
पुण्याचा कारभार कोणाच्या हातात जाणार? निकालाआधीच रविंद्र धंगेकरांचा मोठा विश्वास
पुण्याचा कारभार नक्की कोणाच्या हातात जाणार हे ठरणार आहे? यावर शिवसेना शिंदे गटाचे नेते रविंद्र धंगेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेनेचे सर्व कार्यकर्ते अत्यंत चांगल्या पद्धतीने निवडणूक लढले. एकनाथ शिंदेंकडे बघून लोकं शिवसेनेच्या पदरात यश पाडणार आणि योग्य लोकांच्या हातात पुणेकर सत्ता देणार ,असा विश्वास धंगेकरांनी व्यक्त केला आहे. शिवसेना निर्णायक ठरणार आणि शिवसेनेची नोंद यामध्ये घेतली जाणार, असा ठाम विश्वास रविंद्र धंगेकर यांनी व्यक्त केला आहे.
धंगेकरांचे भाजपच्या नेत्यांवर आरोप
मतदानाला अवघे काही तास शिल्लक असताना शिवसेनेचे नेते आणि माजी आमदार रविंद्र धंगेकरांनी पुण्यातील भाजप नेत्यांवर आरोप केले होते. पुण्यातील भाजपचे नेते गणेश बीडकर आणि एका महिला उमेदवाच्या पतीवर धंगेकरांनी गंभीर आरोप केला. धंगेकरांनी दोन तीन दिवसांत ट्वीटची मालिकाच सुरु केली होती. त्यात डान्सबारमधील भाजप नेत्यांचे व्हिडीओ आणि फोटो दाखवत जोरदार हल्ला चढवला आहे. पहिल्या ट्वीटमध्ये धंगेकरांनी एक डान्सबारमधील व्हिडीओ ट्वीट केला आहे. त्यात पुण्याला वाचवा म्हणत त्यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. रविंद्र धंगेकरांचं पहिलं ट्वीट काय आहे ते एकदा पाहूयात. ते म्हणतात दिवसा महिला सुरक्षेचे जाहीरनामे द्यायचे आणि रात्री डान्स बारमध्ये कारनामे करायचे! हे अपेक्षित आहे का सुसंस्कृत पुण्यनगरीमध्ये? अशा लोकांच्या हाती पुण्यनगरीचे नेतृत्व सोपवणार का? विचार करा! आपले पुणे वाचविण्याची हीच ती वेळ..! असे ट्वीट करत त्यांनी धुरळाच उडवून दिला होता. त्यामुळे आजच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. रविंद्र चव्हाण यांनी मोठा विश्वास व्यक्त केल्यामुळे शिंदेंची शिवसेना पुण्यात किती जागा जिंकणार, हे चित्र लवकरच स्पष्ट होणार आहे.