Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

राज्यात पावसाचा मुक्काम आणखी वाढणार; पुढील काही दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

नैऋत्य मोसमी पावसाने परतीचा प्रवास सुरू केला आहे. उत्तर-पश्चिम भारतातील काही भागांत सप्टेंबरअखेरपासून हवामान कोरडे होण्याची शक्यता आहे. मात्र, सक्रिय हवामान प्रणालींमुळे देशाच्या विविध भागांत पावसाचा जोर अधूनमधून कायम राहणार आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 30, 2026 | 08:17 AM
राज्यात पावसाचा मुक्काम वाढणार; पुढील काही दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

राज्यात पावसाचा मुक्काम वाढणार; पुढील काही दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

Follow Us
Follow Us:

पुणे : सध्या वातावरणात बदल होताना दिसत आहे. नैऋत्य मोसमी पावसाचा परतीचा प्रवास सुरू झाला असला तरी देशातील पावसाचा जोर अद्याप ओसरलेला नाही. देशभरात सध्या पाच चक्रीवादळीय परिसंचरण प्रणाली सक्रिय असून, त्यांच्या प्रभावामुळे अनेक राज्यांमध्ये पुढील काही दिवस पाऊस आणि वादळी वाऱ्यांची शक्यता आहे. काही भागांत ताशी ५० ते ६० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

केरळ, तमिळनाडू, रायलसीमा, किनारी आंध्र प्रदेश आणि कर्नाटकात पुढील काही दिवस पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी जोरदार पावसासह मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही भागांत ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात. तसेच कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि गुजरातमध्ये २९ सप्टेंबर ते १ ऑक्टोबरदरम्यान काही ठिकाणी हलका ते तुरळक पाऊस होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे राज्यातील काही भागांत पावसाची हजेरी कायम राहण्याची शक्यता आहे.

दरम्यान, नैऋत्य मोसमी पावसाने परतीचा प्रवास सुरू केला आहे. उत्तर-पश्चिम भारतातील काही भागांत सप्टेंबरअखेरपासून हवामान कोरडे होण्याची शक्यता आहे. मात्र, सक्रिय हवामान प्रणालींमुळे देशाच्या विविध भागांत पावसाचा जोर अधूनमधून कायम राहणार आहे.

उत्तर भारतात पश्चिमी वाऱ्यांचा प्रभाव

उत्तर भारतात पश्चिमी वाऱ्यांचा प्रभाव असून, त्यामुळे जम्मू आणि काश्मीरपासून उत्तराखंडपर्यंतच्या पर्वतीय प्रदेशात हिमवृष्टी आणि मैदानी प्रदेशात मुसळधार पाऊस पडत आहे. तापमानात 10 अंशांची घट झाली आहे. भूस्खलनामुळे केदारनाथ यात्रा सलग दुसऱ्या दिवशी स्थगित करण्यात आली आहे. सध्या देशातील 9 राज्यांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

नऊ राज्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता

वायव्य भागासह पूर्व भारतातील नऊपेक्षा जास्त राज्यांमध्ये मंगळवारी मेघगर्जनेसह पाऊस आणि वादळी पावसाची शक्यता आहे. बुधवारपासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे, परंतु आर्द्रता वाढू शकते. जम्मू आणि काश्मीर, लडाख, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, दिल्ली आणि राजस्थान या भागांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

Weather Update : देशातील 9 राज्यांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा अंदाज; तापमानातही झाली घट

Web Title: Rain accompanied by gusty winds is likely in maharashtra over the next few days

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 30, 2026 | 08:16 AM

Topics:  

  • Maharashtra Rain
  • Rain News
  • Weather Update

संबंधित बातम्या

अकोल्यात सप्टेंबरमध्येच ‘ऑक्टोबर हीट’ची झळ; तापमान 33 अंशांच्या आसपास, पातूरमध्ये तर…
1

अकोल्यात सप्टेंबरमध्येच ‘ऑक्टोबर हीट’ची झळ; तापमान 33 अंशांच्या आसपास, पातूरमध्ये तर…

Weather Update : देशातील 9 राज्यांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा अंदाज; तापमानातही झाली घट
2

Weather Update : देशातील 9 राज्यांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा अंदाज; तापमानातही झाली घट

Pune Rain Alert: काळ्या ढगांची दाटी अन् पुण्यात अक्षरश: ‘कोसळ’धार; उद्याचा अलर्ट काय?
3

Pune Rain Alert: काळ्या ढगांची दाटी अन् पुण्यात अक्षरश: ‘कोसळ’धार; उद्याचा अलर्ट काय?

पश्चिमेला पाऊस, पूर्वेला दुष्काळ; जुन्नरच्या पूर्व भागाला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी
4

पश्चिमेला पाऊस, पूर्वेला दुष्काळ; जुन्नरच्या पूर्व भागाला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.