजपला आता टेन्शन
1

Congress Politics : विरोधी पक्षनेते राहुल गांधी 1 नोव्हेंबरला काढणार रॅली; भाजपला आता टेन्शन

‘दिवाळीत धंदा बुडवू नका!’ Rahul Gandhi यांच्या रॅलीवरून दिल्लीतील व्यापारी आक्रमक; 10000 कोटींच्या व्यापारावर परिणामाची भीती
2

‘दिवाळीत धंदा बुडवू नका!’ Rahul Gandhi यांच्या रॅलीवरून दिल्लीतील व्यापारी आक्रमक; 10000 कोटींच्या व्यापारावर परिणामाची भीती

Five Former CMs Rejoin Congress:पाच माजी मुख्यमंत्री पुन्हा काँग्रेसच्या वाटेवर; SIR विरोधातील लढा अधिक आक्रमक होणार
3

Five Former CMs Rejoin Congress:पाच माजी मुख्यमंत्री पुन्हा काँग्रेसच्या वाटेवर; SIR विरोधातील लढा अधिक आक्रमक होणार

Sonia Gandhi चं इंस्टाग्रामवर पदार्पण; फॉलोइंग लिस्टमध्ये केवळ हे 3 अकाउंट्स, नावं वाचून व्हाल थक्क!
4

Sonia Gandhi चं इंस्टाग्रामवर पदार्पण; फॉलोइंग लिस्टमध्ये केवळ हे 3 अकाउंट्स, नावं वाचून व्हाल थक्क!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.