Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Rain Alert: ओढ ही पावसाची! महाराष्ट्रात पावसासाठी पोषक वातावरण; पुण्यात काही दिवस…

गेल्या चोवीस तासांत कोकण-गोव्यात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी, तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली. पुणे जिल्ह्यातील घाट भागात पावसाचा जोर अधिक राहिला.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 20, 2026 | 08:06 PM
Pune Rain Alert: ओढ ही पावसाची! महाराष्ट्रात पावसासाठी पोषक वातावरण; पुण्यात काही दिवस…
Follow Us
Follow Us:

पुणे शहरात पावसाची जोरदार हजेरी
पुढील काही दिवस हलक्या पावसाची शक्यता
राज्यात पावसासाठी पोषक वातावरण निर्माण

पुणे: पुणे शहरात सोमवारी (ता. २०) दिवसभर ढगाळ वातावरण राहिले. दुपारी बाराच्या सुमारास शहरात पावसाने हजेरी लावली. त्यानंतर अधूनमधून हलक्या सरी कोसळल्या. ढगाळ वातावरणामुळे उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला असून, पुढील दोन दिवस शहर आणि परिसरात हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार, पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरावरील आणि लगतच्या उत्तर किनारी आंध्र प्रदेशावरील चक्रीय स्थितीपासून ईशान्य अरबी समुद्रापर्यंत सरासरी समुद्रसपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीवर द्रोणी (ट्रफ) विस्तारलेली आहे. ही द्रोणी महाराष्ट्र, मराठवाडा आणि दक्षिण गुजरात मार्गे जात असल्याने राज्यात पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे.

गेल्या चोवीस तासांत कोकण-गोव्यात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी, तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली. पुणे जिल्ह्यातील घाट भागात पावसाचा जोर अधिक राहिला. घाट विभागात मंगळवार आणि बुधवार या दोन दिवसांसाठी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज असून, हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

Weather Update : मान्सूनचा रौद्रावतार कायम; 20 ते 26 जुलैदरम्यान अनेक राज्यांमध्ये अतिवृष्टीची शक्यता

पुणे शहरात सोमवारी कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २२.६ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. मंगळवारी (ता.२१) किमान तापमानात किंचित वाढ होण्याची शक्यता असून, कमाल तापमान स्थिर राहण्याचा अंदाज आहे. शहराचे कमाल तापमान ३० अंश आणि कोमल २३ अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. आकाश अंशतः ढगाळ राहून दुपारनंतर किंवा संध्याकाळी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यताही हवामान विभागाने वर्तवली आहे.

पुणे जिल्ह्यातील पावसाची नोंद
(२० जुलै २०२६ – सकाळी ८.३० ते सायंकाळी ५.३०)

ठिकाण – पाऊस (मिमी)
कुरवंडे – ४३.५
भोर – २०.५
गिरिवन – १२.५
माळीण – ४.०
एनडीए – ४.०
निमगिरी – ३.०
चिंचवड – २.५
राजगुरुनगर – १.५
हवेली – १.५
शिरूर – १.०
बारामती – १.०
दुधुळगाव – ०.५
पाषाण – ०.४
शिवाजीनगर – ०.४

Monsoon Update : मान्सूनचा जोर वाढणार? ISRO ‘त्या’ फोटोमुळे वाढली चिंता

अनेक राज्यांमध्ये अतिवृष्टीची शक्यता

देशातील अनेक राज्यांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे तापमान लक्षणीयरीत्या खाली आले आहे. परिणामी, लोकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. आता हवामान विभागाने पुढील ६-७ दिवस देशाच्या अनेक भागांमध्ये मान्सून सक्रिय राहील, असा अंदाज वर्तवला आहे. अशा परिस्थितीत, भारतीय हवामान विभागाने (IMD) आज, २० जुलै रोजी देशातील १७ राज्यांमध्ये हलक्या ते मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. या काळात ताशी ६० किलोमीटर वेगाने सोसाट्याचा वारा वाहू शकतो. अनेक ठिकाणी पाणी साचणे, भूस्खलन आणि सखल भागांमध्ये पूर येण्यासारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते. 

Web Title: Rains lashed pune city today bringing pleasant weather conditions in maharashtra orange alert weather update

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 20, 2026 | 08:06 PM

Topics:  

  • IMD alert of maharashtra
  • Pune Rain News

संबंधित बातम्या

Maharashtra Weather IMD Alert: राज्यात पुन्हा धो-धो कोसळणार! २२ जिल्ह्यांना येलो अलर्ट; मुंबई-ठाण्यात पावसाचा अलर्ट
1

Maharashtra Weather IMD Alert: राज्यात पुन्हा धो-धो कोसळणार! २२ जिल्ह्यांना येलो अलर्ट; मुंबई-ठाण्यात पावसाचा अलर्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.