NMC Election Result 2026: निकाल जाहीर होण्यापूर्वीच नाशिकमध्ये शरद पवार गटाला धक्का! या दिग्गज नेत्याने दिला राजीनामा
खरं तर गेल्या अनेक दिवसांपासून अशी चर्चा सुरु होती की, नाशिकचे शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष गजानन शेलार यांची पक्षातून हकालपट्टी केली जाणार आहे. या सर्व चर्चा सुरु असतानाच आता गजानन शेलार यांनी राजीनामा दिला आहे. निवडणूक जाहीर झाल्यानंतर सर्व उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली होती. अनेक बड्या नेत्यांनी त्यांच्या पक्षातील उमेदवारांसाठी सभा देखील घेतल्या. मात्र नाशिकमध्ये निवडणूक काळात पक्षाच्या बड्या नेत्यांनी सभा घेतल्या नाहीत, असा आरोप गजानन शेलार यांनी केला आहे. हाच मुद्दा लक्षात ठेऊन त्यांनी राजीनामा दिला असल्याचे सांगितलं जात आहे. गजानन शेलार यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे नाशिकच्या राजकारणात मोठा बदल होण्याची शक्यता आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
याशिवाय असं देखील सांगितलं जात आहे की, गजानन शेलार यांनी निवडणुकीच्या काळात केलेल्या कामगीरीवर पक्षाचे वरिष्ठ नेते नाराज होते. गजानन शेलार यांचा पुतण्या राहुल शेलार भाजपाकडून निवडणूक लढवत आहे. शेलार यांनी त्यांच्या पुतण्यासाठी भाजपचा प्रचार केला, अशा चर्चा देखील सुरु झाल्या होत्या. शेलार यांचा पुतण्या राहुल शेलार भाजपकडून प्रभाग 13 मध्ये रिंगणात आहेत.
NMMC Election 2026: टांगा कोणाचा पलटी होणार? कोणाच्या बाजूने लागणार निकाल? नवी मुंबईत वाढली उत्सुकता
गजानन शेलारांवर असा आरोप केला जात आहे की, त्यांनी राहुल शेलार यांचा प्रचार केला होता. याच कारणामुळे त्यांची हकालपट्टी केली जाणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. मात्र त्यापूर्वी शेलार यांनी राजीनामा दिला आहे. गजानन शेलार यांनी घेतलेल्या निर्णयामुळे आता शरद पवार गटाला मोठा धक्का बसला असल्याचे मानले जात आहे. याबाबतीत अद्याप पक्षाकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नाही.






