Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 10 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले, ग्राहकांसह व्यापारीही चिंतेत; वापरातील वस्तूंच्या दरात सातत्याने वाढ

कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतीमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या बजेटवर मोठा परिणाम होताना दिसत आहे. रोजच्या वापरातील वस्तूंच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने सर्वसामान्य नागरिकांसह किरकोळ व्यापाऱ्यांनाही आर्थिक फटका बसत आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 24, 2026 | 05:16 PM
महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले, ग्राहकांसह व्यापारीही चिंतेत; वापरातील वस्तूंच्या दरात सातत्याने वाढ

महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले, ग्राहकांसह व्यापारीही चिंतेत; वापरातील वस्तूंच्या दरात सातत्याने वाढ

Follow Us
Follow Us:

पुणे : कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतीमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या बजेटवर मोठा परिणाम होताना दिसत आहे. रोजच्या वापरातील वस्तूंच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने सर्वसामान्य नागरिकांसह किरकोळ व्यापाऱ्यांनाही आर्थिक फटका बसत आहे. विशेषतः एलपीजी सिलिंडर, खाद्यतेल, डाळी, साखर आणि दुग्धजन्य पदार्थांच्या वाढत्या किमतींमुळे घरखर्चाचा ताळमेळ बसवणे कठीण होत चालले आहे.

 

गेल्या काही महिन्यांत किराणा बाजारात जीवनावश्यक वस्तूंच्या दरात १० ते ३० टक्क्यांपर्यंत वाढ झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. त्यातच वाहतूक खर्च आणि घाऊक बाजारातील दरवाढ यामुळे किरकोळ बाजारातही महागाई वाढली आहे. परिणामी ग्राहक आता लहान खरेदी टाळून महिनाभराचा किराणा एकदाच खरेदी करण्याकडे वळत आहेत.

स्वयंपाकाच्या सवयींमध्ये बदल

एलपीजी सिलिंडरच्या वाढत्या दरांमुळे अनेक कुटुंबांनी स्वयंपाकाच्या सवयींमध्ये बदल केला आहे. झटपट तयार होणारे पदार्थ, कमी गॅस लागणारे खाद्यपदार्थ आणि मोठ्या प्रमाणावर एकदाच स्वयंपाक करण्याला पसंती दिली जात आहे.

मोठे पॅक घेण्याकडे ग्राहकांचा कल

किराणा व्यापाऱ्यांनाही या परिस्थितीचा मोठा फटका बसत आहे. पुणे मंडईतील व्यापारी संजय बोरा म्हणाले, “ग्राहक आता प्रत्येक वस्तूची किंमत पाहून खरेदी करत आहेत. पूर्वी ज्या प्रमाणात खरेदी व्हायची, ती आता कमी झाली आहे. मोठे पॅक घेण्याकडे ग्राहकांचा कल वाढला आहे; मात्र छोट्या वस्तूंची विक्री घटली आहे. घाऊक बाजारात दर वाढल्यामुळे आम्हालाही नफा कमी ठेवावा लागत आहे.”

“पूर्वी आठवड्याला दोन ते तीन वेळा बाजारात जात होतो. आता खर्च वाढल्यामुळे महिनाभराचा किराणा एकदाच घेतो. गोडधोड आणि तळलेले पदार्थ कमी केले आहेत. गॅस वाचवण्यासाठी एकाचवेळी जास्त स्वयंपाक करतो.” -मीनल देशमुख, गृहिणी, कोथरूड.

मासिक खर्चात आणखी वाढ होण्याची शक्यता

तज्ज्ञांच्या मते, मान्सून कमी राहिल्यास अन्नधान्य उत्पादनावर परिणाम होऊन पुढील काही महिन्यांत महागाई आणखी वाढू शकते. त्यामुळे सर्वसामान्यांच्या मासिक खर्चात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

हे सुद्धा वाचा : झेडपीची गोठवलेली बँक खाती अखेर पूर्ववत; पेन्शनधारकांचे थकीत वेतन तातडीने वितरित होणार

ग्राहकांवर होणारा परिणाम

  • महिन्याच्या किराणा बजेटमध्ये वाढ
  • गोडधोड आणि तळलेले पदार्थ कमी
  • आठवड्याऐवजी महिनाभराची खरेदी
  • गॅस बचतीसाठी एकदाच जास्त स्वयंपाक
  • स्वस्त आणि मोठ्या पॅकला पसंती
व्यापाऱ्यांपुढील अडचणी
  • घाऊक बाजारातील वाढते दर
  • वाहतूक खर्चात वाढ
  • छोट्या पॅकच्या विक्रीत घट
  • ग्राहकांकडून खर्चावर नियंत्रण
  • कमी नफ्यात व्यवसाय चालवण्याची वेळ
जीवनावश्यक वस्तूंचे वाढलेले दर (रुपयांमध्ये)
वस्तू आधीचा दर आताचा दर
एलपीजी सिलिंडर ८५६ ९१६
खाद्यतेल (१ लिटर) १२० १६५
तूरडाळ (१ किलो) १०० १४५
साखर (१ किलो) ४० ५०
गहू पीठ (५ किलो) १९० २४५
दूध (१ लिटर) ५४ ६४

Web Title: Rising inflation is having a major impact on the budget of common citizens

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 24, 2026 | 05:16 PM

Topics:  

  • maharashtra
  • PM Narendra Modi
  • pune news

संबंधित बातम्या

पुणे शहराच्या काँक्रीटीकरणात गुदमरत आहेत झाडांची मुळे; तज्ज्ञांकडून ‘ट्री सेफ्टी ऑडिट’ची शिफारस
1

पुणे शहराच्या काँक्रीटीकरणात गुदमरत आहेत झाडांची मुळे; तज्ज्ञांकडून ‘ट्री सेफ्टी ऑडिट’ची शिफारस

पाऊले चालती पंढरीची वाट…! संत ज्ञानेश्वर आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पालख्यांचे पुण्यात भक्तिभावात स्वागत
2

पाऊले चालती पंढरीची वाट…! संत ज्ञानेश्वर आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पालख्यांचे पुण्यात भक्तिभावात स्वागत

दुध भेसळीच्या हॉटस्पॉटवर मुंढेंचा दुसरा सर्जिकल स्ट्राईक; १.३४ कोटींची संशयित पावडर जप्त, मंचरनंतर थेट अकलूजवर धाड
3

दुध भेसळीच्या हॉटस्पॉटवर मुंढेंचा दुसरा सर्जिकल स्ट्राईक; १.३४ कोटींची संशयित पावडर जप्त, मंचरनंतर थेट अकलूजवर धाड

PM Modi in Australia: भारत-ऑस्ट्रेलिया भागीदारीत ‘शिक्षण’ बनला मजबूत स्तंभ; आता बेंगळुरूनंतर ‘या’ शहरांमध्ये सुरू होणार कॅम्पस
4

PM Modi in Australia: भारत-ऑस्ट्रेलिया भागीदारीत ‘शिक्षण’ बनला मजबूत स्तंभ; आता बेंगळुरूनंतर ‘या’ शहरांमध्ये सुरू होणार कॅम्पस

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.