Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Rain: पुण्यात पावसाचा ‘रुद्रावतार’; एप्रिल महिन्यात पावसाने मोडला 130 वर्षांचा ‘हा’ विक्रम

पावसाळी सुरुवातीनंतर एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापासून तापमानात वाढ होत गेली. १२ एप्रिलपर्यंत कमाल तापमान ३७ अंश सेल्सियस होते, त्यानंतर ते ३९ ते ४० अंशांदरम्यान स्थिरावले.

  • By तेजस भागवत
Updated On: May 07, 2026 | 02:35 AM
Pune Rain: पुण्यात पावसाचा ‘रुद्रावतार’; एप्रिल महिन्यात पावसाने मोडला 130 वर्षांचा ‘हा’ विक्रम
Follow Us
Follow Us:

एप्रिल महिन्याची सुरुवातच अवकाळी पावसाने
पुणे शहराच्या हवामानाचा पॅटर्न बदलल्याचे चित्र
पावसाने मोडीत काढला १३० वर्षांचा विक्रम

सुनयना सोनवणे/पुणे: यंदाच्या एप्रिल महिन्याची सुरुवातच अवकाळी, वादळी पावसाने झाल्याने पुणे शहरातील हवामानाचा पॅटर्नच बदलल्याचे चित्र दिसून आले. दोन एप्रिल रोजी शहर व परिसरात झालेल्या मुसळधार पावसात शिवाजीनगर येथे एका दिवसात तब्बल ६५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. या पावसाने एप्रिल महिन्यातील एका दिवसातील पावसाचा तब्बल १३० वर्षे जुना विक्रम मोडीत काढला. यापूर्वी ४ एप्रिल १८९६ रोजी ५१.१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती.

एकूणच, यंदाचा एप्रिल महिना हवामानाच्या दृष्टीने वैशिष्ट्यपूर्ण ठरला. शिवाजीनगर येथे एप्रिल महिन्यात एकूण सुमारे ६५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, गेल्या दहा वर्षांतील हा उच्चांक ठरला आहे. २०२३ मध्ये ३७ मिलिमीटर पाऊस झाला होता, तर काही वर्षांत तर पावसाची नोंदही नव्हती. त्यामुळे यंदाचा पाऊस हा अपवादात्मक ठरल्याचे स्पष्ट होते.

दरम्यान, पावसाळी सुरुवातीनंतर एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापासून तापमानात वाढ होत गेली. १२ एप्रिलपर्यंत कमाल तापमान ३७ अंश सेल्सियस होते, त्यानंतर ते ३९ ते ४० अंशांदरम्यान स्थिरावले. २७ एप्रिल रोजी यंदाच्या महिन्यातील उच्चांकी ४१.८ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. मात्र, २०१९ मध्ये ४३ अंश सेल्सियसपर्यंत तापमान गेले होते, त्यामुळे तुलनेने यंदा तीव्र उष्णतेचा प्रभाव काहीसा कमी राहिला.

गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत यंदाच्या एप्रिलमध्ये सरासरी कमाल तापमानातही घट झाली. सध्या तापमानात काही प्रमाणात घट होत असून, पुढील काही दिवसांत कमाल तापमान ३७ ते ३९ अंश सेल्सियसदरम्यान राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे पुणेकरांना उकाड्यातून काहीसा दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत.

पुणेकर सावधान! यंदा मान्सूनमध्येही घाम फुटणार? Weather Department ने दिला ‘हा’ इशारा

गेल्या दहा वर्षांतील एप्रिलमधील पाऊस (मिलिमीटरमध्ये)
२०२६ – ६६.२
२०२५ – ७.५
२०२४ – ११.४
२०२३ – ३७
२०२२ – ००
२०२१ – २८.३
२०२० – ०.३
२०१९ – १.७
२०१८ – ००
२०१७ – ००
२०१६ – २.४
२०१५ – ००

उकाड्यापासून आता दिलासा मिळणार; राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

गेल्या दहा वर्षांतील कमाल तापमान (अंश सेल्सियसमध्ये)
२०२६ – ३७.९
२०२५ – ३९.३
२०२४ – ३९.६
२०२३ – ३७.७
२०२२ – ३९.२
२०२१ – ३७.६
२०२० – ३८.६
२०१९ – ३९.५
२०१८ – ३८.४
२०१७ – ३८.३
२०१६ – ३९.२
२०१५ – ३६.९

Web Title: Rain break 130 years old record in april 2026 at pune city latest weather marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 07, 2026 | 02:35 AM

Topics:  

  • Pune Rain News
  • Pune Weather
  • Unseasonal Rain

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.