
प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी Central Railway चा मोठा निर्णय; विशेष गाड्यांच्या कालावधीत...
हिवाळी विशेष गाड्यांच्या कालावधीत वाढ
प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेचा निर्णय
विशेष गाड्यांच्या विस्तारित फेऱ्यांसाठी बुकिंग ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत उपलब्ध
पुणे: हिवाळी हंगाम २०२५ मध्ये प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी, मध्य रेल्वेने विशेष गाड्यांच्या वेळा, मार्ग, थांबे आणि रचना वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.यामध्ये ट्रेन क्र.०४७१५/०४७१६ बिकानेर-साईनगर शिर्डी बिकानेर,ते साईनगर शिर्डी-बिकानेर, ट्रेन क्र.०९६२५/०९६२६ अजमेर-दौंड-अजमेर ते दौंड-अजमेर, ट्रेन क्र.०९६२७/०९६२८ अजमेर-सोलापूर-अजमेर ते सोलापूर-अजमेर या तिन्ही स्पेशल साप्ताहिक ट्रेनच्या कालावधीत वाढ करण्यात आली आहे.
विशेष ट्रेन २९ नोव्हेंबर पर्यंत अधिसूचित केलेली ट्रेन क्र .०४७१५ बिकानेर-साईनगर शिर्डी विशेष(साप्ताहिक) आता ०६ ते २७ डिसेंबर पर्यंत ४ फेऱ्या वाढविण्यात आली आहे.तर नोव्हेंबरमधील ट्रेन क्रमांक ०४७१६ साईनगर शिर्डी-बिकानेर विशेष (साप्ताहिक) आता ०७ ते २८ डिसेंबर पर्यंत ४ फेऱ्या वाढवण्यात आली आहे.
विशेष ट्रेन २७ नोव्हेंबर पर्यंत अधिसूचित केलेली ट्रेन क्र.०९६२५ अजमेर-दौंड विशेष (साप्ताहिक) आता ०४ डिसेंबर वरून २५ डिसेंबर पर्यंत ४ फेऱ्या वाढवण्यात आले आहे.२८ नोव्हेंबर पर्यंत अधिसूचित केलेली ट्रेन क्रमांक ०९६२६ दौंड-अजमेर विशेष (साप्ताहिक) आता ०५ डिसेंबर वरून २६ डिसेंबरपर्यंत ४ फेऱ्या वाढवण्यात आली आहे.
विशेष ट्रेन २६ नोव्हेंबर पर्यंत अधिसूचित केलेली ट्रेन क्र.०९६२७ अजमेर-सोलापूर स्पेशल (साप्ताहिक) आता ०३ डिसेंबर वरून ३१ डिसेंबर पर्यंत ५ फेऱ्या वाढवण्यात आली आहे. २७ नोव्हेंबरपर्यंत अधिसूचित केलेली ट्रेन क्र. ०९६२८ सोलापूर-अजमेर स्पेशल (साप्ताहिक) आता ०४ डिसेंबर वरून ०१ जानेवारी पर्यंत २०२५ रोजी ५ फेऱ्या वाढवण्यात आली आहे.
आरक्षण
विशेष शुल्कासह ०४७१६, ०९६२६ आणि ०९६२८ या विशेष गाड्यांच्या विस्तारित फेऱ्यांसाठी बुकिंग ३० नोव्हेंबर २०२५ रोजी सर्व पीआरएस स्थानांवर आणि आयआरसीटीसी वेबसाइट (www.irctc.co.in) वर सुरू होईल.
मध्य रेल्वेवर 12 दिवस ब्लॉक
मुंबईकरांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. मध्य रेल्वेच्या ठाणे ते कल्याणदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर रविवारी सकाळी 10.40 ते दुपारी 3.40 दरम्यान मेगा ब्ल़ॉक असणार आहे. परिणामी ठाणे ते कल्याण धावणाऱ्या अप आणि डाऊन जलद लोकल पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेवर वळवण्यात येणार आहेत. यामुळे काही फेऱ्या रद्द राहणार. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेलदरम्यान ब्लॉक नसेल. बेलापूर ते पनवेलदरम्यान ब्लॉक असेल. मध्य रेल्वेवर २२ नोव्हेंबर ते ३ डिसेंबरपर्यंत गर्डर उभारण्यासाठी बदलापूर स्टेशन येथे मध्यरात्रीनंतर २ ते ३.३० पर्यंत ब्लॉक राहील.