Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Weather Update : महाराष्ट्रातून पावसाची अखेर एक्झिट; पुढील तीन ते चार दिवसांत देशाच्या आणखी…

मान्सूनच्या माघारीनंतर राज्यातील बहुतांश भागांत हवामान कोरडे झाले आहे. काही ठिकाणी कमाल तापमानात तीन ते चार अंशांनी वाढ झाली असून, ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागत आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 09, 2026 | 08:02 AM
महाराष्ट्रातून पावसाची अखेर एक्झिट; पुढील तीन ते चार दिवसांत देशाच्या आणखी....

महाराष्ट्रातून पावसाची अखेर एक्झिट; पुढील तीन ते चार दिवसांत देशाच्या आणखी....

Follow Us
Follow Us:
  • वातावरणात जाणवतोय कमालीचा बदल
  • देशाच्या आणखी काही भागांतून मान्सून माघारी जाण्याची शक्यता
  • राज्यात तापमान वाढले
पुणे : गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. त्यात नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी गुरुवारी (दि.8) महाराष्ट्राच्या उर्वरित भागातूनही माघार घेतली. त्यामुळे संपूर्ण राज्यातून मान्सूनची एक्झिट झाली आहे. गोवा, कर्नाटक, तेलंगणा, ओडिशा, झारखंड आणि छत्तीसगडच्या काही भागांतूनही मान्सून परतला आहे. पुढील तीन ते चार दिवसांत देशाच्या आणखी काही भागांतून मान्सून माघारी जाण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

राज्यात शनिवारी मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली होती. ब्रह्मपुरी, परभणी, बारामती आणि हर्णेपर्यंत पोहोचलेली परतीची रेषा बुधवारी स्थिर होती. त्यामुळे मान्सूनची माघार काहीशी रेंगाळली. मात्र, गुरुवारी उर्वरित महाराष्ट्रातूनही मोसमी वारे परतले. यंदाच्या पावसाळ्यात राज्यात पावसाची मोठी तूट नोंदली गेली आहे. सप्टेंबरमध्ये समाधानकारक पाऊस न झाल्याने या महिन्यात तब्बल ५२ टक्के तूट राहिली. संपूर्ण मोसमी हंगामात राज्यात १९ टक्के पावसाची तूट नोंदली गेली आहे.

राज्यात तापमान वाढले

राज्यात 19 टक्के पावसाची तूट नोंदली गेली आहे. विदर्भ आणि मराठवाड्‌यातील बहुतांश जिल्ह्यांना याचा मोठा फटका बसला असून, अनेक भागांत दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. एल निनोचा प्रभाव, पावसाचा अभाव आणि ऑगस्टपासून पावसाने दिलेली ओढ यामुळे यंदाच्या हंगामात राज्याला दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत आहेत.

राज्यातील बहुतांश भागांत हवामान कोरडे

मान्सूनच्या माघारीनंतर राज्यातील बहुतांश भागांत हवामान कोरडे झाले आहे. काही ठिकाणी कमाल तापमानात तीन ते चार अंशांनी वाढ झाली असून, ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागत आहे. कोकणातही तापमान वाढले आहे. पुढील काही दिवसांत कमाल तापमानात आणखी वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

हवामान पुन्हा बदलणार

देशातून नैऋत्य मोसमी पाऊस माघारी फिरत असतानाच हवामानात पुन्हा मोठे बदल होण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाच्या (IMD) ताज्या अंदाजानुसार उत्तर-पश्चिम भारतावर नव्या पश्चिमी विक्षोभाचा (Western Disturbance) प्रभाव पडणार आहे. त्यामुळे ६ ते १० ऑक्टोबरदरम्यान पश्चिम हिमालयीन भागात पाऊस आणि हिमवृष्टी होण्याची शक्यता आहे. असे जरी असले तरी या भागांत तापमान वाढताना दिसत आहे.

अबब ! पारा तापला की राव ! Pune शहराला ऑक्टोबर हिटचा तडाखा; तापमान थेट…

Web Title: Rains finally exit from maharashtra nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 09, 2026 | 08:02 AM

Topics:  

  • Maharashtra Weather
  • Rain Alert

संबंधित बातम्या

कोकणसह राज्यातील काही भागांत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता; हवामान विभागाकडून अलर्ट जारी
1

कोकणसह राज्यातील काही भागांत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता; हवामान विभागाकडून अलर्ट जारी

Weather Update : राज्यात ‘ऑक्टोबर हीट’चा तडाखा; मुंबई, पुण्याचे तापमान 36 अंशांपर्यंत जाण्याची शक्यता
2

Weather Update : राज्यात ‘ऑक्टोबर हीट’चा तडाखा; मुंबई, पुण्याचे तापमान 36 अंशांपर्यंत जाण्याची शक्यता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.